Sunday, 23 December 2012

1987 _ LAGNA NANTARCHYA NAVYAA VALNAVAR

१९८७  ऑगस्ट मध्ये लग्न ठरले ,आणि आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येवून ठेपले. मला आर्मी ऑफिसरशी लग्न करायचे होते,आणि तसेच होत होते. Lt .किशोर पेटकर ह्यांच्याशी माझे लग्न ठरले. ऑगस्टमध्ये   लग्न ठरले आणि नोव्हेंबर २५ १९८७ ही लग्नाची तारीख ठरली. आधी नाशिकला घरी भेट झाली आणि नंतर मध्ये फक्त एकदाच. आमच्या साखरपुड्याची गम्मत अशी की माझा साखरपुडा झाला, पण नवरा मुलगाच  हजर नव्हता! कारण त्याला सुट्टी नाही मिळाली! तर साखरपुडा झाला आणि नोव्हेंबर मध्ये पुण्यात लग्न झाले. मी  जेंव्हा जेंव्हा हा किस्सा कुणाला सांगते,तेंव्हा  पहिली प्रतिक्रिया म्हणजे "ऑ!" आणि नंतर हसू, नंतर कौतुक मिश्रित शब्दात आर्मी बद्दल बोलणे! "म्हणजे बघा, साखरपुड्या साठी देखील रजा मिळत नाही , म्हणजे आर्मी किती भारी आहे ते " असे काहीसे त्यांना म्हणायचे असते. पण मला मात्र हसू आल्याशिवाय राहत नाही!
असो लग्न अगदी पारंपारिक पध्दतीने झाले, आणि मी नाशिकला आले.नंतर  ८ दिवसा नंतर, आम्ही दोघे कोईम्बतूर (तामिळनाडू )ला गेलो.  तिथे आर्मी लाईफ "फ्रॉम  डे  वन" बघायला आणी अनुभवायला सुरुवात झाली, ते २००९च्या जानेवारीत ते रिटायर होईपर्यंत!


ज्या दिवशी आम्ही क्वार्टर वर पोहोचलो, त्याच वेळी "सुमा" नी, म्हणजे किशोर कडे असलेल्या पोमेरिअनने माझे वाईट स्वागत केले! म्हणजे तिने रागाने भुंकून स्वागत केले. स्वागत कसले, सरळ सरळ विरोध !. असो. रात्रीतून तिने माझी नवीन कोरी चप्पल फाडून ठेवली.!  हा तिने दर्शवलेला दुसरा विरोध! सकाळ झाली आणि सगळे चित्र पालटले!  मला डॉग्सची खूपच आवड आहे,  त्यामुळे मी तिचा विरोध हसण्यावारी नेला, आणि तिच्याशी मैत्री करार केला, तो पुढे १० वर्ष तसाच राहिला!सुमा  बद्दल विशेष म्हणजे तिला फक्त दूध-ब्रेड चालायचे आणि ते  नरम करून , तिला बसवून, तोंड उघडून,तिला भरवायचे! मी कधी पार्टीसाठी तयार झालेली असेन तर, तिला डायनिंग टेबल वर बसवून खायला घातली आहे, कारण ती  स्वतः कधीच कधीच नाही जेवली.  हा घास भरवण्याचा कार्यक्रम रोज दोनदा व्हायचा!
  घास भरवायला लागायचा त्याचा हा पुरावा!  

आणि हे द्रुश्य बघून  हसू आल्याशिवाय राहिले नाही, आणि इतके वर्ष मी तिची ही सेवा करते, त्याचे पण कौतुक झाले. पण मी मात्र प्रामाणिक पणे हे काम केले, आनंदाने केले.   .


      .    

