नवीन नवीन असतांना बाळाचे सर्व काम करण्यात कित्ती वेळ जातो हे आत्ता कळायला लागले होते, आणि मजा पण वाटत होती, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत होता, दिवसभराचे काम, आणि रात्री तिच्या मुळे जागरण व्हायचे,पण, पुन्हा सकाळी ती हसली, की सगळा शीण निघून जायचा. हळ हळू भानू मोठी होत होती तेंव्हा मी तिला backsack मध्ये घालून आणि सुमाला पुढे herohonda च्या tank वर बसवून नासिकला आमच्या घरी विजयनगर कोलोनीत drive करून न्यायचे. खूप मजा यायची. रस्त्याने लोक वळून वळून कुतूहलाने बघायचे . ते सर्व दृश्य फारच मनोरंजक आणि मजेशीर असायचं. ही मोटरसायकल जेव्हा मी चालवली तेंव्हा कुणीच बायका चालवत नव्हत्या !१ ९८ ९ ची बात आहे ही !,मी माझ्या सासूबाई, आम्ही पण बर्याच वेळेला मोटरसायकल वर देवळाली _ नाशिक जात येत होतो. त्या तर नौवारी नेसून दोन्हीकडे पाय टाकून बसायच्या! नंतर तिला ऑफिसर मेस मध्ये घेवून जायला लागले, सगळेजण कौतुक करायचे!, तिनी जेव्हा खायला सुरुवात केलीतेव्हा तिच्या साठी छोट्या डब्यात पोळीचा रोल असायचा. सगळे तिचाकडे तो रोल मागायचे, आणि ती पण त्यातला कण कण सगळ्यांना द्यायची, खूप मजा यायची ! एकदा तर तिनी फारच मजा उडवून दिली होती. मला वाटते १ वर्षाची होती. एका ऑफिसरकडे पार्टीला गेलो होतो . तिने हळू आवाजात मला चिप्स साठी विचारले, मी तिला गप्प केले तरी तिची भुणभुण चालूच ! आणि त्या दिवशी पार्टी मध्ये फक्त चि प्स नव्हते! शेवटी एका जवानाला आमचे घरून चिप्स आणायला सांगितले ते तिने खाल्ले तेव्हा सगळ ठीक झाल ! एका पिकनिक ला गेलो होतो तेव्हा, कुणाला कळू नये म्हणून, मला म्हणाली, मी "कोंबडी" खाणार! तर, ते सगळ्यांना कळल, आणि मग जेवताना तिला सगळे कोंबडी खाओ, कोंबडी खाओ ! असे चिडवत होते !
देवळालीतच play group च्या शाळेत आवडीने जायला लागली! ती शाळा एका ख्रिश्चन टीचरची होती आणि त्या त्यांच्या पध्दतीचा frock घालायच्या म्हणून मग त्यांचे नाव पडले 'frock वाल्या मिस '!ह्याच टीचरना भानुप्रिया दहावी पास झाल्यावर भेटून आली आणि परत बारावी पास झाल्यावर पण भेटली ! त्यांना इतका आनंद झाला होता की काय सांगू ! त्यांच्या कारकिर्दीत असा कुणीच विद्यार्थी त्यांना भेटायला आला नव्हता! आज भानुप्रिया CS झाली आहे तर आता ही इच्छा आहे की परत त्यांना भेटून याव !
LKG आणि UKG करून आम्ही पुण्याला पोस्टिंग वर आलो। इथे St . हेलेना' सारख्या चांगल्या शाळेत admission मिळाली आणि पाचवी पर्यंत पुण्यात दर्जेदार अभ्यास झाला, आणि तिथल्या ख्रिश्चन संस्कृतीचा पण परिचय झाला. स्कूल फेस्ट , ख्रिसमस, सारख्या नवीन गोष्टींचा परिचय झाला, आणि ख्रिसमसची एकवीस दिवस सुट्टी ही नवीनच मजा अनुभवायला मिळाली. शाळेच्या असेम्ब्ली मध्ये कॅरोल सिंगीगचा नवाच आणि आनंद दायक प्रकार शिकायला मिळाला.
भानुप्रियाने कोणत्याच कारणा साठी क धी पाठीत धपाटे खाल्ले नाहीत, पण तिला ज्वारीचे धपाटे फार आवडायचे,. तर हेच धपाटे कसे बनवतात ते सांगते _
साहित्य _ १ वाटी ज्वारी पीठ, १ tsp मीठ, २ tsp हिरवी मिरची ठेचा, कोथिंबीर, १ tbsp तीळ , १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, हळद , आणि 2tsp तेल _ सर्व मिक्स करून मळून भाकरी करावी. दोन्ही कडे तेल टाकून खरपूस भाजून हे धपाटे लोणी, दाणे chutney , दही बरोबर सर्व करावे. .
साहित्य _ १ वाटी ज्वारी पीठ, १ tsp मीठ, २ tsp हिरवी मिरची ठेचा, कोथिंबीर, १ tbsp तीळ , १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, हळद , आणि 2tsp तेल _ सर्व मिक्स करून मळून भाकरी करावी. दोन्ही कडे तेल टाकून खरपूस भाजून हे धपाटे लोणी, दाणे chutney , दही बरोबर सर्व करावे. .