Sunday, 22 October 2017

14) लागले परतीचे वेध!

तर अशी अशी ही ऑस्ट्रेलियाची टूर! दीड महिना कसा आणि कुठे गेला काही कळलं नाही! एकेक दिवस मजेचा, उत्साहाचा, अनेकविध रंजक, मजेशीर, माहितीपूर्ण घडामोडींनी भरलेला! Not A Single Dull Moment!  मी जे नेहमी म्हणते, की आजचा दिवस हा  कालच्या दिवसापेक्षा आणखीन उत्तम व्हावा! तसंच  काहीसं इकडे झालं! रोज काहीतरी नवीन, रोज ज्ञानात  काहीतरी भर घालणारं, रोज काहीतरी उत्साह वाढवणारं! मी अनेक प्रकारच्या सुंदर, अभिरुचीपूर्ण,ज्ञानवर्धक गोष्टींनी समृद्ध झाले हे मात्र खरे!

 माझा स्वतःवरचा ठाम विश्वास, कुठेही बिनदिक्कत, निर्भयपणे वावरण्याचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता,  नेहमी सतर्क राहण्याची सवय,आणि मुळातला धाडसी स्वभाव... अशा अनेक गोष्टींचा मला इकडे उपयोग झाला असं मला वाटतं. मला दोन तीन जणांनी विचारलं  देखील की तुम्ही ह्यापूर्वी परदेशवारी केलेली आहे का?  मी नाही म्हणल्यानंतर  त्यांना आश्चर्यच वाटलं! कारण त्यांना माझा एकूण वावरण्यातला confidence कमालीचा वाटला! कारण इथे आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मला मामानी आणि अनिरुद्धनी ट्रान्सपोर्ट बाबत समजून सांगितलं, आणि मी रोज एकटीनेच प्रवास केला! कुठेही रेस्टॉरंट मध्ये एकटीने बसावं, खावं, प्यावं, कुठेही एकटीने पायी फिरावं, दुकानं बघावीत, शॉपिंग करावं, साईट सिईंग करावं, काहीच दडपण नाही, भीती नाही, एकदम फुल्ल टु एन्जॉय!

Buddhist Temple sydney


एकदा मामा मामी सोबत buddhist temple ला गेले होते. तिथे मंदिरात पादत्राणे घालून जाता येतं, ही पाटी वाचून थोडसं वेगळ वाटलं .  पण आम्ही ही पाटी वाचून देखील चपला बाहेर काढून ठेवणे योग्य समजलो, कारण आपले संस्कार!  तिथल्या coffee shopमध्ये   chop sticks नी गरम गरम momo खाल्ले! मजा आली!

तिथल्या  लोकांचे हे वैशिष्ठ्य आहे की,  त्यांच्याकडे बघितलं, की त्यांच्यातलंच व्हायला होतं! त्या वातावरणात आपण रमून जातो! हरवून जातो. पण असं एकट्याने परका मुलुख एन्जॉय करणं सगळ्यांनाच शक्य होणार नाही, हेही तितकंच खरं आहे असो.