सुमा एकदम रॉयल होती, कुणाच्या अध्यात मध्यात नाही, तिला कोणी नको, "मी बाई एकली आणि नको कुणाची सावली!" अशी ती होती. अलिप्त, थोडी शिष्ट, थोडी मानी पण आमच्या दोघांवर तिचा जीव. मी हिरो होंडा मोटर सायकलकोईम्बतूरला शिकले. सुमा पुढे बसून ऐटीत निघायची, तिला लोक वळून वळून  बघायचे! आधी  बाई  बाईक चालवतात, आणि त्यात टाकीवर  कुत्रा   ऐटीत बसलाय ! दोन वर्षान नंतर त्यात भानुप्रिया ची पण भर पडली, कारण तिला मी back pack मध्ये बसवून बाईकवर फिरायला न्यायची!आम्हा तिघींना बाईकवर पाहणे म्हणजे सर्वांना कौतुकाचा विषय होता  सुमाला कधीच पट्ट्याची  गरज पडली नाही. कारण ती अतिशय आज्ञाधारक होती   तिचे गुणगान गाईन  तर शब्द अपुरे पडतील असो, तर, आमच्या सुमा सारखीच चटपटीत रेसिपी खास साउथची इडली, पण चटपटीत!

मोलागापोडी इडली : छोट्या इडली पात्रात इडल्या करून घाव्यात.एका बाउल मध्ये इडल्या ,मोलागापोडी चटणी, खोवलेल खोबर  ,थोड तूप घालून,  नीट  कालवून गरम गरम वाढावे.
टिप : मोलगापोडी चटणी बाजारात रेडी मिळते GUN  POWDER chutney   ह्या नावाने मिळेल .

Wednesday, 19 December 2012

B,COM CHI DEGREE AANI MAG NOKAREE

  हडपसरला आल्यानंतर एक वर्षभर कॉलेजला जायला,  खूप त्रास व्हायला लागला आणि अभ्यास होईनासा झाला , त्यामुळे sndt  च्या होस्टेल मध्ये रहायच  ठरल.t .y . च वर्ष होस्टेलवर काढल. एखाद्या रविवारी घरी यायचे, खूप मजा यायची. होस्टेल मध्ये मैत्रिणी होत्या , शिस्तीचे वातावरण होते. रोज सकाळी लवकर उठून कॉलेजला जायला छान  वाटायचं ,कारण कॉलेज  जवळ होत. दुपारी आणि रात्री mess  मध्ये  जेवण करायचं. शिवाय कॉलेज कॅन्टीन  होतच. तिथे मैत्रिणी बरोबर गप्पा, सोबत खायला काहीतरी चमचमीत!होस्टेलच्या रेक्टर अतिशय कडक शिस्तीच्या! पण सर्वांकडे लक्ष पण द्यायच्या.होस्टेलवर कुणाच्या घरून गेस्ट आले, की त्यांच्या बरोबर खाऊ  पण यायचा. मग फराळ ! जिचा डबा  तिला चाखायला मिळाला  तरी पुष्कळ अशी परिस्थिती  व्हायची. ! होस्टेल वर रहायल्याने  बाहेरच्या जगाचे थोडेसे भान आले म्हणायला हरकत नाही.पण माझ्यां स्वभावात तसा काहीच फरक पडला नाही. उलट माझा खंबीर स्वभावच मला अनेक वेळा उपयोगी पडला.मी कधी नियम तोडले नाहीत, फालतू गोष्टी केल्या नाहीत,त्यामुळे काही त्रास न होता वर्ष निघून गेल. b.com  झाले आणि आनंद वाटला.हो, वर्षभर फ्रेंच चा कोर्स पण केला  मजा आणि आनंद  मस्ती आणि शिस्त सगळ मिळाल ,शिवाय घराचे महत्व पण मनात  पुन्हा प्रस्थापित झाले.१९८१ मध्ये पासआउट  झाले  . .  .आणि आणखीनच वेगळ्या आणि आनंदाच्या पर्वाला सुरुवात झाली.
सचिन ,नितीन, प्रमोदिनी आणि मी _माझ्या लग्नानंतरचा फोटो

आता मी नोकरीला लागले. १९८१ ते १९८७ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. ते दिवस पण मंतरलेले होते म्हणायला  हरकत नाही. स्वतंत्रपणे नोकरीचा आनंद घेतला, मिळणारा पगार उडवण्यात आनंद वाटला. दिवाळीला सगळ्यांना स्वतःच्या पैश्यातून गिफ्ट देण्याचा आनंद काही वेगळाच! तेंव्हा  मी माझ्या कमाईतून  m ८० गाडी घेतली, तो क्षण खरच सोनेरी होता. ड्रायविंग लायसन्स मिळवलं, आणि गाडीवर मनसोक्त भटकले. त्या काळी मी बाबांची lambretta  देखील चालवली! गाडीची नशा उतरता उतरत नाही हे मी अनुभवले!पुढे लग्न झाल्यावर तर  मी hero honda  चालवली! त्या गाडीची तर शानच निराळी! नुसती झिप,झिप, झूम!

