महूतील तीन महिन्यांचा कोर्स संपे पर्यंत श्रीलंकाचे पोस्टिंग आले. १ १/२ ते २ वर्षांचे पोस्टिंग! ह्या वेळेत मी नाशिकला राहिले. नवीन घरात राहून बरयाच गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्या वर्षीच म्हणजे १९८ ९ मध्ये डिसेम्बर मध्ये २८ तारखेला भानुप्रियाचा जन्म झाला. त्यासाठी पुण्याला होते. भरपूर लाड झाले, भानुप्रियाचे आणि माझे पण. हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदा जेंव्हा तिला हातात घेतली, तो क्षण अविस्मरणीय आहे, अर्थात, प्रत्येक आईला असेच वाटत असावे,की. हे छोटेसे बाळ , अतिशय गोड ,आणि जगातील सर्वात सुंदर मुल असते.! मी तरी ह्याला अपवाद कशी असणार? तिला घेवून देवलालीला आले. तेंव्हा, सुमाने तिचे जरा थंडच स्वागत केले! तिला जरा लांबूनच न्याहाळत बसण्यात १_२ दिवस गेले. ती रडली तर सुमा एकदम सावध व्हायची. बहुतेक तिला competition आल्या सारखे वाटले असावे!पण दोघींची किती गट्टी जमली, हे ह्या फोटो वरून कळेलच न!
,
बऱ्याच वेळेला सुमा तिला चावायची पण भानुप्रिया मात्र तिचे लाडच करायची!.भानुप्रीयाला लहानाची मोठी होताना पाहत होते, आणि रोज आयुष्याचा नवीन अर्थ कळतहोता. hotshot कॅमेरा होता माझ्याकडे त्याने तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या टप्याचे फोटो काढले. सारा दिवस तिचे लाड करण्यात निघून जायचा. तिची पण लहानपणची आवडती डीश म्हणजे ब्रेंड,बटर, जॅम!आणिआर्मी मध्ये ration मिळते त्यात ब्रेंड भरपूर मिळायचा त्यामुळेच की काय ब्रेंड च्या भरपूर रेसिपीस तयार झाल्या..त्यातील एक सोपी रेसिपी म्हणजे ब्रेड_इडली :_
१ वाटी बटाटे उकडून, लग्दा करावा. तेल गरम तेलावर मोहरी, जीर, हिंग,कढीपत्ता परतून बटाट्यचा लगदा घालून परतून घ्यावा. मीठ, तिखट, घालावे. कोथिंबीर घालून थंड करावे . ब्रेडचे गोल स्लाइसेस कापून घ्यावेत.एका स्लाइस्वर बटर लावावे, थोडी भाजी पसरावी. दाबून घ्यावे. असे स्लाइस करून ठेवा.
तवा गरम करून बटर टाका. भाजीची बाजू तव्यावर टाका,थोडी भाजून घ्या. हे स्लाइसेस तसेच प्लेट मध्ये काढा. ब्रेडवर थोडे घट्ट दही घाला. वरून फोडणी पसरा, कोथिंबीर घाला,आणि सर्व करा
वरील फोडणीसाठी तेलावर मोहरी, हिंग, कढीपत्ता,,उडदाची डाळ, काजू तुकडा घालावे.
ह्याच ब्रेडचा डोसा पण होतो_
ब्रेड डोसा:
६ ते ७ ब्रेड स्लाइस पाण्यात भिजवून, पाणी काढून लगदा एका बाउल मध्ये काढा. १ वाटी रवा, १ वाटी दही, १/२ वाटी तांदूळ पिठी, मीठ,घालून पातळ करावे फोडणी करून वरील पिठात घालावी कांदा, हिरवी मिरची, आणि कोथिंबीर बारीक चिरून घालावी.. पातळसर पीठ ठेवून डोसे करावेत. चटणी, गन पावडर (मोलागापोडी चटणी) बरोबर सर्व करावे.
इथेही साउथ इंडियन टच आलाच ! तसे पण आम्हाला दक्षिणेचे वेड आहेच!. . . . , . .,
.
. .