Tuesday, 28 January 2014

PHASLELE PADARTH AANI TYACHE DISASTER MANAGEMENT

पाककला हे  शास्त्र आहे असं  मानलं जातं  ते उगीच नाही. But  still,  it  is not rocket science! कला आणि शास्त्र  ह्यांच्या सुरेख संगमातून होणारा हा रसना रंजन करणारा अविष्कार म्हणावा लागेल. पण  त्यामुळेच की   काय, कधी कधी शास्त्रात चूक नसतांनाही कलेचा अविष्कार मात्र  मनासारखा होत नाही! अहो, म्हणजे सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं तर आपण केलेला पदार्थ फसतो!!!!

अनेक वेळेला व्यवस्थित केलेला एखादा पदार्थ एखादवेळी मात्र सपशेल फसतो, हे कितीतरी लोकांनी अनुभवलं असणार, नाही का? मला तर असा पदार्थ फसला, की अगदी depression च येतं. म्हणजे मन एकदम उदास होऊन जातं, निराश वाटतं. मग पुन्हा हा पदार्थ नीट झाला की मगच हे नैराश्य दूर होतं. आणि हा पदार्थ परत करे पर्यंत हे माझ्या डोक्यातून जात नाही.

माझ्यासाठी baking म्हणजे theraputic आहे. If I am feeling low, I start baking a  cake, and if   it turns out well baked, I feel happy! केक  चांगला  झाला, मनासारखा झाला, तर मी तो खात  सुध्दा नाही! very funny na?  पण चांगला झालेला पदार्थ पाहूनच मला समाधान होतं.  specially विथ केक. 

एवढं सगळं सांगायचं कारण असं की,परवा   छान Peanut Butter cake बनवायला घेतला, बनवला आणि हायरे देवा! केक फुलायच्या ऐवजी बसला! आणि त्याबरोबरच माझा मूड पण बसला!म्हणजे ingredients तेच, माप तेच, microwave तोच, सगळं काही तेच, मग का बर बिघडला केक? नो idea!(get idea!) just  joking यार!

तर Peanut Butter cake साठी:

१०० grms मैदा, १५०gms पिठी साखर, ११/२ टीस्पून बेकिंग पावडर, १/२ टीस्पून सोडा, १०० gms peanut butter, १०० gms बटर, १ संत्र्याची  किसलेली साल, ५० gms melted white chocolate,
१ टीस्पून vanila essence, आणि २ अंडी नीट whisk करून १८० degrees वर ३० मिनिटे बेक करावा.

आता हा केक फसला! मग disaster management! ह्याच केकचा चुरा केला, त्यात गोल्डन सिरप,( किंवा थोडा साखरेचा पाक करून) थोडं मेल्ट केलेलं व्हाईट चोकलेट, आणि हवी असल्यास थोडी रेड वाईन  घालून,छोटे छोटे balls तयार करायचे. वरून व्हाईट चोकोलेटने आणि चेरीजने   सजवायचे.झाले …. chocolate balls ready!

chocolate balls
तर  महत्वाचे काय की , वस्तू वाया घालवायची नाही, तर तिचं स्वरूप बदलून पुन्हा खाण्या योग्य बनवायची. म्हणजे केक बनवला तो शास्त्रा प्रमाणे, पण हे chocolate balls बनवले ते कलेने! म्हणजेच शास्त्र आणि कलेचा संगम म्हणतात तो असा!

        

Saturday, 18 January 2014

SUCCESSFUL RECIPE KASHI OLKHAYCHI?

'कुणी बघणार असेल….  तर दाढी करण्यात अर्थ आहे…….
कुणी बघणारच  नसेल, तर अंघोळ देखील करणे व्यर्थ आहे !'

