मंडळी, बऱ्याच दिवसांपासून मी कोणतीच रेसिपी टाकली नाही .... माझ्या ब्लॉगचे नाव फूड इज लाईफ असे आहे, पण आता कसे आहे पहा, आपण जसे अन्न घेतो तसे आपण वागतो, बोलतो,जगतो असे म्हणतात. आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर येऊन मी थोडे निर्बंध आपणच घातले आहेत. म्हणजे गोडावर, साखरेवर, मिठावर नियंत्रण ,तसेच मैदा,चीझ,बटर, ह्यासारख्या वस्तूंवर तर संपूर्ण बंदी!(म्हणजे शक्यतोवर बरं का...हसू नका... ) एन्जॉय केलं इतके दिवस आता बास!! आणि असे अनेक संकेत आपले शरीर आपल्याला वेळोवेळी देतच असते, फक्त आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ,किंवा आपल्याला समजतच नाहीत ते इशारे... आणि एखाद्या बेसावध क्षणी एखादा आजार आपल्याला पकडतोच... मग ते इशारे, ते संकेत लक्षात येतात,आणि संबंध कळतो, पण मग उशीर झालेला असतो ना...मग धावाधाव,पळापळ, डॉकटर, औषधं वगैरे,वगैरे... तब्येत ठीक झाली की पुन्हा तेच .. येरे माझ्या मागल्या... असो.
तर कालच मी वरील सर्व नियम धाब्यावर बसवून पास्ता बनवलाच...,
पास्ता उकडून ठेवला.भांड्याला तेलाचा हात लावला म्हणजे पास्ता चिकटत नाही. उकडताना पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल आणि मीठ टाकले, पास्ता उकडून गाळणीतून गाळून पाण्याखाली मोकळा करून घेतला. ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उकडलेल्या भाज्या घालून फ्राय केले. नंतर पास्ता घालून नीट मिक्स केले.
एका बाऊल मध्ये thai green curry paste, टोमॅटो सॉस, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, क्रीम, दूध, कोथिंबीर घालून, पाणी घालून पेस्ट तयार केली, ती घातली. मिक्स केले. शेवटी कॉर्नफ्लोर पाण्यात मिक्स करून ते घालून नीट करायचे, वरून चीझ किसून घालायचे, आणि गरम गरम सर्व्ह करायचे... म्हणजे मी ते लगेच मट्ट केले!
टीप: पास्ताच्या आकारा प्रमाणे भाज्या कापाव्यात, म्हणजे डिश छान दिसते.. म्हणजे लांब पास्ता असेल तर भाज्यांचे लांब तुकडे करायचे, आणि शॉर्ट पोस्ट असेल तर भाज्यांचे चौकोनी तुकडे करायचे..
हे सगळं असलं तरी आपल्या वयानुसार, प्रकृतीनुसार, हवामानानुसार, ऋतूनुसार,जेवणाच्या वेळेनुसार आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराचे संकेत ऐकून खावे, म्हणजे मग त्रास होत नाही, हे मात्र खरं!

No comments:
Post a Comment