 प्रिंटिंग  प्रेस, ऑटोमोबाईल  कंपनी, estate  agency ,पुस्तक प्रकाशन कंपनी, असे करत करत,१९८५ मध्ये  sndt  college मध्येच परत govt  job  मिळाला. adult  education  centre  मधली ही नोकरी म्हणजे सुवर्ण काळ  होता. नोकरीत खूप काही नवीन शिकायला मिळाल, खूप प्रवास केला, खूप लोक भेटली. आणि प्रमोदिनी  होम सायन्सला ह्याच कोलेजला होती, त्यामुळे तिच्या मैत्रिणी पण होत्या. खूप धमाल दिवस होते ते.

आणि अशाच एका धमाल रेसिपीने आजच्या ब्लॉगची सांगता करू.

कॉर्न फ्लेक्सचा चटपटा चाट :   १ वाटी कॉर्न फ्लेक्स, १/२ वाटी उकडलेल्या  बटाट्याच्या फोडी, काकडीचे तुकडे, टोमाटो चे तुकडे, कापलेला कांदा, कापलेली कोथिंबीर तळलेले दाणे, चाट मसाला, चिंच गुळाची चटणी, मीठ तिखट - सर्व वस्तू एकत्र करून, लिम्बाचा रस घालून मिक्स करून त्वरीत सर्व्ह करावे.          




.

Monday, 17 December 2012

HADAPSARCHA GHARAT - PUNYATEEL NAVIN PARV

१९८० मध्ये हडपसरला आल्या नंतर परत एका नवीन पर्वाला सुरुवात झाली अस म्हटल  तरी चालेल.मी s .y .b .com  ला sndt  college  ला admn  घेतली प्रमोदिनी ७ विला आणि सचिन नितीन ६ वीला होते,. तेंव्हाचे हडपसर म्हणजे गावठाण होते, कोणतीही सोय नाही, बस नाही, दुकान नाहीत, आजूबाजूला फक्त शेत आणि कच्ची पक्की घर. आमचीच सोसायटी  म्हणजे मोठी खूण! घराचे भूमी पूजन झाले तेंव्हा मला आठवते की १ किंवा २ रिक्षाच मिळाल्या आणि त्यां पण मुश्किलीने! सगळे जण  बाबांना म्हणाले की हे काय जंगलात घर घेतलेस ? असो. आणि हो, आम्ही ज्यांना हे घर भाड्याने दिले होते, त्यांनी पण थोडा त्रास दिला, पण शेवटी घर   आमच्या ताब्यात आले. म्हणजे इथे देखील बाबांना त्रास चुकला नाही! घरी आमच्या बरोबर  माई पण रहात होत्या, त्यामुळे मजा वाटायची. तशी आम्हाला माई दादांची सवय होतीच आणि लळा पण होता,पण आम्ही नेल्लोरला असतांनाच दादा वारले.  हो,  सांगायचं राहीलच. ज्या वेळी आम्ही पुण्याहून निघालो, तेंव्हा आजोबांची त्रीचीला घरी आलो, त्याच दिवशी संध्याकाळी  आजोबा गेल्याची तार आली. आम्ही चौघच घरी होतो. आई बाबा बाहेर गेले होते. मी थोडी घाबरले,पण  आणि आई बाबा  त्यांना तार दिली . माई  सारख्या काही तरी काम करीत असत. ताक  करणे हे त्यांचे आवडते काम., त्या तांदुळाची उकड फार चविष्ट करायच्या. रोज पेपर मधल्या बातम्या त्यांना वाचून दाखवाव्या लागत. फार मजा यायची. रेडियो वर गाणी लागली की, मान डोलावायच्या, बातम्या पण ऐकायच्या  आणि अधून मधून काही प्रतिक्रिया पण द्यायच्या. "पुष्पा, छान  लागलाय हो कार्यक्रम , ऐक " अस म्हणायच्या. माइचे तळपाय एकदम गोरेपान  आणि, अक्षरशः गुलाबी दिसत. मला तर अजून आठवल तरी नवल वाटत. माईला तिच्या बिटकी एवढ्या आंबाड्यात   फुल, गजरा  माळायला  फार आवडायच.
माई आणि मी  हडपसरच्या घरात

