आज सकाळी आंब्याच्या झाडाकडे बघता बघता, मला अचानक एक घरट दिसलं!! इतकं छान वाटलं ते घरट पाहून ! आणि जवळ जाऊन डोकावून पहिल तर त्यात पक्षाने अंड पण दिलं होतं !! लगेच फोटो काढला आणि माझ्या ब्लॉग वर टाकला! बघा किती कुशलतेनं घरट बांधतात पक्षी !!
साधं गवताच्या काड्या पण गोल सुरक्षित घरट , आणि त्यात उबेसाठी कापूस, पंखांचे तुकडे ! वाह ! मानलं ह्या पक्ष्याला!!
असाच चिमणीच्या घरट्याचा आभास निर्माण करणारी चाटची रेसिपी ….
बटाटे किसून घ्यावेत, १ वाटी बटाटा कीस असेल,तर १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर आणि थोडे मीठ घालून, घट्ट मळून घ्यावे. चहाच्या स्टील च्या गाळणीला आतून हा लगदा गोल लावून,दाबून बसवावा. तसाच गरम तेलात सोडून,खरपूस तळून घ्यावा. ही घरटी थंड झाली, की त्यात भेळ, किंवा मिक्स्ड बॉईल्ड भाज्या, कॉर्न भेळ , असे कोणतेही फिलिंग भरून द्यावे. उन्हाळ्यासाठी उत्तम डिश आहे.
आज दुपारी ठीक १२ वाजून ३० मिनिटांनी बाहेर सुर्य उजेडात उ भे राहिले असता, आपली सावली आपल्या पायाच्या खाली दिसणार होती . म्हणून उठून गेले,पहिलं आणि खरच तसचं दिसलं ! हा खगोलशास्त्रीय चमत्कार! हे लहानपणी देखील आमच्या वडिलांनी दाखवल्याचं चांगलं आठवतंय!
३_४ दिवसां पूर्वी आकाशात मंगळ आणि शनि हे ग्रह दिसले. ह्यातला शनी उघड्या डोळ्याने सहसा दिसत नाही, आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ होता , म्हणून हा चमत्कार बघून आनंद वाटला . तसं धुमकेतू पण बघितला आहे, फार exciting moment असतो तो पण, कारण काही क्षणातच धुमकेतू नाहीसा होतो !!
No comments:
Post a Comment