१९८० मध्ये हडपसरला आल्या नंतर परत एका नवीन पर्वाला सुरुवात झाली अस म्हटल तरी चालेल.मी s .y .b .com ला sndt college ला admn घेतली प्रमोदिनी ७ विला आणि सचिन नितीन ६ वीला होते,. तेंव्हाचे हडपसर म्हणजे गावठाण होते, कोणतीही सोय नाही, बस नाही, दुकान नाहीत, आजूबाजूला फक्त शेत आणि कच्ची पक्की घर. आमचीच सोसायटी म्हणजे मोठी खूण! घराचे भूमी पूजन झाले तेंव्हा मला आठवते की १ किंवा २ रिक्षाच मिळाल्या आणि त्यां पण मुश्किलीने! सगळे जण बाबांना म्हणाले की हे काय जंगलात घर घेतलेस ? असो. आणि हो, आम्ही ज्यांना हे घर भाड्याने दिले होते, त्यांनी पण थोडा त्रास दिला, पण शेवटी घर आमच्या ताब्यात आले. म्हणजे इथे देखील बाबांना त्रास चुकला नाही! घरी आमच्या बरोबर माई पण रहात होत्या, त्यामुळे मजा वाटायची. तशी आम्हाला माई दादांची सवय होतीच आणि लळा पण होता,पण आम्ही नेल्लोरला असतांनाच दादा वारले. हो, सांगायचं राहीलच. ज्या वेळी आम्ही पुण्याहून निघालो, तेंव्हा आजोबांची त्रीचीला घरी आलो, त्याच दिवशी संध्याकाळी आजोबा गेल्याची तार आली. आम्ही चौघच घरी होतो. आई बाबा बाहेर गेले होते. मी थोडी घाबरले,पण आणि आई बाबा त्यांना तार दिली . माई सारख्या काही तरी काम करीत असत. ताक करणे हे त्यांचे आवडते काम., त्या तांदुळाची उकड फार चविष्ट करायच्या. रोज पेपर मधल्या बातम्या त्यांना वाचून दाखवाव्या लागत. फार मजा यायची. रेडियो वर गाणी लागली की, मान डोलावायच्या, बातम्या पण ऐकायच्या आणि अधून मधून काही प्रतिक्रिया पण द्यायच्या. "पुष्पा, छान लागलाय हो कार्यक्रम , ऐक " अस म्हणायच्या. माइचे तळपाय एकदम गोरेपान आणि, अक्षरशः गुलाबी दिसत. मला तर अजून आठवल तरी नवल वाटत. माईला तिच्या बिटकी एवढ्या आंबाड्यात फुल, गजरा माळायला फार आवडायच.
माई शेवटी आजारी होती, तेंव्हा मी ऑफिसला निघाले की काही आणू का? अस मी रोज विचारायची,आणि ती रोज काहीतरी पदार्थ सांगायची. आणला तर खायची मात्र अगदी थोड. असो.नंतर थोडे दिवसच सहवास मिळाला. पण माई ची तांदुळाची उकड मात्र कधीतरी करते, तेंव्हा तिची आठवण येतेच.
तेंव्हा त्याच उकडीची कृती आज लिहिते , तिच्या सारखी चविष्ट होत नाही पण तरी ---------
तांदुळाची उकड:
१ चमचा तूप गरम करून , त्यात किंचित जीर घालावे. नंतर १ वाटी पाणी घालूनउकळावे . मीठ, तूप, घालावे. उकळल्या बरोबर १ वाटी तांदुळाचे पीठ घालून ढवळून घेत रहावे. नीट उकड झाली, की गरम गरम वाढावी. तूप पण वाढावे. हवी असल्यास, थोडी कोथिंबीर चिरून घालावी.
bye !
,
.
| माई आणि मी हडपसरच्या घरात |

No comments:
Post a Comment