 माई शेवटी आजारी होती, तेंव्हा  मी ऑफिसला निघाले की काही आणू का? अस मी  रोज विचारायची,आणि ती   रोज काहीतरी पदार्थ सांगायची. आणला तर खायची मात्र अगदी थोड. असो.नंतर थोडे दिवसच सहवास मिळाला. पण माई ची तांदुळाची उकड मात्र कधीतरी करते, तेंव्हा तिची आठवण येतेच.

तेंव्हा  त्याच उकडीची कृती आज लिहिते , तिच्या सारखी  चविष्ट होत नाही पण तरी ---------

तांदुळाची उकड:

१ चमचा तूप गरम करून , त्यात किंचित जीर घालावे. नंतर १ वाटी  पाणी घालूनउकळावे . मीठ, तूप, घालावे. उकळल्या बरोबर १ वाटी  तांदुळाचे पीठ घालून ढवळून  घेत रहावे. नीट  उकड झाली, की गरम गरम वाढावी. तूप पण वाढावे. हवी असल्यास, थोडी कोथिंबीर   चिरून घालावी.

 bye !
  
  ,
  .

Sunday, 16 December 2012

ANDHRA MADHEEL 1978 CHE VAADAL

  नेल्लोर मध्ये १९७८ मध्ये प्रचंड वादळ झाले होते. पावसाचे दिवस,त्यात वादळ ! त्या संध्याकाळी १२० kms  च्या वेगाने पावसा बरोबर वादळ सुरु झाले. अचानक वादळ आले आणि सगळे घाबरून गेलो. तरी बर सगळे घरीच होतो. आमच्या घराची रचना अशी होती की बंगल्याच्या  वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. मालक खाली रहात होते, पण तेंव्हा ते मद्रासला गेलेले होते,आणि त्यांचे पाळलेले कुत्रे खाली बांधलेले असायचे. तर, ज्या संध्याकाळी वादळ सुरु झाले, तेंव्हा ह्या tommy  ला आम्ही जिन्यात बांधले आणि घरात आलो. मोठी चौकोनी बाल्कनी. एक छोटी खोली साईडला होती, आणि मेन घर होते. मेन दरवाज्यातून वादळी वार यायला लागले म्हणून, ते बंद केले. साईडच्या खोलीच्या खिडक्या बंद करण्यासाठी बाबा तिकडे गेले. आणि, latch lock  असलेले दार एकदम बंद झाले. latch  तर बाहेरून उघडणार आता. बाबा आतमध्ये अडकले. त्यांनी दरवाजा ठोकून ठोकून आम्हाला आवाज दिला. बरयाच वेळाने लक्षात आले की बाबा तिकडे अडकले! आता काय करायचे? मग मी किल्ली  घेवून घराच्या मागच्या बाजूने ,घरा   भोवती मध्यभागी जो parapet  wall  बांधलेला  होता, त्यावर उतरले, आणि धूम पाउस आणि सोबत वादळ, अशा भयंकर परिस्थितीत अक्षरशः झोपून रांगता रांगता गोल फिरून पुढच्या बाल्कनी पर्यंत आले,  वर  चढले  आणि मग दार उघडले ! माझ्या धाडसाचे फारच कौतुक झाले, पण मला तेंव्हा काहीच कळत नव्हत, फक्त बाबा दिसत होते. धाडस वगैरे आत्ता  कळले. पण मी पहिल्या पासून अशीच आहे.
मायपाडू बीच नेल्लोर

दुसऱ्या  दिवशी देखील वादळ शमले नाही, आणि आम्ही मिल्क पावडरचे दूध, आणि जे काही घरात होते त्यावर  भागवले.  दोन दिवसांनी  वादळ शामाले, आणि गाडी पूर्वपदावर आली. पण ही आठवण मात्र काल घडल्या सारखी  हकीकत वाटते.