ऑस्ट्रेलियात आले, इथे फिरले, बराचसा प्रदेश पहिला, लोकांना जवळून [पाहिलं, अनुभवलं, आणि प्रेमात पडले मी ऑस्ट्रेलियाच्या! खूप सुंदर देश, प्रदेश, चांगली, मदतीला तत्पर माणसं, उत्तम नागरिक कसे असावे हे इकडे कळते. नियमांचे काटेकोर पालन, अन्यथा कठीण शिक्षा किंवा दंड हे इथे पहिले. टोल ब्रिज म्हणजे माणसं ,नाका, बुबी ट्रॅप सारखं आपल्याला अडकवून ठेवणं, मोठा गुन्हा केल्यासारखं टोल नाही दंडच भरतोय असं वाटण्यासारखे वातावरण,काही नाही! त्या कमानीखालून आपली गाडी गेली, की आपल्या गाडीवर लागलेला डिजिटल सेन्सर बीप करतो, आणि टोल भरल्याची डिजिटल नोंद होते, बस! डिजिटल सेन्सर नसेल तर, आपल्या घरी नोटीस येते, आणि आपण जाऊन दंडाची रक्कम भरून यायचं, बसं ! मला शेवटच्या दिवशी मामा एरपोर्टला सोडायला आला, त्या दिवशीची गम्मत सांगते म्हणजे सोदाहरण पटेल मी काय सांगते ते.... मामानी चुकून U_Turn घेतला, आणि कुठून कुणास ठाऊक, पण फटक्यास पोलीस मामा समोर हजर ! त्याने शांतपणे गाडीच्या नम्बर प्लेटचा फोटो घेतला, मामाच्या लायसेन्सचा फोटो घेतला, आणि नम्रपणे जायला सांगितलं! हा दंड त्याच्या अकाउंट मधून आपोआप वसूल होणार! झालं की नाही काम सोपं? बाचाबाची नाही, ओरडा आरडा  नाही, पोलिसांना शिवीगाळ नाही, गाडी बाजूला घ्या... वगैरे करून वेळेचा अपव्यय नाही, कामाचा खोळंबा नाही, आपल्या जानपहेचानच्या पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी नाही, कूच काही नाही!(अरेरे...)

ट्रेनमध्ये, बसेस मध्ये कितीही गर्दी असली तरी एकमेकांना धक्का  देणे,असभ्य वर्तन करणे हे गैर मानलं जातं. महिलांना आपल्या आवडीनुसार  वेशभूषा,केशभूषा करण्याचे स्वातंत्र्य आहे. कुठेही एकट्याने हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य आहे... पोलीस यंत्रणा तत्पर आणि कुशल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी  व्यवस्थाच अशी चोख करून ठेवतात की कुणाला काही गैरप्रकार करण्याचा scope फारच कमी. सर्व नागरिकांना  पायाभूत गरजा पुरवणारे सरकार आहे.शिस्त, काटेकोरपणा, कष्ट करण्याची तयारी, सर्वांना समान न्याय ह्या गोष्टी जनमानसात रुजल्या की मग रोजच्या  जगण्यासाठीचा संघर्ष संपतो आणि जीवनमान उंचावणे ह्या ध्येयपूर्तीसाठी माणसं झटायला लागतात.,सरकारी यंत्रणा ही समाजासाठी आहे ह्याचे प्रत्यंतर सगळीकडे येते

मेलबर्न मध्ये संध्याकाळी एका कॉफी शॉप मध्ये थांबले, तेंव्हा मी सेल्फी घेत होते, तर त्या मालकांचा छोटा मुलगा पण आला, आणि त्याला सेल्फी घ्यायचा होता!
melbourne


Blue Mountains Rail ride



Sydney tour by Cruise
 Cruise नी sydney शहराची शोभा पहिली. तिकडे 'VIVID sydney' नावाने एक महिनाभर tourism ला बढावा देण्यासाठी उपक्रम राबवला गेला. संपूर्ण  sydney शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी laser show केले, लोकांना आकर्षित करून अनेक प्रकारे australia चे tourism वाढविण्याचे काम केले.मी  भरपूर फिरले.  प्रवासात  लोकांशी बोलले,त्यांचे विचार ऐकले,आपल्या देशाबद्दल काही सांगितले. ऑस्ट्रेलियाचेअंतरंगाचे जवळून दर्शन झाले. सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न बघितले, आणि साधारणपणे एक देश म्हणून  ऑस्ट्रेलियाचा अंदाज आला.अर्थात, देशाच्या सर्वांगीण विकासात जनतेचा हातभार आहे. सगळीकडे  सुबत्ता,वैभव, समृद्धी असली  तरी, सर्व देशांच्या असतात तशा ह्या देशाच्याही अनेक समस्या आहेत. रोजच्या बातम्या ऐकल्या, वर्तमानपत्र वाचले की समजते .... एवढा समृद्ध देश आहे तरी बेरोजगारी आहे, पैशांसाठी अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात. ह्याच पैशांच्या हव्यासापायी अनेक गुन्हे  घडतात,त्यामुळे  गुन्हेगारीची समस्या बिकट आहे.जितकी टेक्नॉलॉजी वाढते तितकेच गुन्हे वाढतात.अनेक scam, घोटाळे देखील घडतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेतच. जितकी समृद्धी तितकीच जीवनाची अनिश्चितता,आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेची काळजी, ह्यातून अनेक मानसिक समस्याही उद्भवतात. छोट्या कुटुंबात अनेक समस्या असतात. पण तरी  चांगल्याला चांगलं म्हणावंच लागेल. 

