हडपसरला आल्यानंतर एक वर्षभर कॉलेजला जायला, खूप त्रास व्हायला लागला आणि अभ्यास होईनासा झाला , त्यामुळे sndt च्या होस्टेल मध्ये रहायच ठरल.t .y . च वर्ष होस्टेलवर काढल. एखाद्या रविवारी घरी यायचे, खूप मजा यायची. होस्टेल मध्ये मैत्रिणी होत्या , शिस्तीचे वातावरण होते. रोज सकाळी लवकर उठून कॉलेजला जायला छान वाटायचं ,कारण कॉलेज जवळ होत. दुपारी आणि रात्री mess मध्ये जेवण करायचं. शिवाय कॉलेज कॅन्टीन होतच. तिथे मैत्रिणी बरोबर गप्पा, सोबत खायला काहीतरी चमचमीत!होस्टेलच्या रेक्टर अतिशय कडक शिस्तीच्या! पण सर्वांकडे लक्ष पण द्यायच्या.होस्टेलवर कुणाच्या घरून गेस्ट आले, की त्यांच्या बरोबर खाऊ पण यायचा. मग फराळ ! जिचा डबा तिला चाखायला मिळाला तरी पुष्कळ अशी परिस्थिती व्हायची. ! होस्टेल वर रहायल्याने बाहेरच्या जगाचे थोडेसे भान आले म्हणायला हरकत नाही.पण माझ्यां स्वभावात तसा काहीच फरक पडला नाही. उलट माझा खंबीर स्वभावच मला अनेक वेळा उपयोगी पडला.मी कधी नियम तोडले नाहीत, फालतू गोष्टी केल्या नाहीत,त्यामुळे काही त्रास न होता वर्ष निघून गेल. b.com झाले आणि आनंद वाटला.हो, वर्षभर फ्रेंच चा कोर्स पण केला मजा आणि आनंद मस्ती आणि शिस्त सगळ मिळाल ,शिवाय घराचे महत्व पण मनात पुन्हा प्रस्थापित झाले.१९८१ मध्ये पासआउट झाले . . .आणि आणखीनच वेगळ्या आणि आनंदाच्या पर्वाला सुरुवात झाली.
आता मी नोकरीला लागले. १९८१ ते १९८७ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. ते दिवस पण मंतरलेले होते म्हणायला हरकत नाही. स्वतंत्रपणे नोकरीचा आनंद घेतला, मिळणारा पगार उडवण्यात आनंद वाटला. दिवाळीला सगळ्यांना स्वतःच्या पैश्यातून गिफ्ट देण्याचा आनंद काही वेगळाच! तेंव्हा मी माझ्या कमाईतून m ८० गाडी घेतली, तो क्षण खरच सोनेरी होता. ड्रायविंग लायसन्स मिळवलं, आणि गाडीवर मनसोक्त भटकले. त्या काळी मी बाबांची lambretta देखील चालवली! गाडीची नशा उतरता उतरत नाही हे मी अनुभवले!पुढे लग्न झाल्यावर तर मी hero honda चालवली! त्या गाडीची तर शानच निराळी! नुसती झिप,झिप, झूम!
प्रिंटिंग प्रेस, ऑटोमोबाईल कंपनी, estate agency ,पुस्तक प्रकाशन कंपनी, असे करत करत,१९८५ मध्ये sndt college मध्येच परत govt job मिळाला. adult education centre मधली ही नोकरी म्हणजे सुवर्ण काळ होता. नोकरीत खूप काही नवीन शिकायला मिळाल, खूप प्रवास केला, खूप लोक भेटली. आणि प्रमोदिनी होम सायन्सला ह्याच कोलेजला होती, त्यामुळे तिच्या मैत्रिणी पण होत्या. खूप धमाल दिवस होते ते.
आणि अशाच एका धमाल रेसिपीने आजच्या ब्लॉगची सांगता करू.
कॉर्न फ्लेक्सचा चटपटा चाट : १ वाटी कॉर्न फ्लेक्स, १/२ वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, काकडीचे तुकडे, टोमाटो चे तुकडे, कापलेला कांदा, कापलेली कोथिंबीर तळलेले दाणे, चाट मसाला, चिंच गुळाची चटणी, मीठ तिखट - सर्व वस्तू एकत्र करून, लिम्बाचा रस घालून मिक्स करून त्वरीत सर्व्ह करावे.
.
| सचिन ,नितीन, प्रमोदिनी आणि मी _माझ्या लग्नानंतरचा फोटो |

No comments:
Post a Comment