1975 मध्ये बाबांनी पुन्हा आर्मी जॉईन केली. आता त्यांनी NCC ऑफिसर म्हणून join केले आणि त्यांची पोस्टिंग थेट तिरुचिरापल्ली, तामिळनाडू ला झाली.
आम्हाला फारशी कल्पना नव्हती की काय आहे ते पण नवीन गावाला जायचे आहे ते पण सर्व सामान pack करून ! काहीतरी वेगळ वाटल पण जेव्हा खरच ट्रेनन प्रवास केला , तेव्हां खरी मजा वाटली ! मी तर ट्रेनमधून प्रत्येक स्टेशन वर खाली उतरायची,पाणी भरून आणायची, जेवणाचे काय मिळेल ते घेवून यायची, खिडकीतून आत pass करायची , फारच मजा वाटायची ! कधी ट्रेन चुकली नाही, की कोणती गडबड झाली नाही !

हळूच सुरू झालेल्या ट्रेन मध्ये चढायची मजा वेगळीच होती !माझ सगळ कामच अस होत. मला आठवतंय, आमच्याकडे एक केन बास्केट होती, त्यात सर्व खायच्या वस्तू असायच्या. ती बास्केट म्हणजे गारुड्याची पोतडी होती, त्यातून कोणत्या वस्तू निघतील हे फक्त आईच सांगू शकायची ! पण एक खर, भरपूर खायचो कारण ३० तासांचा प्रवास आणि १st class चा ६ seater coupe असायचा त्यामुळे सगळी जागा आपलीच! पत्ते, लुडो,असले काहीतरी खेळायचो नाहीतर berth वर- खाली मस्ती आहेच ! एकदा बंद केलेला दरवाजा उघडून वरती ठेवलेल्या shirt मधून पैसे गुल झाले होते.! तेव्हां पासून थोडे जास्त सावध रहायला लागलो ! माझी झोप फार सावध आहे आणि train मध्ये तर खूपच सावध ! त्याचा हा पाया बहुधा !आईची खाउची basket ची परंपरा मी सोडली नाही. २० वर्ष झाली लग्नाला, त्या दरम्यान जो प्रवास केला, त्यात ही basket म्हणजे प्रवासाचे मेन आकर्षण राहिले !
 |
| निघालेत ६,सोडायला आलेत ६०! |
बर, आम्ही पुण्याला सुट्टीवर आलो की तर परत निघतांना स्टेशन वर आणखी मजा ! म्हणजे, जाणारी माणस ६ आणि bye करायला आलेली माणसं ६०! अशी गत असायची! कारण एव्हड्या लांबचा प्रवास कुणी करीत नव्हते म्हणून सगळ्यांना स्टेशन वर यायचे आकर्षण!
 |
| आमची खाजामलाई कोलोनी |
 |
| RSK higher secondary school चे campus |
नवीन गाव, नवीन शाळा, त्या शाळेच्या admission साठी केलेला खटाटोप, नवीन रस्ते, आणि मुख्य म्हणजे नवीन भाषा ! तमिळ भाषा पहिल्यांदाच कानी पडली! म्हणजे मराठी, आणि हिंदी व्यतिरिक्त कानी पडलेली ती भाषा! पहिले तर फार मजा आली, आणि नंतर हळू हळू समजल की, तमिळ नाही बोललं तर काहीच convey नाही करू शकणार! शाळेत कुणी काही तमिळ मध्ये विचारले तर पंचाईत व्यायची. मग सगळे जण तमिळ शिकलो . आणि तमिळ इतक चांगल यायला लागल की, सचिन आणि नितीनचे भांडण तमिळ मध्ये व्हायचे ! आमचा मामा त्या दोघांना अस बोलायला सांगायचा आणि सगळ्यांचे भरपूर मनोरंजन व्हायचे!. तिथे लोकांची लुंगी नेसायची पध्दत हे दोघे करून दाखवत तेव्हां सगळ्यांची हसून पुरे वाट व्यायची. अशा रीतीने आम्ही त्रिची मध्ये दोन वर्ष रहायलो. खूप मजेचे दिवस गेले ते! अजून सुद्धा ते दिवस आठवले की हसू येत आणि मन ताजतवान होत.
 |
| आमच्या शेजारच्या flat मधले आमचे शेजारी |
तर south india ची बात होते आहे तर मग एक south indian रेसेपी होऊन जाउ दे.तामिळनाडू special आहे.
पाराप्पू पायसम: : १ वाटी मुगडाळ शिजवून घ्यावी १/२ साबूदाणा भिजवून घ्यावा १ वाटी नारळाचे दूध, १ वाटी गूळ , वेलची पूड, काजू तुकडे, नारळाचे काप.
कृती: थोडे तूप गरम करून, त्यात मुगडाळ, साबूदाणा,घालून परतून घ्यावे. नारळाचे दूध घालावे, शिजले की गूळ घालावा. वेलची, काजू काप, नारळाचे काप घालून तूप टाकून गरम किंवा थंड सर्व करावे .
आता जाता जाता त्रिची शहराचे दर्शन____
 |
| श्री रंगनाथ मंदिर |
 |
| rock fort temple |
आणि हे नवीन त्रिची शहराचे चित्र!
 |
| नवीन त्रिची! वा! |
bye!
.
No comments:
Post a Comment