Wow! आणखीन एखाद दोन posts नंतर १०० वा पोस्ट लिहायची वेळ येत आहे, ह्या विचाराने फार छान वाटते आहे! वर्ष सव्वा वर्षात बरीच मजल मारली मी म्हणायची! असो, रुचिरेचा हा रुचकर प्रवास असाच चालू राहो!
काल टिपिकल साऊथ इंडिअन पध्दतीने स्वयंपाक केला होता. 'मोरकोलुम्बु' म्हणजे दहीभेंडी , 'पिकलेल्या केळ्याची पचडी, मोळगापोडी आणि साधा भात! सोबत डाळ टोमेटो चं रस्सम! वाह! मजा आली.
पिकलेल्या केळ्याची पचडी म्हणजे आपल्या केळ्याच्या गोड कोशिंबिरी सारखा प्रकार…
ओलं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, आणि आलं ह्याचे वाटण ठेवावे. pan मध्ये केळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे, मीठ,हळद, थोडं तिखट आणि पाणी घालून केळ्याचे तुकडे शिजवावेत . ह्यावर नारळाचे वाटण (नारळाचा चव, हिरवी मिरची, आलं आणि जिरं) घालून परतावे. तिखट, मीठ adjust करावे. नंतर थोडेसे दही घालून gas बंद करावा. कोथिंबीर आणि किंचित साखर घालून सरबरीत करावे. खोबऱ्याचे तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल सुख्या मिरच्या घालून ही फोडणी पचडी वर घालून सर्व्ह करावे.
भेंडीची भाजी पण करायची पध्दत थोडी वेगळी. म्हणजे भेंडीचे तुकडे तेलावर कुरकुरीत परतून घ्यायचे. शिजवलेली तुरीची डाळ आणि नारळ, हिरवी मिरची, आणि जिरं मिक्स करून वाटण करून घ्यायचं.पाणी आणि हळद घालून शिजू द्यायचं. पूर्ण शिजलं की दही घालून नंतर परतलेल्या भेंड्या घालाव्यात. खोबरेल तेल गरम करून मोहरी, जिरं , हिंग, मिरची, [फोडणी वरून ओतून, आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
सौथ इंडिअन जेवण |
काल टिपिकल साऊथ इंडिअन पध्दतीने स्वयंपाक केला होता. 'मोरकोलुम्बु' म्हणजे दहीभेंडी , 'पिकलेल्या केळ्याची पचडी, मोळगापोडी आणि साधा भात! सोबत डाळ टोमेटो चं रस्सम! वाह! मजा आली.
पिकलेल्या केळ्याची पचडी म्हणजे आपल्या केळ्याच्या गोड कोशिंबिरी सारखा प्रकार…
केळ्याची पचडी |