सर्वसाधारणपणाने ध्यानसाधनेने साधक आपले ह्या विश्वातले त्याचे स्थान अथवा अस्तित्व शोधण्याचा करीत असतो. चिंतनातून माणूस आपले ईश्वररूपी विश्वाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. आपल्या भोवतालच्या परिचित व्यक्ती नेहमी एक गोष्ट सांगतात, ती म्हणजे ध्यान साधना कशी करायची,का करायची...
ध्यान साधना खालील प्रमाणे करावी....
१) शिथिल होणे म्हणजे relaxation.
आपल्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवणे. सोबतच श्वासावर लक्ष केंद्रित करणे.शरीराला शिथिल करावे, तसेच श्वास नियंत्रित करून ध्यानासाठी सज्ज व्हावे.
२) मंत्रांचा उच्चार करणे.
एखाद्या मंत्राचा पुनरुच्चार करीत राहणे. सोबतच मंत्राचा कालावधी निश्चित करणे. म्हणजे मंत्राचे एक आवर्तन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रोच्चारामध्ये एक शिस्तबद्ध शांतता राखणे. आणि मंत्रोच्चारण किती वेळासाठी करायचे हेही निश्चित करायचे.
३)मंत्राचा अर्थ समजून घेणे.
आपण म्हणत असलेल्या मंत्राचा पूर्ण आणि सम्पूर्ण अर्थ, त्यातला गर्भित अर्थ, आणि त्या मंत्राने गाठायचे उद्दिष्ट ह्या सर्वांचा विचार आपण मंत्र म्हणतांना करायचा असतो.
४)सद्सद् विवेकबुद्धी जागृत करणे.
ह्या विश्वातील प्रत्येक जीव वा वस्तू ही अणू पासून तयार झाली आहे. ह्या श्रुंखलेत मी कुठे व कुठल्या स्थानावर आहे हे माहित करून घेणे, म्हणजेच विवेक. आपल्या यःकिंचित स्थानाची झाली की माणसात विवेकबुद्धी जागृत होते. अशा प्रकारच्या विचारांची साखळी तयार होते, आणि मग मनुष्य राग,लोभ,मद, द्वेष, दुःख, मत्सर ह्या षड्रिपूंवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. आपल्या अस्तित्वाचे कारण, आणि आपले योगदान ह्याचे ज्ञान प्राप्त होताच त्या व्यक्तीमध्ये मानसिक वृद्धी होते.
५) स्वत्वाचा शोध घेणे...
आपल्याला काय माहित आहे ह्यापेक्षा काय माहित नाही ह्याची जाणीव होणे फार महत्वाचे आहे. आणि मग पुढची पायरी म्हणजे जे माहित नाही त्याचा शोध घेणे!.म्हणजेच 'स्वत्वाचा' शोध घेणे!

No comments:
Post a Comment