Sunday, 16 December 2012

ANDHRA MADHEEL 1978 CHE VAADAL

  नेल्लोर मध्ये १९७८ मध्ये प्रचंड वादळ झाले होते. पावसाचे दिवस,त्यात वादळ ! त्या संध्याकाळी १२० kms  च्या वेगाने पावसा बरोबर वादळ सुरु झाले. अचानक वादळ आले आणि सगळे घाबरून गेलो. तरी बर सगळे घरीच होतो. आमच्या घराची रचना अशी होती की बंगल्याच्या  वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. मालक खाली रहात होते, पण तेंव्हा ते मद्रासला गेलेले होते,आणि त्यांचे पाळलेले कुत्रे खाली बांधलेले असायचे. तर, ज्या संध्याकाळी वादळ सुरु झाले, तेंव्हा ह्या tommy  ला आम्ही जिन्यात बांधले आणि घरात आलो. मोठी चौकोनी बाल्कनी. एक छोटी खोली साईडला होती, आणि मेन घर होते. मेन दरवाज्यातून वादळी वार यायला लागले म्हणून, ते बंद केले. साईडच्या खोलीच्या खिडक्या बंद करण्यासाठी बाबा तिकडे गेले. आणि, latch lock  असलेले दार एकदम बंद झाले. latch  तर बाहेरून उघडणार आता. बाबा आतमध्ये अडकले. त्यांनी दरवाजा ठोकून ठोकून आम्हाला आवाज दिला. बरयाच वेळाने लक्षात आले की बाबा तिकडे अडकले! आता काय करायचे? मग मी किल्ली  घेवून घराच्या मागच्या बाजूने ,घरा   भोवती मध्यभागी जो parapet  wall  बांधलेला  होता, त्यावर उतरले, आणि धूम पाउस आणि सोबत वादळ, अशा भयंकर परिस्थितीत अक्षरशः झोपून रांगता रांगता गोल फिरून पुढच्या बाल्कनी पर्यंत आले,  वर  चढले  आणि मग दार उघडले ! माझ्या धाडसाचे फारच कौतुक झाले, पण मला तेंव्हा काहीच कळत नव्हत, फक्त बाबा दिसत होते. धाडस वगैरे आत्ता  कळले. पण मी पहिल्या पासून अशीच आहे.
मायपाडू बीच नेल्लोर

दुसऱ्या  दिवशी देखील वादळ शमले नाही, आणि आम्ही मिल्क पावडरचे दूध, आणि जे काही घरात होते त्यावर  भागवले.  दोन दिवसांनी  वादळ शामाले, आणि गाडी पूर्वपदावर आली. पण ही आठवण मात्र काल घडल्या सारखी  हकीकत वाटते.

१९८० मध्ये  आमचे हडपसर चे  घरी पुण्याला येण्याचे नक्की झालेपुण्याला ,कारण बाबांची बदली पुण्याला झाली  .
 
    

हा फोटो माझा आणि बाबांचा आहे. मथुरेचा आहे. जुनी आठवण काढलीच आहे, तर शनिवार पेठेतील एक मजेशीर  किस्सा आठवला. करंदीकर काकूंचा शिरीष हा मुलगा. शिरीष आणि शेखर असे दोघे   भाऊ आणि, जयश्री   त्यांची बहीण तर शिरीषने मला एक दिवस बोलावले आणि काहीतरी खायला दिले. चौकोनी तुकडे आणि डाळ ओळखली.    छान  लागले म्हणून सगळे  खाल्ले.  आणि मग विचारले काय होते ते? तो म्हणाला 'तू आज मासे खाल्लेस ' मला इतका राग आला त्याला खूप मारले, आणि रडत रडत घरी जावून आईला सांगितले  नंतर  कळले, की, माझी चेष्टा केली म्हणून. खरतर ती "आमटी फळ " नावाची रेसिपी होती.  तर तीच रेसिपी देते  खूप tasty  बनते. करून पहा आणि चांगली झाली तर नक्की सांगा.

आमटी फळ :   आमटी :  १ वाटी  तुरडाळ  शिजवून घ्यावी. त्यात चिंच,गूळ , मीठ  घालून पातळसर करावे तेल गरम करून , मोहरी,जिर ,हिंग, हळद, कढीपत्ता, लाल सुकी मिरची, हिरवी मिरची, घालून लाल तिखट घालून डाळीत   ओतावी ,डाळ  उकळू द्यावी .

फळ : १/२ वाटी  कणिक, १/२ वाटी  बेसन, मीठ, तिखट , हळद, ओवा,कोथिंबीर, थोडे तेल घालून घट्ट  मळुन  घ्यावे. जाड  पोळी लाटून चौकोनी तुकडे कापून वरील आमटीत  सोडावेत. झाकण ठेवून ५ मिनिटे उकळू द्यावे. तुकडे वरती आले, की झाले समजावे. कोथिंबीर, फ्रेश  नारळ खवून घालावा  गरम  वाढावे .

ही फळ  माश्यांचे तुकड्यांसारखे दिसतात , म्हणून शिरीष मला म्हणाला मासे खाल्ले!  मला हा पदार्थ मनापासून आवडतो, आणि कधीही केला की हा प्रसंग आठवून हसू आल्या शिवाय रहात नाही! .           .

आणखीन  बरच काही , पण ;परत भेटू तेंव्हा !

No comments:

Post a Comment