१९८० मध्ये  आमचे हडपसर चे  घरी पुण्याला येण्याचे नक्की झालेपुण्याला ,कारण बाबांची बदली पुण्याला झाली  .
 
    

हा फोटो माझा आणि बाबांचा आहे. मथुरेचा आहे. जुनी आठवण काढलीच आहे, तर शनिवार पेठेतील एक मजेशीर  किस्सा आठवला. करंदीकर काकूंचा शिरीष हा मुलगा. शिरीष आणि शेखर असे दोघे   भाऊ आणि, जयश्री   त्यांची बहीण तर शिरीषने मला एक दिवस बोलावले आणि काहीतरी खायला दिले. चौकोनी तुकडे आणि डाळ ओळखली.    छान  लागले म्हणून सगळे  खाल्ले.  आणि मग विचारले काय होते ते? तो म्हणाला 'तू आज मासे खाल्लेस ' मला इतका राग आला त्याला खूप मारले, आणि रडत रडत घरी जावून आईला सांगितले  नंतर  कळले, की, माझी चेष्टा केली म्हणून. खरतर ती "आमटी फळ " नावाची रेसिपी होती.  तर तीच रेसिपी देते  खूप tasty  बनते. करून पहा आणि चांगली झाली तर नक्की सांगा.

आमटी फळ :   आमटी :  १ वाटी  तुरडाळ  शिजवून घ्यावी. त्यात चिंच,गूळ , मीठ  घालून पातळसर करावे तेल गरम करून , मोहरी,जिर ,हिंग, हळद, कढीपत्ता, लाल सुकी मिरची, हिरवी मिरची, घालून लाल तिखट घालून डाळीत   ओतावी ,डाळ  उकळू द्यावी .

फळ : १/२ वाटी  कणिक, १/२ वाटी  बेसन, मीठ, तिखट , हळद, ओवा,कोथिंबीर, थोडे तेल घालून घट्ट  मळुन  घ्यावे. जाड  पोळी लाटून चौकोनी तुकडे कापून वरील आमटीत  सोडावेत. झाकण ठेवून ५ मिनिटे उकळू द्यावे. तुकडे वरती आले, की झाले समजावे. कोथिंबीर, फ्रेश  नारळ खवून घालावा  गरम  वाढावे .

ही फळ  माश्यांचे तुकड्यांसारखे दिसतात , म्हणून शिरीष मला म्हणाला मासे खाल्ले!  मला हा पदार्थ मनापासून आवडतो, आणि कधीही केला की हा प्रसंग आठवून हसू आल्या शिवाय रहात नाही! .           .

आणखीन  बरच काही , पण ;परत भेटू तेंव्हा !

Tuesday, 4 December 2012

NELLORE CHE COLLEGE DAYS AANI GAMAATEE

त्रिची मधील मुक्काम हलवून आम्ही १९७८ मध्ये आंध्रा प्रदेश मधील नेल्लोर येथे गेलो. मी १०वी करून आल्यामुळे मी कॉलेज मध्ये admission साठी गेले तो  हा किस्सा फार रंजक आहे. मला खरतर ११वी ला admission  मिळायला हवी पण नजर चुकीने मला फ  स्ट  ईयर  B .com  साठी adm  दिली गेली. मी दुसऱ्या  दिवशी कॉलेज ला  गेले, आणि f .y  च्या वर्गात जावून बसले. मला तिथली सर्व मुल मुली निरखून पहात होती, आणि थोडी   विचित्र पणे observe  करतांना जाणवली, पण मी विचार केला, आपले दिसणे, ड्रेस, बरेच वेगळे असावे, म्हणून बघत असतील.  कारण, मी पाहिलं तेव्हां सगळ्या मुली तिकडच्या पारंपारिक Half -sari  किंवा साडी नेसलेल्या होत्या, आणि मी जीन्स ! आणि त्यांचे तिथले  वावरणे बरेचसे अंग चोरल्या सारखे, आणि संकोच्लेले वाटले. म्हणजे, त्या मुली अगदी जीव मुठीत धरून, भेदरलेल्या अशाच वाटत होत्या, निदान मला तरी . कारण मी म्हणजे एकदम बिंधास ! आणि त्रिची मध्ये co -ed  school  मध्ये शिकल्या मुळे , मुलांची भीती वगैरे वाटण, म्हणजे हास्यास्पदच!
V  R College नेल्लोर