आलं ना हसू?  म्हणजे बघा, मनुष्य किती 'attention seeking' असतो ते. प्रत्येकाला वाटतं की   आपल्याकडे कुणी तरी बघावं, कुणीतरी आपलं  कौतुक करावं, कुणीतरी smile द्यावं , कुणीतरी जवळ बसून चार गप्पा माराव्यात……

अर्थात काहींना हे सुख मिळत नाही असं होतं, पण बहुतेकांना   ते कमीजास्त प्रमाणात मिळतंच. काय आहे न, आपण कुणाकडे सुख मागतो, किंवा कुणाकडून सुखाची अपेक्षा करतो हे महत्वाचे नसते.  आपल्याला कोण सुख देतो किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो हे महत्वाचे असते.   अपेक्षा केली की अपेक्षाभंग आलाच, आणि अपेक्षाभंग झाला की दुःख आलंच! त्यामुळे अपेक्षा न ठेवता सुख मिळालं तर त्या सुखाची किंमत कळते! पण अपेक्षा नाही ठेवल्या तर मग तो   माणूस कसला?

आता आपण एखादा  पदार्थ करायला घेतो, तेंव्हा हा पदार्थ चांगलाच होईल ही अपेक्षा ठेवून केला, आणि तो पदार्थ फसला, तर आपल्याला खूपdemotivated व्हायला होतं, खर ना?  पुढचे काही तास, दिवस त्यातल्या चुका शोधण्यात आणि हळहळ व्यक्त करण्यात जातात. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख ते हेच.

तेंव्हा कोणताही पदार्थ करतांना पहिले प्रथम ती रेसिपी मनातल्या मनात करून बघायची, म्हणजे सर्व जिन्नस आपल्या मनातून घालीत जाऊन पदार्थ तयार करायचा. ह्या procedure मुळे   प्रथम पदार्थ बनवण्यात काही त्रुटी आहेत का ते लक्षात येतं. मग त्यांची नोंद करून ठेवायची.  मग ह्या त्रुटी   कमी करून पुन्हा  procedure करून बघायची मनातल्या मनात, आणि तयार पदार्थाचा अंदाज घ्यायचा, नाकानी  सुवास घ्यायचा, जिभेने चाखायचा, तो देखील मनातल्या मनात  बर का!  मग एवढे केल्यावर आपल्याला तो पदार्थ actually  करण्यास योग्य आहे किंवा नाही ते लक्षात येतं. त्यानुसार मग तयारी करून पदार्थ करावा, शक्यतोवर बिघडत नाही, किंवा फारच थोडे बिघडते! हा माझा अनुभव आहे, तुम्ही पण try करून बघा आणि तुमचा experience मला जरूर कळवा.

एक चिकनची मस्त रेसिपी…. ही मी अशीच आधी मनात करून बघितली आणि तोंडाला पाणी सुटल! म्हणजे its a  sure sign of a  successful recipe!  मग केली!

नारळाच्या दुधातली चिकन:

१ चमचा तेल आणि १ चमचा  तूप दोन्ही एकत्र    गरम करायचे. त्यात मोहरी, सुकी लाल  मिरची , आणि लांब चिरलेला कांदा १ वाटी टाकून ब्रोव्न करून घ्यावे . २ वाट्या boneless चिकन चे तुकडे टाकून परतावे. आधी १/२ वाटी नारळाचे पातळ दूध   घालून,झाकण   ठेवून ४ ते ५ मिनिटे चिकन शिजवावे. नंतर नारळाचे घट्ट दूध घालून  शिजवावे. gas  बंद करून  मीठ,तिखट किंवा हिरवी मिरची तुकडे, चिंच कोळ १टीस्पून, आणि रसम पावडर घालावी.
तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची तुकडे घालून फोडणी चिकनवर ओतून,  कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह   करावी.

    

Friday, 17 January 2014

AAJCHA SOUTH INDIAN MENU

 शायर  ने कहा…

हमें तो अपनोंने  लूटा, ग़ैरोंमें कहाँ दम था.।
हमारी कश्ती वहाँ   डूबी , जहाँ पानी कम था ।'

इसपर शायर  की बिवीने कहा.....