ऑस्ट्रेलिया पाहण्यासाठी रोज लाखो पर्यटक येतात, आणि अशा सुंदर देशातील वैभव पाहतात, आनंद घेतात आणि छान आठवणींचा खजिना घेऊन परत जातात! मी पण अशीच एक पर्यटक! पण, मुक्काम संपत आला तसे परतीचे वेध लागले, घर दिसायला लागलं....

13) खाणे म्हणजे काय?

चैताली old age care मध्ये कामाला जाते.तिला फक्त तीन दिवस काम असते. कारण मग अनीशकडे पण बघावं लागतं. त्यामुळे त्या दोघांचे घरातले काम वाटलेले असते. .



तर, अनिरुद्ध कडे  अनिश सोबत मजा केली! अनिश खूप हुशार आणि गोड मुलगा आहे.
 तिथे त्याच्या   शाळेत पण जाऊन आले. खूप सारी खेळणी, खूप सारे creative काम करून घेण्याचे कसब त्यांच्या टीचर्स मध्ये दिसले. त्याने काढलेली चित्र  पहिली,तो काही काही प्रोजेक्ट्स बनवतो ते पहिले, आणि थक्क झाले! पण अनिरुद्ध त्याला खूप प्रोत्साहन देतो, त्याच्या बरोबर वेळ घालवतो. त्याला सकाळी टिफिनमध्ये छान छान पदार्थ देतो! खूप कष्ट घेतो त्याच्यासाठी. अनिश माझ्या सोबत माझ्या खोलीत झोपला पहिल्यांदा, त्या दिवशी त्याने किती मस्ती केली! कॉटवर उड्या मारल्या, हसत होता, खरचं खूप आनंद झाला त्याला.एकाच ब्लॅंकेट मध्ये झोपलो!त्याचंच त्याला फार नवल! मी त्याचे खेळ  बघितले, त्याच्या बरोबर खेळले त्यामुळे त्याला मी त्याची फ्रेंड वाटली असावी! एक comfort  level  आली होती माझ्या सोबत!
आणि माझं मुलांसोबत चांगलं जमतं हे मला चांगलंच ठाऊक आहे ना! झोपतांना किंवा इतर वेळी पण तो  खूप काही काही प्रश्न विचारायचा. तू इंडिया हुन आलीस का?, परत कधी जाणार आहेस?, मग पुन्हा इकडे कधी येणार आहेस? आणि निघाले की फार वाईट वाटायचे त्याला, इवलुसा चेहरा व्हायचा त्याचा... पण पुन्हा सोमवारी  आले,की पुन्हा मजेत असायचा. रात्री मला विचारलं की तुझ्या रूममध्ये  झोपू? मग त्याला गोष्टी वगैरे सांगितल्या. एकदा निरागसपणे मला विचारलं, "are there ghosts and  witches here ? मी म्हटले, no not at all. पुन्हा पुन्हा विचारलं,मी पुन्हा पुन्हा त्याला तेच समजून सांगितलं. मग त्याचे काय समाधान झाले कुणास ठाऊक, पण पुन्हा नाही विचारले. त्याला त्या दिवशी खूप  सांगितले,की असे काही नसते, आणि तू एकदम  strong आहेस. झोपतांना  त्याला थोपटत होते, तर त्याला फार मजा वाटली!  

