हापूस आंबे आणले की काय काय करता येईल त्याचे विचार चालू होतात. माझी एक आवडती रेसिपी म्हणजे आंब्याचा सुधारस …. इतर वेळी पटकन साखरेचा पाक करून केळीचे तुकडे टाकून सुधारस करतेच, पण आंबा असला की मात्र आंब्याचाच सुधारस …
साखरेचा पातळसा पाक करून , त्यात वेलची पूड, केशर, काजू तुकडे, , बेदाणे, आणि हापूस आंब्याचे तुकडे घालून वरून साजूक तूप घालून पोळी सोबत द्यावे.
आंब्याचा जसा गुळांबा, तसा साखरांबा केला आणि भार छान जमून गेला !
१ वाटी कैरीचा कीस थोडा परतून शिजवून घ्यावा , ३ ते ४ मिनिटे लागतात. नंतर १ १/२ वाटी साखर घालून, मंद आचेवर ढवळून साखर आळे पर्यंत ठेवून उतरवावे. ४ मिनिटे सरासरी लागतील . सोडियम बेन्झोएट चिमुटभर घालून ठेवावे.
तसा आता आंब्याचा सीझन संपत येईल, आणि त्या आधी आंब्याचे वर्षभराचे लोणचे घालायचे आहे !
| आंब्याचा सुधारस |
साखरेचा पातळसा पाक करून , त्यात वेलची पूड, केशर, काजू तुकडे, , बेदाणे, आणि हापूस आंब्याचे तुकडे घालून वरून साजूक तूप घालून पोळी सोबत द्यावे.
| साखरांबा |
१ वाटी कैरीचा कीस थोडा परतून शिजवून घ्यावा , ३ ते ४ मिनिटे लागतात. नंतर १ १/२ वाटी साखर घालून, मंद आचेवर ढवळून साखर आळे पर्यंत ठेवून उतरवावे. ४ मिनिटे सरासरी लागतील . सोडियम बेन्झोएट चिमुटभर घालून ठेवावे.
तसा आता आंब्याचा सीझन संपत येईल, आणि त्या आधी आंब्याचे वर्षभराचे लोणचे घालायचे आहे !
No comments:
Post a Comment