'तुम तो थे ही गधे, तुम्हारे भेजेमें कहाँ  दम था.।
वहाँ कश्ती लेके गए ही क्यूँ, जहाँ पानी कम था।'

 
खरं म्हणजे बायकांना जरा जास्तीचा म्हणजे सगळ्या लोकांना ६वा सेन्स असतो ना? तर त्यांना ७ वा
सेन्स असतो! असं  म्हणतात बर! पण मग ,आपला नवरा 'गधा' आहे हे त्यांना लग्न व्हायच्या आधीच  का बरं  कळत नाही? बर आणि सारखं असं  त्याला म्हणत राहायचं म्हणजे मेलेल्याला किती  मारायचं हो? असो.

काल डोसा आणि सांबार केलं आणि त्याच बरोबर इडीय्प्पम   बनवलं  होतं,  टेस्टी झाले होते! तसं  मला साऊथ इंडिअन डिशेस जरा जास्तच आवडतात. आणि ही इडीयाप्पाम ची रेसिपी देते आहे, ती जरूर try   करण्या सारखी आहे….

इडीयाप्पाम:


किंचित मीठ आणि १ चमचा  तेल किंवा तूप घालून २ वाट्या पाणी उकळावे . त्यात १ वाटी मोदकाची पिठी (किंवा साधी तांदुळाची पिठी पण चालेल ),घालून, थोडे मिक्स करावे. २ मिनिटांनी पिठी शिजली की gas बंद करावा, पिठी झाकून  ठेवावी. २ मिनिटांनी पिठी तेलाच्या हाताने नीट  मळून घ्यावी. मोदकपात्रात पाणी भरून गरम करावे. इडली stand वर, सोऱ्याला तेल लावून, पिठी भरून, जाड शेवेच्या चकतीने शेव पाडावी.  stand मोदकपात्रात ठेवून ३ ते ४ मिनिटे उकडावे. गरम गरम इडीयाप्पाम डिश मध्ये  केळीच्या पानावर घेवून, त्यावर गरम सांबार आणि चटणी सोबत द्यावे.
variation:  हे इडीयाप्पाम चण्याच्या कोरमा बरोबर पण सर्व्ह करतात.




Thursday, 16 January 2014

TEELGUL GHYAA, GOAD GOAD BOLAA!

मित्रहो,
 'तिळगुळ घ्या, गोड बोला'

मध्यंतरी बरेच दिवस काही लिहिले नाही कारण घराचे रेनोव्हेशन करत होते.  आता काम पूर्ण झाले त्यामुळे परत लिहायला सुरुवात केली आहे.  मकर संक्रांत झाली, तिळगुळ खाऊन  झाला आणि बऱ्याच  मंडळींचे  गुळाच्या पोळ्या पण खाऊन पोट भरले   असेलच. गुळाची पोळी फक्त थंडीतच खाता येते कारण ती उष्ण असते, आणि इतर वेळी खाल्लेली पचणार नाही, तोंड येईल, उष्णता वाढेल असे त्रास होण्याची शक्यता असते.

त्यामुळे मी जे नेहमी माझ्या  ब्लॉगमधून सांगत असते ते असे की भारतीय संस्कृती मध्ये सण,उत्सव आणि त्यावेळचा आहार ह्याचे नाते असते. ह्या उत्सवाचा आपल्या  भावनिक, शारीरिक,  सामाजिक, आणि इतर काही अध्यात्मिक, किंवा वैज्ञानिक   घडामोडींशी संबंध  असतो, आणि तो संबंध आपल्या त्या ऋतूतल्या आहारातून व्यक्त होतो.

संक्रांति च्या सुमारास पतंग उडविण्याचे कारण पण तसेच आहे. ह्यावेळी हवा छान असते, दुपारचे ऊन   आल्हाददायक असते, म्हणून मग सगळ्यांनी पतंग उडवायचे, त्यासाठी गच्चीत किंवा मोकळ्या पटांगणात जायचे, वातावरणाचा  मनसोक्त आनंद घ्यायचा, मजा करायची!