 तर, अनिश सकाळी ८ वाजता शाळेत जातो. एका शनिवारी त्याच्या शाळेत सर्वांनी नाईट ड्रेस घालून जायचं होतं! मला फार मजा वाटली, कारण आपल्याकडे असे काहीच दिसत नाही.
  त्याला शाळेत  सोडून पुढे  मॉलमध्ये जायचं, सामान आणायचं, आणि घरी येऊन पदार्थ बनवायचे. चैताली प्युअर व्हेजिटेरिअन आहे, त्यामुळे  नॉन व्हेज पदार्थ बनून आम्ही तिघे खायचो. चैतालीची कामावर जायची वेळ सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत होती. त्यामुळे ती रात्री घरी येईपर्यंत, आमचे किचन स्वच्छ झालेले असायचे! ३००  वाजता अनिश घरी आला कि पुन्हा काहीतरी  बनायचे, मी तिकडे कांगारू मीट खाल्ले, पहिल्यांदा! खूप टेस्टी लागले! एकतर, मी ऑस्ट्रेलियाला जातांना २ पॉईंट अजेन्डा घेऊन गेले होते...चांगले चुंगले खाणेपिणे, आणि फिरणे, देश पाहणे! त्यामुळे  beef  आणि bacon सोडून सर्वकाही खाल्ले! भरपूर पायी फिरायचं, आणि भरपूर खायचं! जे जे दिसेल ते बघायचं!

अनिरुद्ध बरोबर फिशमार्केटला गेले होते, आणि तिथल्या फिशची व्हरायटी आणि फिशची आवक बघून हैराण झाले!
  एका sushi  shop मध्ये गेलो होतो.  एका revolving round table वर अनेक प्रकारचे सॉसेस छोट्या छोट्या बाऊलमध्ये ठेवलेले असतात. आपण आपल्या आवडीचे sushi  प्लेटमध्ये घेऊन बसायचं, मग जो सॉस आवडेल तो घ्यायचा, त्याचा आस्वाद घ्यायचा! खूपच छान अरेंजमेंट!
मी इतकी खुश झाले ते पाहून, नाहीतर  आपल्याकडे म्हणजे?... लिंबू कांदा extra ५ रुपये, extra सांबर १० रुपये, वगैरे, वगैरे...  वगैरे... खायचे सोडून माणूस वैतागून निघून जाईल असे वागायचे... पण इकडे माणूस  यावा,आणि त्याने ठरवल्यापेक्षा जास्त खाऊन  जावे, अशी धारणा! त्यातूनच हे पाहुणचाराचे चित्र उभे  राहते,आणि मन खुश होऊन जाते!

तर,अनिरुध्दकडेअसतांनाआम्ही बरेच पदार्थ बनवले, ,मजाआली! scones बनवले. कांगारू BBQ बनवले,
scones


 BBQ kangaroo meat


fish



i made these scones!
Black  rice with  gaucamole, chicken and salad! फिशचे अनेक  प्रकार,mussels oysters, lobsters,squids, खेकडे, असे अनेक प्रकार खाऊन झाले. मी TLC channel वर पाहिलेले अनेक पदार्थ मूर्तरूप घेतांना बघण्याचा आनंद काय वर्णावा? तो माझा मलाच माहित! mascarpone  cheese , goat cheese , blue cheese असे अनेक प्रकार चीझचे पहिले, चाखले !gnochi (नोकी) बनवली. smoked salmon, shrimps आणि octopus देखील खाल्ले! अख्खा crab मिठाच्या पाण्यात नुसता boil करून, त्याला तोडून तोडून आतलं मऊमऊ मीट  खाल्ले, वाह!
Sugar snaps मसाला!

Tera Mi Su!

Rice paper rolls

Waffles with maple syrup and LOTSof CREAM!

BBQ prawns and kangaroo meat  white wine!
knochi (नोकी)
एकदा mall मध्ये गेले होते, तेंव्हा हे waffles खाल्ले.वाह! काय चविष्ट होते! शिवाय भरपूर क्रीम आणि maple syrup. . पुन्हा कधी असे waffles खायला मिळतील?????
wine and cheese

Crabs, Shrimps, Ooctopus, squids


मजाच होती सगळी!सोबत थोडी वाईन ! मग काय विचारता महाराज? अजून आठवलं तरी तोंडाला पाणी सुटतं ! पण इथे आपल्याकडे नाशिकमध्ये काहीच मिळत नाही, त्यामुळे नुसत्या आठवणीवर राहायचं, झालं.. All these dishes would have cost me a BOMB if I was to eat these in a   restaurant! 