माझं  कॉलेज VR college,  पहिल्या दिवशीच, पहिलेचदोन तास  accounts  चे ! सर आले आणि नवीन मुलांची  introduction  झाली, त्यात मीही आले. पण, माझी जरा जास्तच  माहिती घ्यावी लागली. पण त्यांनी मला विचारले की १०  वी तून f .y  मध्ये कशी काय आली ! पण माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते! i  was  clueless ! त्या वेळी मला पण काही तरी खटकल. असो, सर क्लास घ्यायला लागले, आणि ते म्हणायचे, 'we  have  learnt  this  last  year ! आणि पुढे जात होते. असा गोंधळ झाला! मग ऑफिस मध्ये   पुन्हा गेलो तेंव्हा  कळले की, चुकीची  adm  दिली गेली.! jr  college  ला पुन्हा adm  घ्यावी लागणार.! पण बाबांनी आणि मी प्रिन्सिपल ना भेटून हा प्रश्न कसा सोडवायचा हे विचारले. तर ते म्हणाले, की bright  student  आहे, तर, तिला  १२ th  std मध्ये adm देतो,आणि  ११ th  ची exam   internal  देणार , पण,अभ्यास खूप करावा लागणार! मी काही वेळ न घालवता  हो म्हणाले  पण त्यानंतर संपूर्ण  वर्ष म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास! पण आधीच सांगितलेले सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि  माझी नैया ११ वी आणि  १२ वीची  परीक्षा पार करून पुढे निघाले !
कामाक्षी मंदिर नेल्लोर

आंध्र प्रदेश ची एक पारंपारिक पाककृती - हैद्राबादमधील ईद निमित्त बनवला  जाणारा 'शीर कुर्मा '
शीर कुर्मा :

बदाम, काजू, खारीक, पिस्ते, १ वाटीभर घेवून, २ तास पाण्यात भिजवून ठेवावेत, आणि नंतर पातळ काप करून तळून घ्यावेत.   १/४ वाटी   सुके खोबरे काप किंवा कीस कोरडा भाजावा. २ tbsp खसखस कोरडी भाजावी.
शीर कुर्मा  बनवायच्या वेळी, २ tbsp  तुपावर १ १/२ वाटी  बारीक शेवया परतून घ्या काढून ठेवा .. ड्राय फ्रुट्स घाला. दूध गरम करून, त्यात शेवया, ड्राय फ्रुट्स,खसखस, खोबर , घालून नीट   शिजू  द्या. चारोळ्या, वेलची दाणे, केशर घालून   सर्व्ह  करावे. २ tbsp  खवा घातला तर आणखी स्वादिष्ट होतो

आणखी काही आठवणी,  पण पुन्हा केव्हा तरी! अरे हो, आजच मूगडाळीचे  लाडू केले होते. मस्त झाले!.

ह्याची रेसिपी पुन्हा केंव्हातरी!

