शनिवार पेठेतून शहां बिल्डींग, कर्वे रोड ला रहायला आल्या नंतरचे दिवस मात्र फार मस्त, मजेत आणि आनंदाचे गेले. इथे खरतर आम्ही चौघे मोठे झालो आणि एकत्र खेळलो, अभ्यास केला, मजा केली मोठी .सोसायटी असल्यामुळे भरपूर मुल मुली होतो . लगोरी, विटी दांडू , लंगडी, लपायला भरपूर जागा असल्यामुळे लपा -छापि , आणि, ग्राउंड वर बास्केट -बॉल , व्हॉं ली -बॉल ,बेस बॉल ,कबड्डी, अनेक प्रकारचे खेळ खेळायला मिळाले. खरच,खूप भाग्याचे वाटते. एक सर होते ते हे सर्व खेळ शिकवायचे. खूप मजा यायची. आणि घराच्या आतले खेळ, तर काही कमीच नाही. भातुकली रंगायची दुपारभर, पत्ते खेळायला बसलो, तर संध्याकाळ केव्हा व्हायची ते कळायचेच नाही. आणि मग कधी कधी घरात जायला उशीर झाला तर शिक्षा झालीच समजायची ! बर, घरात बसून पण खेळ होतेच की ! पेपर गेम्स तर किती तरी खेळायचो !पण संध्याकाळी सात वाजता घरात हवे ! त्यानंतर अभ्यास, जेवण आणि गप्पा मारीत झोपणे ! वा! आठवले तरी अंगावर मोरपिसारा फिरल्यासारखा वाटतो . तेव्हा माई आणि दादा पण आमच्या कडे होते. त्यांची पण खूप आठवण होते. आजोबांची खूप वेळ चालणारी देवपूजा, माईंची ताक करायची लगबग , त्यांची तासंतास चालणारी वेणीफणी , एका छोट्या रुमालात ठेवलेला त्यांचा चष्मा, तो जपण्यासाठी केलेला खटाटोप, दादांच्या जेवणाची वेळ होत आली की त्यांची आईला एक वार्निग बेल जाई. कारण आजोबा आले आणि, जेवण वाढलेले नसेल तर ते न जेवताच ऑफिस ला गेल्याचे माई नेच आम्हाला सांगितल्याचे आठवते ! आजोबा कर्मठ आणि माई भोळ सट ! प्रचंड मजा यायची ! पण मी दादांची लाडकी होते असे वाटते. कारण फक्त मीच त्यांच्या शेंडीची तीन पदरी वेणी घालण्याची हिम्मत करू शकत होते. आज देखील हे आठवल की हसू येत. त्यांच्या कमरेचा जुना पैसा होता तो जर खाली पडला,तर फक्त सचिनच तो पैसा उचलू शके, कारण जर नितीनने तो उचलला तर ते त्याला रागावून हाकलून देत आणि, सचिनला आवाज देत ! पण दादा अतिशय काटेकोर होते हे ही खरच . रोज सकाळी माझ्या बसची वाट पहात बाल्कनीत उभे रहायचे, बस आली की मला सांगायचे आणि, मला बस मिळालेली त्यांना दिसे आणि, मगच ते खोलीतखूप जात. आणि हे सगळ सकाळी पावणे सहा वाजता !
आमच्या बिल्डींग मधली मंडळी म्हणजे पण वेगवेगळे नमुने! अतिशय हुशार असे बिरारी, खोडकर अशी गोरे भावंड, मनमोकळे आणि अतिशय खेळकर भागवत फ़े मिली , आम्ही ज्यांच्या खूप खोड्या काढत असू ते इतर सर्व flat चे लोक. पण, कोणाला मदत लागली, तर, सर्व मंडळी त्वरीत हजर ! हीच खासियत जी आजकाल कमी झालेली दिसते .ती सर्व मंडळी चाळीतून flat मध्ये आलेली त्यामुळे ती संस्कृती घेवून आलेले. पण आता हे दिसत नाही
.आता एक सोप्पी रेसिपी सांगते. आजच्या आज करून बघा आणि मला कळवा .
पंचामृताचे पानगे :
दूध - १ वाटी , दही- १/४ वाटी ,- तूप - २ टेबल स्पून, मध - २ टेबल स्पून ,साखर - २ ते ३ टेबल स्पून - सर्व पदार्थ मिक्स करून, साधारणपणे १ वाटी कणिक आणि १/२ वाटी तांदूळ पीठ (नसल्यास कणिक घ्यावी) घालून,किंचित मीठ घालून सरबरीत डोश्या सारखे पीठ घेवून, pan मध्ये छोटे पानगे तुपावर घाला.दोन्हीकडे खरपूस भाजून घ्या. प्लेट मध्ये घेवून, मध, क्रीम, घालून द्यावे.
variation - वरील mixture मध्ये पनीर किसून घालावे.
. bye !