Wednesday, 28 November 2012

MALAA MILALELI ANMOL SHIKVAN

काल  मी शनिवार पेठेतील गमती   आठवत होते. त्या गमती आठवताना तिथे घडलेले नाटय  देखील आठवल्या शिवाय रहात  नाही. तिथे घडलेल्या ह्या नाटयाने तर मला खूप लवकर आयुष्यात खूप काही शिकवले असे आज वाटते. आमचे शेजारी जे परांजपे रहात, ते पूर्ण कुटुंबच  वेडयांनी  भरलेले होते ! नवरा बायको, ३ मुलगे  सर्वांचे च आमच्या कुटुंबाशी बहुधा मागील जन्माचे वैर होते. लाईटचे कनेक्शन रात्री कापणे, पाण्याची पाईप ठोकून ठेवून पाणी पुरवठा बंद करणे, आमच्या बाहेर ठेवलेल्या  सामानाला रात्री-बेरात्री नुकसान पोहोचवणे, भांडणे काढणे, अपशब्द बोलणे, मुलांना वाईट बोलणे, असे अनेकानेक गलिच्छ प्रकारांनी  आम्हाला त्रास दिला. पोली स  स्टेशन मध्ये रात्री-बेरात्री हजेरी लावावी लागणे,कोर्ट केसेस करायला भाग पाडणे,हे सर्व दशावतार मी पाहिले,जवळून अनुभवले, आई-बाबांची  होणारची कुचंबणा, घरातील तारांबळ, ,आपण चांगले असून देखील, आपल्याला अशा दुष्ट लोकांना सामोरी जायला लागावे ह्याची खंत, हे सगळ तेंव्हा कदाचित उमगत नसेल, पण जाणवल असणार नक्की. पण शेवटी, वाड्यातल्या लोकांनी, पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी  दाखवलेला बाबांवरचा विश्वास,माझ्या मामांनी दिलेली भक्कम साथ,आणि देवावरची ह्या दोघांची अपार आणि पूर्ण श्रद्धा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले काही चुकलेच नाही, तर का घाबरायचे? हा आत्मविश्वास जबरदस्त होता. आणि म्हणूनच सर्व कोर्ट केसेस बाद ठरल्या.सर्वांना आनंद तर झालाच,  पण -'बाबा' आणि 'हेमाची आई'(असेच म्हणायचे सगळेजण) ह्या संकटातून सुटले ह्याचे समाधान जास्त होते. तर,वाड्यातल्या ह्या दिवसांची ही सर-मिसळ आठवणींची!


असो,   मूड ठीक करण्यासाठी, आणि थंडीचे दिवस उबदार करण्यासाठी, डिंकाच्या लाडुची  ही सोप्पी रीत खाली देत आहे.
डिंकाचे लाडू:

खायचा डिंक - १/२ वाटी , सुक खोबर कीस -१/२  वाटी, बदाम-१/४ वाटी , काजू-१/४ वाटी , तीळ -१/८ वाटी , खसखस-१/८ वाटी , पिठी साखर - १ १/२ ते २ वाटी ,  साजूक तूप - १ ते १/४ वाटी, कणिक - १/२ वाटी 

डिंक  १/२ वाटी  तुपात थोडा थोडा करीत तळून  घ्यावा .. खोबर कीस., तीळ , खसखस  कोरडे  भाजून घ्यावे. बदाम, काजू, तुपात तळून  घ्यावेत. सर्व मिक्स करून,भरड किंवा बारीक पावडर मिक्सरवर करावी. कणिक तुपावर गुलाबी परतून घ्यावी. थंड करून,, सर्व वस्तू , पिठी साखर, तूप घालून, लाडू करावेत .   हवे असल्यास, वेलची, सुंठ पावडर घालावी. हवे असल्यास तूप जास्त घालावे.  लाडू  न वळता नुसते पण खावू  शकतो.

वर दिलेली आपली पुणेरी डिंक  लाडू ची रेसिपी. खाली, "पंजिरी' म्हणजे उत्तर भारतात बनणारा प्रकार.थोडा फरक आहे, करून पहा
पंजिरी:

 कणिक - १ वाटी , रवा   -१/२ वाटी , डिंक - १ वाटी , बदाम - १/४ वाटी , काजू - १/४ वाटी  पिठी साखर - १ १/२ ते २ वाटी

कृति : कणिक आणि रवा वेगवेगळे तुपावर गुलाबी भाजून घ्यावे. बदाम,काजू ,डिंक  वेगवेगळे  तळून  घ्यावेत. बदाम,काजू आणि, डिंक  मिक्सर मधून बारीक पावडर  करावी. सर्व वस्तू मिसळून नंतर त्यात वेलची पूड,सुंठ पूड, अख्खे बदाम,काजू घालावेत. थंडीसाठी उत्तम पदार्थ आहे. खराब होत नाही

हवा असल्यास, १/२ वाटी  खवा परतून घालावा. पण हे जास्त टिकणार नाही.


ह्या सगळ्या लिखाणामध्ये माझा gas वरचा मसाला जळून  गेला ना! . असो !

 ,







 


  


            

No comments:

Post a Comment