उंधियो, मिक्स भाज्यांचे पदार्थ, गरम गरम हलवा, खीर, गुलाबजाम अशा गोड पदार्थांचा भरपूर साजूक तूप घालून   आस्वाद घ्यायचा, आणि मग भरपूर exercise पण करायचा आणि तब्येत उत्तम ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे!

संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' , भोगी च्या दिवशी घरातील अडगळीच्या, नको असलेल्या वस्तू फेकून देवून नवीन   खरेदी करावी.म्हणजे जुने  हेवेदावे, भांडणे,रुसवेफुगवे सोडून नव्याने प्रेम वाटावे हा संदेश! ह्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत किंवा भाजी, आणि साधी तांदूळ_मुगडाळीची खिचडी करतात.

मकर संक्रांतीला तीळगुळाच्या वड्या, लाडू करतात.
ते तिळगुळ एकमेकांना देऊन "तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची प्रथा आहे. गुळाच्या पोळ्या भरपूर तूप घालून खाव्यात.
भरपूर रानमेवा म्हणजे बोरं, ऊस, मटार, हरबरा, गाजर, इत्यादी खावे. शिवाय सुकामेवा,  चिक्की,गजक सारखे पदार्थ पण भरपूर खावेत.

आणि संक्रांत म्हटली की काटेरी हलवा आलाच! तीळ  फोडून हलवा केला जातो. नंतर त्या हलव्याचे दागिने केले जातात आणि लहान मुलांचे बोरनहाण केले जाते!


म्हणजे छोट्या मुलांना काळ्या रंगाचे पण सुंदर सुंदर   कपडे आणि हलव्याचे दागिने, मुकुट वगैरे घातला जातो,  आणि त्याच्या डोक्यावर रानमेव्याचा पाऊस पाडतात! आणि त्याच्या ह्या बोरनहाणसाठी आलेल्या बालमित्रांना तो सर्व मेवा लुटू द्यायचा! काय मज्जा! पोरं खुश होतात अगदी!

नववधुंसाठी देखील ह्या सणाचे महत्व आहे बर का!


पहिल्या संक्रांतीला  सुनेला हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात, तिचे लाड पुरवतात! शिवाय त्यांना काही भेटवस्तू  पण देतात.

 संक्रांतीचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे 'संक्रांतीचे वाण' लुटणे! महिला वर्गाचा हा आवडता भाग! सवाष्णींना  हळदी  कुंकू, तिळगुळ, काटेरी हलवा आणि वस्तू 'वाण' म्हणून  लुटायची! पुढे वर्षभर येणाऱ्या  सुबत्ते साठी हे 'वाण' द्यायचे. ह्यात महिला चमचे, बाउल, रुमाल ह्या सारख्या छोट्या वस्तू, किंवा धान्याची पाकिटे, सुबक कुंकवाचे करंडे, किंवा अनेक विध वस्तू लुटतांना दिसतात. कल्पकतेने वाण देणे ही सुध्दा एक कला आहे.

पौष शुध्द चतुर्दशी म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीचा हा सण  माघ शुध्द सप्तमी पर्यंत चालतो. म्हणजे बोरनहाण, हळदीकुंकू,  वगैरे सर्व उत्सव ह्या २१ दिवसात केंव्हाही करता येतात.

संक्रांत स्पेशल गुळाची पोळी ……

२ वाट्या बेसन कोरडे भाजून ठेवावे. १ वाटी गुल पाघळून घ्यावा. २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून खसखस कोरडी भाजून घ्यावी, आणि भरड कुटावे. सर्व वस्तू एकत्र कराव्यात, त्यात वेलची पूड घालून सारण तयार   करावे. गव्हाची कणिक तेल आणि किंचित मीठ घालून घट्ट  मळून घ्यावी.

कणकेची छोटी गोळी घेऊन, उंडा  करावा, सारण भरावे, आणि हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर भाजून घ्यावी . थंड झाली की पोळी कडक होते, ती  थंडच खायची असते. पण खातांना भरपूर   तूप घालून खावी.