Sunday, 6 January 2013


कोईम्बतूर मध्ये आले आणि शहर बघितलं . पुष्कळ मोठती मला  शहर आहे. आम्ही युनिट मध्ये गेलो आणि विश्रांती घेतली . त्याआधी सुमाची भेट झाली! फारच तिखट वाटली मला ती! आणि होती पण तशीच ती!तीच पुराण नंतर सांगेनच. त्या आधी युनिट मधली एक गम्मत!   Coimbatore मध्ये ऑफिसर्स मेस मध्ये पहिल्या दिवशीच ब्रेकफास्टला आर्मीच्या शिस्तीचा बडगा पाहिला! त्याचे झाले काय, की ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही दोघेच मेसमध्ये गेलो. मी थोडी गोंधळलेली होतेच, त्यात ते टेबल लेऔट , क्रोकरी, टापटीप,सुंदर  सजावट  बघून थोडी आणखीन गोंधळले. युनिफॉर्म  मधले waiter ,आमच्या दोघांसाठी थांबलेले होते. मी मला दाखवलेल्या खुचीवर बसले. बसले, कसली, अगदी खुर्चीच्या टोकावर बसले. मला विचारले काय ब्रेकफास्ट घेणार? मी ओम्लेट  सांगितले. ५ मिनिटांनी ओमलेट   आल्यानंतर मात्र माझी तारांबळ उडाली. कारण, खायला सुरुवात केली, पण ते waiter  आजूबाजूला attention मध्ये उभे ! त्या tension मध्ये ओम्लेट काही घश्या खाली उतरेना!  सगळी काट्या चमच्याची practice कापरासारखी  उडण छु झाली!  literally, नानी  याद आ गयी!" घी देखा मगर बडगा नाही देखा" चा प्रत्यय आला.! आर्मी ऑफिसर हवा  ना ? घे घे !नंतर माझी मात्र मनातल्या मनात हसून हसून पुरेवाट झाली!शहर

मला चांगल आठवतंय, त्रीचीला असतांना बाबां  बरोबर NCC  च्या मेस मध्ये काही वेळा गेलो होतो. तेंव्हा तिथली  क्रोकरी, तिथली उभ्याने , प्लेट हातात घेवून  जेवणाची  पध्दत अतिशय मोहक,भुरळ पाडणारी होती. मग घरी आई असाच लेऔट करायची . आ णि  मग practice  व्हायची! त्यात खाताखाता एकमेका बरोबर बोलायचं,पुन्हा काही वाढून कस घ्यायचं , मला हे सगळ फार आवडायचं. असो. हे बाळकडू पुढे खूप उपयोगी पडल हे निश्चीत !!

कोइम्बतुर शहर पहिले फार छान ! भरपूर मोठ मार्केट, साड्यांची दुकानं! उत्तम बस सर्विस! मी तिथे बऱ्याच  वेळागेले  बसनी गेले होते, मजा  आली.
कोइम्बतुर शहर
  coimbatore च्या मुक्कामात ooty, mysore  पहिले, आर्मी मधले प्राथमिक धडे घेतले आणि  १९८८ मध्ये महू (मध्य प्रदेश ), ला कोर्ससाठी जाणण्याचा योग आला. तिथे पहिल्यांदाच 'husband  night ' नावाचा आगळा वेगळा  समारंभ पहायला मिळाला.आर्मी मध्ये सर्व्साधारण पणे  कोणत्याही जेवणा समयी प्रथम मुलांनी . . नंतर लेडीज आणि शेवटी ऑफिसर्सनी  जेवण करण्याआणि तिथल्या रिक्षा चा प्रघात आहे. परंतू  फक्त  हसबंड नाईट चे रात्री, सर्वप्रथम ऑफिसर्सना  मेजवानीला सुरुवात करण्याचा  मान  असतो. त्या संध्याकाळी जो मनोरंजनाचा कार्यक्रम झाला, त्यात लेडीज नी  traditional   पोशाख घालून  एक fashion show  सादर केला. मला ९ वारी  साडी घालायला सांगितली होती. अचानक झालेल्या ह्या मागणीने मी गोन्धळले ! कारण ९ वारी  साडी माझ्याकडे नव्हतीच.! पण, नाही कसे म्हणणार होते ? तर लग्नाच्या शालू ची  ९ वारी करून नेसले. आणि माझी   प्रथम  entry ! हातात दिवा घेवून यायचे, पुढे ठेवायचा आणि उभे राहायचे! असो,एन्ट्री उत्तम झाली, आणि कार्यक्रम पार पडला!

    महू  मध्ये , मी मोटरसायकल वर,दोघी _ तिघींना बसवून मार्केट मध्ये न्यायची आणि सामान आणायचो ! खूप धमाल करायचो. जो रस्ता मार्केट ला जाण्याचा, त्यालाच लागून  ट्रेनिंग ग्राउंड होते, तिथे सगळे ऑफिसर्स  बघत असायचे !




इथेच मी पहिल्यांदा  स्टोव्ह वर स्वयंपाक केला, तो पण ३ महिने!  तिथे bachelor ऑफिसर्स ग्रूप नी यायचे ते पण रात्री २ वाजता वगैरे आणि  चहा, कॉफी, आणि खाण्यासाठी असलेले सर्व पदार्थ फस्त करून जायचे ! आणि  चहा साठी कप  शेजारून आणायचेच , कधी कधी दूध पण ! अशी मजा करून   ही  मंडळी  फरार!

 इथेच पार्टी  मध्यॆ  पहिल्यांदा खाल्लेली , आणि मला अतिशय आवडणारी स्वीट डिश   "कॅर्मेल कस्टर्ड " ची रेसिपी  देते आहे

कॅर्मेल  कस्टर्ड :  १ कप   साखर  घालून, बारीक gas  वर वितळणे. हे कॅर्मेल पातळ झाले की,मोल्डला  बटर लावून त्यात  ओतावे. थोड्या वेळ तसेच ठेवावे.  १ कप दूध  ३ tablspoon  साखर घालून गरम करावे.gas  बारीक ठेवावा. १/४ कप दुधात २ tbsp कस्टर्ड  पावडर घालून हे दूध वरील दुधात हळू हळू घालीत ढवळावे. दूध घट्टसर होईल . उतरवून थोडे थंड करून, भांड्यातल्या कॅर्मेल वर ओतावे . थंड झाल्या नंतर, मोल्ड उलटा करून प्लेट मध्ये काढावे. सर्व्ह करण्या आधी थंड करावे.   .   
     .     
पुढल्या  मजकुरा  पर्यंत  बाय !











       


  

     
   




.

   

No comments:

Post a Comment