''HAPPY WOMAN'S DAY'
आज खूप गाजा वाजा होतो आहे महिला सक्षमीकरणाचा, परंतु महिला पूर्वी पासून सक्षमच आहेत राहणार आहेत. कस असतं ना, सक्षम आहोत हे दाखवण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, पण सरते शेवटी सक्षम राहून बाजी मारली की आपोआपच सिद्ध होऊन जातं!
कुणी संसाराचे तुटलेले धागे गोळा करण्यासाठी सक्षम बनतात, कुणी उपेक्षितांचे दुःख करण्यासाठी सक्षम बनतात. काही जणी समाजाला दान देण्यासाठी सक्षम होतात, किंवा दान देत देत सक्षम होतात… मग ते दान कोणतंही असेल, शिक्षण, पैसा, प्रापंचिक गरजा, योग्य सल्ला, योग्य माहिती, मार्गदर्शन इत्यादी. उत्तेजन देण्यासाठी प्रेमाचा हात पाठीवर फिरवणे, किंवा निराशेला आशेचा किरण दाखवणे, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणे हे देखील सक्षम असल्याची प्रतीकंच आहेत की!
कुणी कुणी छुप्या अन्यायाला तोंड देण्यासाठी ,त्या अन्यायाच्या समोरच उभे राहून त्याच अन्यायाला प्रतिकार करीत राहतात, ते देखील सक्षमच असतात म्हणूनच ना?
तेंव्हा महिला सक्षम आहेत हे दाखवण्या साठी घराच्या बाहेरच पडलं पाहिजे असं काही गरजेचं नाही.
पण प्रश्न कुठे येतो माहिताय का? महिला सक्षम आहेत हे मान्य करता न येणे, किंवा मान्य करण्याचे टाळणे, किंवा आपला ego जोम्बाळत बसण्या साठी महिलांच्या प्रयत्नांवर पाणी फेरणे ह्या गोष्टी मुळे प्रश्न निर्माण होतात.
पण महिलांनी ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करावं आणि आपलं काम चोखपणे बजावीत पुढे जात राहावं! मग वेगळा महिला दिन साजरा कशाला करावा लागेल?
सो, आपल्या मनाचे ऐका, मन सांगेल तेच सत्य असतं हे लक्षात ठेवा आणि चांगल्या मनाने सर्वांसाठी चांगलेच करीत रहा! पुन्हा एकदा सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !

No comments:
Post a Comment