![]() |
| दिन दिन दिवाळी! |
गाई म्हशी कुणाच्या?
लक्ष्मणाच्या .
लक्ष्मण कुणाचा?
आई बाबांचा!'
असं म्हणत, फटाके, फराळ आणि पाहुण्यांच्या बरोबर धमाल मस्ती करत दिवाळी साजरी झाली!
काही दिवसांपूर्वी देव दिवाळी साजरी झाली, तुळशीचे लग्न लागले, आणि लगेचच पाठोपाठ घरातली लग्नकार्य हाती घेण्याची लगबग सुरु झाली! पुढील काही महिने भरपूर मुहूर्त आहेत, त्यामुळे आता घरात निमंत्रण पत्रिकांचा ओघ वाढणार,(दोन already येउन पडल्या सुध्दा!) आणि सतत लग्नाला जावे लागणार, तिथले जड जेवण जेवावे लागणार! मग काय, acidity वगैरे त्रास उदभवणारच!
अर्थात, त्रास होतो म्हणून काही कोणी खायचं थांबत नाही ना! आतां चातुर्मास संपला, त्यामुळे strictly non vegetarian असणाऱ्या मंडळींनी सुटकेचा निःश्वास सोडला असणार! chicken, mutton वगैरे भरपूर ताव मारून खाल्लं असणार!
अर्थात मी पण चिकन केलंच की! ते पण थाई स्टाईल! पण थोड fusion! दही, मीठ,तिखट, चिकन मसाला, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण,लांब कापलेला कांदा, थोडे तेल आणि हवा असल्यास लाल रंग घालून ३ ते ४ तास चिकन marinate करून, नंतर तेलावर छान परतून घेतली. शेवटी, थाई रेड चिली पेस्ट पातळ करून घातली, आणि नीट शिजवून घेतले. कोथिंबीर आणि पुदिना घालून गरम गरम सर्व्ह केलं! मुलीनं ताव मारून खाल्लं की!
नंतर मूगडाळीचा शिरा खाल्ला! खाल्ला म्हणजे काय, फस्त केला!!!!
| मूग डाळीचा शिरा |

No comments:
Post a Comment