Sunday, 2 December 2012

TIRUCHIRAPALLI CHA MUKKAM

 1975  मध्ये बाबांनी पुन्हा आर्मी जॉईन केली. आता  त्यांनी NCC  ऑफिसर  म्हणून join  केले आणि त्यांची पोस्टिंग थेट तिरुचिरापल्ली, तामिळनाडू  ला झाली.
आम्हाला  फारशी   कल्पना नव्हती की काय आहे ते पण  नवीन गावाला जायचे आहे  ते पण सर्व सामान pack  करून ! काहीतरी वेगळ वाटल पण जेव्हा  खरच ट्रेनन  प्रवास केला , तेव्हां खरी  मजा वाटली ! मी तर ट्रेनमधून  प्रत्येक  स्टेशन वर खाली उतरायची,पाणी भरून आणायची, जेवणाचे काय मिळेल ते घेवून यायची, खिडकीतून आत pass  करायची , फारच मजा   वाटायची !  कधी ट्रेन  चुकली नाही, की कोणती गडबड झाली नाही !
हळूच सुरू झालेल्या ट्रेन मध्ये चढायची मजा वेगळीच होती !माझ सगळ कामच अस होत.  मला आठवतंय, आमच्याकडे एक केन बास्केट होती, त्यात सर्व खायच्या वस्तू असायच्या. ती बास्केट म्हणजे गारुड्याची पोतडी होती, त्यातून कोणत्या वस्तू निघतील  हे फक्त आईच सांगू शकायची ! पण एक खर, भरपूर खायचो कारण ३० तासांचा प्रवास आणि १st  class चा  ६ seater  coupe असायचा त्यामुळे  सगळी जागा आपलीच!   पत्ते, लुडो,असले  काहीतरी खेळायचो नाहीतर berth  वर- खाली मस्ती आहेच ! एकदा बंद केलेला दरवाजा उघडून वरती ठेवलेल्या shirt मधून पैसे  गुल झाले होते.! तेव्हां पासून थोडे जास्त सावध रहायला लागलो ! माझी झोप फार सावध आहे आणि train  मध्ये तर खूपच सावध ! त्याचा हा पाया  बहुधा !आईची खाउची  basket  ची परंपरा मी सोडली नाही. २० वर्ष झाली लग्नाला, त्या दरम्यान जो प्रवास केला, त्यात ही basket  म्हणजे प्रवासाचे मेन आकर्षण राहिले !
निघालेत ६,सोडायला आलेत ६०!  

बर, आम्ही पुण्याला सुट्टीवर आलो की तर परत निघतांना स्टेशन वर आणखी मजा ! म्हणजे, जाणारी माणस  ६ आणि bye  करायला आलेली  माणसं  ६०! अशी गत असायची! कारण एव्हड्या लांबचा प्रवास कुणी करीत नव्हते म्हणून  सगळ्यांना  स्टेशन वर यायचे आकर्षण!

आमची खाजामलाई  कोलोनी

RSK  higher secondary school चे campus


नवीन गाव, नवीन शाळा, त्या शाळेच्या admission   साठी  केलेला खटाटोप, नवीन रस्ते, आणि मुख्य म्हणजे नवीन भाषा  ! तमिळ भाषा पहिल्यांदाच कानी पडली! म्हणजे मराठी, आणि हिंदी व्यतिरिक्त कानी पडलेली ती भाषा! पहिले तर फार मजा आली, आणि नंतर हळू हळू समजल की, तमिळ नाही बोललं  तर  काहीच convey  नाही करू शकणार! शाळेत कुणी काही तमिळ मध्ये विचारले तर पंचाईत व्यायची. मग सगळे जण  तमिळ शिकलो . आणि तमिळ इतक चांगल यायला लागल की, सचिन आणि नितीनचे भांडण  तमिळ मध्ये  व्हायचे ! आमचा मामा त्या दोघांना अस बोलायला सांगायचा आणि सगळ्यांचे भरपूर मनोरंजन व्हायचे!. तिथे लोकांची लुंगी नेसायची पध्दत हे  दोघे करून दाखवत तेव्हां सगळ्यांची   हसून पुरे वाट  व्यायची.  अशा  रीतीने आम्ही त्रिची मध्ये दोन वर्ष रहायलो. खूप मजेचे दिवस गेले ते! अजून सुद्धा ते दिवस आठवले की हसू येत आणि मन ताजतवान होत.
आमच्या शेजारच्या flat मधले आमचे शेजारी

तर south india  ची बात होते आहे तर मग एक south  indian  रेसेपी  होऊन जाउ दे.तामिळनाडू special  आहे.
पाराप्पू  पायसम: :   १ वाटी  मुगडाळ  शिजवून घ्यावी  १/२ साबूदाणा  भिजवून घ्यावा १ वाटी  नारळाचे दूध, १ वाटी  गूळ , वेलची पूड, काजू तुकडे, नारळाचे काप.
कृती:   थोडे तूप गरम करून, त्यात मुगडाळ, साबूदाणा,घालून परतून घ्यावे. नारळाचे दूध घालावे, शिजले  की गूळ  घालावा. वेलची, काजू काप, नारळाचे काप घालून तूप टाकून गरम किंवा थंड सर्व करावे .  

आता जाता जाता त्रिची शहराचे दर्शन____
श्री रंगनाथ मंदिर
rock  fort  temple
आणि  हे नवीन त्रिची शहराचे चित्र!
नवीन त्रिची! वा! 

 bye!









      .