It Was a delightful and wonderful CulinaryExperience!! ह्यासाठी मी अनिरुध्दची नेहमीच आभारी राहीन हे नक्की! 

12) मेलबर्नला निरोप!



संध्याकाळी फ्लाईट होती. त्यामुळे, सर्व मंडळींचा निरोप घेऊन निघाले. मोक्ठ्या माणसांचा निरोप घेणे सोपे असते, पण लहान मुलांचा, petsचा निरोप घेणे फार अवघड असते. पण, निरोप घ्यावाच लागतो. तर रेणू, सचिन, सारा, आणि आरव सोबतच buddy, ballu सर्वांना बाय करून निघाले. सचिननी एअरपोर्ट वर सोडले. 



माझी फ्लाईट announce झाली, आणि मी भराभर पुढे जाऊन उभी राहिले. तर, तिथल्या staffनी थांबायचा इशारा केला. मग थोड्या वेळाने लोकांना सोडायला सुरुवात केली. तर आश्चर्य म्हणजे माझा पहिला नंबर होता. मी पुढे निघाले आणि मग माझ्या ही गोष्ट लक्षात आली! मी aircraf tमध्ये शिरले, तर सागळा staff पहिल्या passenger ला welcome करीत होता! मला खूप आनंद झाला! मी aircraft मध्ये पहिली passenger म्हणून कधीच चढले नव्हते, त्यामुळे मी खूप खुश झाले! लगेच, airhostess कडून एक फोटो काढून घेतला!
First passenger of my flight!

अशा रितीने मेलबर्नचा मुक्काम आटोपून पुन्हा sydneyला परत! पुन्हा नवीन प्रवास, नवीन आठवणी!

 



Saturday, 21 October 2017

11) MELBOURNE... WOW!

Sight of Melbourne from the top of a bus !!
 ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे मेलबर्नचा रेणु आणि सचिनकडचा ४ दिवसांचा मुक्काम... खूप मस्त ट्रिप झाली ती! २२ मे ला संपूर्ण दिवस मस्त आराम केला. कारण दुसऱ्या दिवशी लवकरची  फ्लाईट होती मेलबर्नची. पहाटे ६. ला निघून रेल्वेने domestic airport च्या स्टेशनवर  उतरून एअरपोर्टवर पोहोचले, check in करून ८.१५ च्या फ्लाईटने निघून १०. ३० ला मेलबर्नला पोहोचले. रेणू मला घ्यायला आली होती. एरपोर्टचे ६ मजली पार्किंग! A city in its own!  त्यांच्या घरी जायला एक ते दीड तास लागला.

 गाडी  पार्क केली, आणि त्यांच्या गार्डनमधून ,त्यांचा 'बल्लू' प्रवेश करता झाला!



बल्लू

 दोन एक मिनिटांच्या सर्वेक्षणानंतर मला त्याने clearance दिला, म्हणजे अगदी आम्ही जुने दोस्त असल्यासारखं  माझ्याबरोबर खेळायला सुरुवात झाली... भरपूर उड्या  मारून झाल्या, चावून झालं, त्याचे मनसोक्त लाड करून झाले, आणि मगच घरात गेले. तर आत आणखीन एक surprise! एक पोपट! नाव buddy ! वाह!
Buddy!
असा सुंदर, गोंडस पोपट इतक्या जवळून मी पहिल्यांदा नाही पण फार फार वर्षांनी बघत होते.! buddy ने मात्र माझ्याशी दोस्ती करण्यात थोडा वेळ घेतला... May be he was checking me out or  something! (हा..हा) असो, तर नंतर आमची पण दोघांची छान  गट्टी जमली की! buddy हातावर येऊन बसायचा, कान कुरतडायचा , मानेवर टोचे मारायचा... मजा यायची! आरवच्या synthesizer वर पायांनी  काहीबाही वाजवून पण दाखवले! एका डोळ्याने हळूच बघतो तिरका... आणि मग दुसऱ्या डोळ्याने! सकाळी सकाळी त्याला सचिन गरमगरम नाश्ता द्यायचे... microwave मध्ये मटार आणि कणसाचे दाणे गरम करून! वाह! ती वाटी बघून तर माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटले! (हा.हा) आणि नाश्ता झाला की एकदम गोड बोलायचा! इतका गोड बोलतो तो! काही काही बोलत राहतो. आरव बोलतो तसे बोलतो. रेणूशी पण 'मा', 'मा' असे बोलत राहतो, फार मजा आली मला तर. खूप हसायला यायचं! हुशार आहे buddy! त्याने मला खूप सारे आनंदाचे क्षण दिले! असो.पण माझे प्राणी मित्र ह्यावरच संपत नाही बरं ! कारण, त्यांच्या बागेत एकfish pond होता, आणि त्यात विविध रंगाचे, आकाराचे मासे पण होते! खूप छान! त्यांना पण त्यांचे खाद्य दिले की एकदम झुंबड उडायची. मजा येते पाहायला!

