चाणक्य, कौटिल्य , विष्णुगुप्त , ही सर्व नवे कुणाची ? अर्थात अर्थशास्त्रावर 'कौटिल्य अर्थशास्त्र ' ह्या महान ग्रंथाचे लेखक चाणक्य! त्यांची ही कथा म्हणजे आजच्या लूटमारी करणाऱ्या मंडळींना कानउघडणी किंवा डोळे उघडणी म्हणता येईल. आजकाल दुसऱ्या च्या जीवावर आपले कल्याण करण्याकडे कल व वाढलेला दिसतो. म्हणजे फुकट जे जे घेत येईल, ते ते घ्यावे, आपल्या खिशाला चाट न लावता, दुसऱ्याच्या खिशातून कसे लुटता येईल हे बघितले जाते. फार भयंकर परिस्थिती आहे ही फुकटेपणाची .
तर कौटिल्य जेंव्हा ह्या वरील ग्रंथाचे लेखन करीत होते,त्या वेळची ही गोष्ट आहे. एक रात्री समईच्या उजेडात लिखाण करीत बसले असता, एक विद्वान त्यांच्या सोबत काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्या साठी आले असता, चाणक्य यांनी त्यांस बसायला सांगितले. त्यांचे लेखन झाले,तसे त्यांनी समोरची समई विझवली, आणि दुसरी समई लावली . तेंव्हा त्या विद्वानांना आश्चर्य वाटले आणि ते विचारते झाले की, असे करण्याचे काय कारण ?
चाणक्य म्हणाले, 'मी अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहितो आहे, तो मी माझ्या राजा साठी लिहित आहे, आणि ह्या कामासाठी मला राजाने ही समई आणि तेल दिले आहे. हे सर्व हे राजकार्या साठीच वापरतो. तुम्ही माझ्या कडे दुसऱ्या कामासाठी आलेले आहात, जे राजकार्य नाही. म्हणून मी ही समई विझवली, आणि माझी समई लावली. ह्यातली वात आणि तेल माझ्या खर्चाने आणले आहे. '
विद्वान म्हणाले 'एवढ्याश्या खर्चाने राजाला काही नुकसान होणार का ? त्यांची समई तेल तुम्ही व्यक्तिगत कामासाठी वापरलेत हे त्यांना कळणार आहे का ? आणि कळले तरी ते तुम्हाला काही म्हणतील का ? मग हे सर्व कशा साठी ?'
तेंव्हा चाणक्य उत्तरले,' प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने असा विचार केला तर खर्च आकाशाला भिडायला वेळ नाही लागणार. आणि राजाला जरी माझे वागणे कळले नाही तरी माझ्या मनाला कळणारच की ! माझ्या मनाला हा राजद्रोह वाटतो. मग मी असे का वागावे ?' विद्वान खजील झाले!
असो, खूप बोधामृत झाले आता जरा शांत बसून मस्त थंडगार पन्ह प्यावं, हो ना ?
हे पन्हे करण्या साठी : मस्त हिरव्यागार कैऱ्या आणल्या, उकडून घेतल्या, गर काढला . १ वाटी गराला २ वाट्या साखर घालून,मिक्स करून रात्रभर ठेवून दिले. सकाळी मिक्सर मधून फिरवून घेतला, त्यामुळे त्यात रेषा किंवा गुठळ्या रहात नाहीत. शेवटी वेलची पूड,केशर पूड घातली , आणि बॉटल मध्ये ठेवून दिले.
आता पाहिजे तेंव्हा हा गर, पाणी, आणि बर्फ घातला, की गारेगार पन्हे तयार !बाजारात मिळणाऱ्या बाटलीबंद पन्ह्याला ह्या घरी केलेल्या पन्ह्याची सर नाहीच येणार !
तर कौटिल्य जेंव्हा ह्या वरील ग्रंथाचे लेखन करीत होते,त्या वेळची ही गोष्ट आहे. एक रात्री समईच्या उजेडात लिखाण करीत बसले असता, एक विद्वान त्यांच्या सोबत काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्या साठी आले असता, चाणक्य यांनी त्यांस बसायला सांगितले. त्यांचे लेखन झाले,तसे त्यांनी समोरची समई विझवली, आणि दुसरी समई लावली . तेंव्हा त्या विद्वानांना आश्चर्य वाटले आणि ते विचारते झाले की, असे करण्याचे काय कारण ?
चाणक्य म्हणाले, 'मी अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहितो आहे, तो मी माझ्या राजा साठी लिहित आहे, आणि ह्या कामासाठी मला राजाने ही समई आणि तेल दिले आहे. हे सर्व हे राजकार्या साठीच वापरतो. तुम्ही माझ्या कडे दुसऱ्या कामासाठी आलेले आहात, जे राजकार्य नाही. म्हणून मी ही समई विझवली, आणि माझी समई लावली. ह्यातली वात आणि तेल माझ्या खर्चाने आणले आहे. '
विद्वान म्हणाले 'एवढ्याश्या खर्चाने राजाला काही नुकसान होणार का ? त्यांची समई तेल तुम्ही व्यक्तिगत कामासाठी वापरलेत हे त्यांना कळणार आहे का ? आणि कळले तरी ते तुम्हाला काही म्हणतील का ? मग हे सर्व कशा साठी ?'
तेंव्हा चाणक्य उत्तरले,' प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने असा विचार केला तर खर्च आकाशाला भिडायला वेळ नाही लागणार. आणि राजाला जरी माझे वागणे कळले नाही तरी माझ्या मनाला कळणारच की ! माझ्या मनाला हा राजद्रोह वाटतो. मग मी असे का वागावे ?' विद्वान खजील झाले!
| पन्ह्यासाठी कैरीचा गर |
| आंबा पन्हे |
No comments:
Post a Comment