माझ्या हे बऱ्याच वेळा पाहण्यात आले आहे, की महिला वर्ग हा सकाळी न्याहारी किंवा ब्रेकफास्ट घेत नाही. सबब काय? तर म्हणे 'वेळच होत नाही', 'ह्यांची डब्याची घाई असते', मुलाचं करण्यात लक्षातच येत नाही ', देवपूजा झाल्या शिवाय काही खात नाही', (आणि देवपूजा कधी होते हे विचारा, की सांगतात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान!, कठीणच आहे बाबा!) ह्या महिलांना पटत की ब्रेकफास्ट केला पाहिजे, रात्रीच्या ११ ते १२ तासांच्या विश्रांती नंतर पोटाला अन्न मिळालच पाहिजे नाहीतर त्रास होतो वगैरे वगैरे…. पण …. हे असे स्वतः कडे दुर्लक्ष करून ह्यांना काय वाटत घरातले लोक ह्यांचा उदो उदो करतील? कौतुक करतील? नाही, असं काहीही होतांना दिसत नाही. माझं तर म्हणण आहे की त्यांच्या कुणाच्या हे लक्षात सुध्दा येत नसेल , म्हणजे नाहीच येत लक्षात. मग तुम्ही कशाला हुतात्मा बनता? मस्त खा, प्या, खुश रहा की!
असो,तर महिलां साठी काही झटपट ब्रेकफास्ट रेसिपीज …
रवा इडली करण्या साठी १ वाटी बारीक रवा घेऊन त्यात १ वाटी घट्ट दही, मीठ,कोथिंबीर,मिरची पेस्ट,आलं पेस्ट घालून इडली साठी पीठ भिजवावं, लागलं तर थोडं पाणी किंवा दही घालावं. आणि लगेच इडल्या बनवाव्यात. इडली बनायला १० मिनिटे लागतात. ह्याला चटणी वगैरे काही नको. खायची बस!
तिखट मिठाच्या पुऱ्या: कणिक घेऊन त्यात तिखट, मीठ, ओवा, जिरे, कोथिंबीर, पुदिना चिरून,हवी असल्यास अगदी थोडी लसूण घालून पीठ घट्ट माळून पुऱ्या तळून घ्याव्यात . शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा भाजी सोबत खाव्यात. नाहीतर नुसत्या चहा बरोबर सुध्दा मस्त तोंडाला चव आणतात.
ह्यात पालक प्युरी किंवा पाने कापून घाला. टोमेटो च्या रसात कणिक भिजवलीत तर टोमेटोच्या पुऱ्या होतील. चीज किंवा पनीर किसून टाका, गाजर, फ्लोवर, मटार , बटाटा थोडा शिजवून mash करून घाला ! कितीतरी options असतात , फक्त मनात इच्छा हवी की ब्रेकफास्ट करायचा म्हणजे करायचा!
पोहे नेहमीच केले जातात, पण ह्याच भिजवलेल्या पोह्यात थोडा उकडलेला बटाटा, कांदा,मिरची कोथिंबीर, मीठ घालून छोटे वडे करून तळून घ्यावेत, sauce सोबत खावे.
इतरांना खाऊ घालतो तर आपणही चांगला भरपेट नाश्ता करावा हेच मला सांगायचं आहे.
आणि हो, देवपूजे नंतर खायचं म्हणाल, तर कुणीतरी म्हटलेलंच आहे…आधी पोटोबा मग विठोबा…. मग हाच आदेश शिरसावंद्य मानून चालायला काय हरकत आहे? विचार करा

| मसाला रवा इडली |

No comments:
Post a Comment