बाबा : 'बाळू, खर खर सांग, ही शंभरची नोट कुठून आणलीस ?खर सांग नाहीतर मार खाशील.'
बाळू : 'बाबा, गल्लीत पडली होती . तुम्हाला खोटं वाटत असेल, तर बघून या. एक माणूस अजूनही नोट शोधतोय!!'
हा! हा! हा! किती प्रामाणिक मुलगा आहे नाही ?
असो,तर आपल्या आंबा पुराणातले पुढचे दृश्य पहा …
काय ? लोणचं पाहून तोंडाला पाणी सुटल नां ? कालच कैरीचं ताजं , चालू चालू लोणचं केलं . कैऱ्या यायला लागल्या पासून दुसऱ्यांदा केलं !
लोणच्याचा तयार मसाला, थोडे जास्त तिखट,मीठ, आणि वरून फोडणी थंड करून घातली, की लोणचं तयार! पण थोडे विनेगर घातले,तर खार सुटायला मदत होते.
डाळ ढोकळी हा पदार्थ संध्याकाळी झटपट होण्यासारखा आहे. कालच केला आणि अक्षरशः चट झाला मिनिटातच!
आधी १/२ वाटी कणिक, १/४ वाटी बेसन,मीठ, तिखट, हळद , ओवा, कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यावी..
तुरीची डाळ शिजवून घ्यावी. तेल गरम करून , त्यात मोहरी, जिरे, हिंग,कढीपत्ता, लाल सुकी मिरची घालून, नंतर डाळ घालावी. पाणी घालुन थोडी पात्तळ करून घ्यावे. तिखट, मीठ, गोडा मसाला,गुळ , चिंच कोळ आणि कोथिंबीर घालून उकळू द्यावे .
वरील कणकीची एक मोठी पोळी लाटून, शंकरपाळे कापून उकळत्या आमटीत हळू हळू टाकीत जावे . ही फळं शिजली की वरती येतात . मग आमटी बंद करून, वरून तूप घालून थोडी कोथिंबीर पेरून गरम गरम खावी .
भाता सोबत छान लागतात.
असो, आता पुन्हा दुसरा एखादा आंब्याचा पदार्थ सुचला की लगेच बनवणार, आणि ब्लॉग वर टाकणार!

| आंब्याचे ताजे लोणचे |

No comments:
Post a Comment