'कुणी बघणार असेल…. तर दाढी करण्यात अर्थ आहे…….
कुणी बघणारच नसेल, तर अंघोळ देखील करणे व्यर्थ आहे !'
आलं ना हसू? म्हणजे बघा, मनुष्य किती 'attention seeking' असतो ते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे कुणी तरी बघावं, कुणीतरी आपलं कौतुक करावं, कुणीतरी smile द्यावं , कुणीतरी जवळ बसून चार गप्पा माराव्यात……
अर्थात काहींना हे सुख मिळत नाही असं होतं, पण बहुतेकांना ते कमीजास्त प्रमाणात मिळतंच. काय आहे न, आपण कुणाकडे सुख मागतो, किंवा कुणाकडून सुखाची अपेक्षा करतो हे महत्वाचे नसते. आपल्याला कोण सुख देतो किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो हे महत्वाचे असते. अपेक्षा केली की अपेक्षाभंग आलाच, आणि अपेक्षाभंग झाला की दुःख आलंच! त्यामुळे अपेक्षा न ठेवता सुख मिळालं तर त्या सुखाची किंमत कळते! पण अपेक्षा नाही ठेवल्या तर मग तो माणूस कसला?
आता आपण एखादा पदार्थ करायला घेतो, तेंव्हा हा पदार्थ चांगलाच होईल ही अपेक्षा ठेवून केला, आणि तो पदार्थ फसला, तर आपल्याला खूपdemotivated व्हायला होतं, खर ना? पुढचे काही तास, दिवस त्यातल्या चुका शोधण्यात आणि हळहळ व्यक्त करण्यात जातात. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख ते हेच.
तेंव्हा कोणताही पदार्थ करतांना पहिले प्रथम ती रेसिपी मनातल्या मनात करून बघायची, म्हणजे सर्व जिन्नस आपल्या मनातून घालीत जाऊन पदार्थ तयार करायचा. ह्या procedure मुळे प्रथम पदार्थ बनवण्यात काही त्रुटी आहेत का ते लक्षात येतं. मग त्यांची नोंद करून ठेवायची. मग ह्या त्रुटी कमी करून पुन्हा procedure करून बघायची मनातल्या मनात, आणि तयार पदार्थाचा अंदाज घ्यायचा, नाकानी सुवास घ्यायचा, जिभेने चाखायचा, तो देखील मनातल्या मनात बर का! मग एवढे केल्यावर आपल्याला तो पदार्थ actually करण्यास योग्य आहे किंवा नाही ते लक्षात येतं. त्यानुसार मग तयारी करून पदार्थ करावा, शक्यतोवर बिघडत नाही, किंवा फारच थोडे बिघडते! हा माझा अनुभव आहे, तुम्ही पण try करून बघा आणि तुमचा experience मला जरूर कळवा.
एक चिकनची मस्त रेसिपी…. ही मी अशीच आधी मनात करून बघितली आणि तोंडाला पाणी सुटल! म्हणजे its a sure sign of a successful recipe! मग केली!
नारळाच्या दुधातली चिकन:
१ चमचा तेल आणि १ चमचा तूप दोन्ही एकत्र गरम करायचे. त्यात मोहरी, सुकी लाल मिरची , आणि लांब चिरलेला कांदा १ वाटी टाकून ब्रोव्न करून घ्यावे . २ वाट्या boneless चिकन चे तुकडे टाकून परतावे. आधी १/२ वाटी नारळाचे पातळ दूध घालून,झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे चिकन शिजवावे. नंतर नारळाचे घट्ट दूध घालून शिजवावे. gas बंद करून मीठ,तिखट किंवा हिरवी मिरची तुकडे, चिंच कोळ १टीस्पून, आणि रसम पावडर घालावी.
तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची तुकडे घालून फोडणी चिकनवर ओतून, कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावी.

No comments:
Post a Comment