![]() |
| हरितालिका पूजा |
ह्या दिवसात वातावरण मंगलमय असते, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद तर आपण मागतोय, पण त्या उद्दिष्टाच्या पूर्तीकडे जाणारी वाट आपणच शोधायची, मार्गक्रमण आपणच करायचे असते. तो आपले प्रयत्न, निष्ठा, सातत्य, सचोटी, आणि मुख्य म्हणजे आपण आपल्याला हवे असलेले इप्सित साध्य करण्यासाठी स्वतःशीच किती वचनबद्ध आहोत ते बघत असतो. आणि त्यावर यशाची मात्रा अवलंबून असते.
हे साध्य ठरवण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला ओळखावे लागते. आपल्या जमेची बाजू, आपल्या कमतरता, आपल्याला उपलब्ध असलेली साधनसामग्री, आणि अशा अनेक तरतुदींची पूर्तता करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम, आणि मुख्य म्हणजे इतरांची मिळणारी साथ ह्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर, योग्य वेळी, योग्य रितीने योग्य दिशेने पाऊल उचलावे.
कधी कधी एवढे सगळे करूनही यश मिळत नाही... मग निराशा येते... पण हार नाही मानायची. पुन्हा आढावा घ्यायचा आणि काही वेगळे करून मार्गक्रमण करायचे. असे असूनही यश मिळत नाही, तेंव्हा विचार करावा की आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहोत का? तसे असेल तर आणखीन वेगळ्या विचाराने, वेगळ्या दिशेने पुन्हा प्रयत्न करावेत. कुठे ना कुठे तरी आपल्याला आपण' सापडतोच! जशी मला ह्या लिखाणात मी गवसले तसेच तुम्हाला पण तुमच्यातला 'मी' गवसू शकते...

No comments:
Post a Comment