मेलबर्न मध्ये माझी दोन दिवसांची tour आधीच बुक केलेली होती. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बाहेर पडले, सचिन मला गाडीतून St. Paul's Cathedral ह्या पिकअप पॉइंटवर सोडणार होते. त्याप्रमाणे मी पोहोचले,
St. Paul's Cathedral
पण माझी बस थोडी उशिरा येणार असल्याचा फोने मला आला. मग मी तिकडे थोडा वेळ शॉपिंग केले! शॉपिंगला काय? काहीही बहाना लागत नाही! पुन्हा स्टॉपवर हजर! १०.०० वाजता बस आली. एक मोठे थोरले, ऐसपैस शरीरयष्टीचे, वयस्कर santa claus   सारखे दिसणारे ड्राइव्हर खाली उतरले, आमची नावं पुकारत गेले. जसे समोर कुणी गेले, कि 'Hi  there! I am Rob! How do you do?' म्हणून handshake करायचे. सर्वांचा परिचय करून घेतला, सर्व माहिती असलेली पुस्तिका प्रत्येकाला दिली.सर्वांना  गाडीत घेऊन बस चालू झाली. बस चालू झाली, आणि ड्रायव्हरची कॉमेंटरी पण सुरु झाली. ते प्रत्येक ठिकाणी पोहोचायच्या आधी थोडी माहिती देत  होते. रस्त्यात काही महत्वाचा पॉईंट असला तर जाता जाता  त्याचे देखील वर्णन करीत माहिती देत होते. आजची  Great Ocean Road ची tour होती.
City of Melbourne
 मेलबर्न शहरातून मजा बघत, शहराचे मनोहारी दर्शन घेत,आम्ही शहराच्या बाहेर पडलो, आणि लांबच लांब, सुंदर, दुतर्फा झाडांचे आच्छादन असलेल्या विस्तीर्ण रस्त्यावरून आमचा प्रवास सुरु झाला! ह्या सम्पूर्ण सौंदर्याचे मी म्हटले तसे वर्णन केवळ अशक्य.समुद्राच्या शेजारून जाणारा लांबसडक रस्ता!

Friday, 20 October 2017

10) आनंद .... भेटीगाठींचा आणि कार्यक्रमांचा!


नीला मावशी आणि मोहनकाकांना भेटून फार आनंद झाला, कारण नीलामावशीला पण मी पूर्वी भेटले   होते, पण  विस्मरण झाले हते इतकेच. पण भेट  झाली,आणि आधी म्हटलं तसं काही  वर्षांचे अंतर काही क्षणात मिटले!
नीला मावशी आणि मोहन काका



वैजू आणि नीला मावशी
नीला मावशी आणि मोहनकाका अगदी दिलखुलास माणसं! मोठं, प्रशस्त आणि  अभिरुचीपूर्ण आणि चोखंदळपणे सजवलेलं घर त्यांच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन करून देतं! त्यांचे प्रेमळ आदरातिथ्य  आणि पाहुणचार  वाखाणण्यासारखा! मोहनकाकांनी माझ्यासाठी खास BBQ पार्टी अरेंज केली !मावशीने स्वादिष्ट मेजवानी दिली! शिवाय मला इंटरनेट वरून जमत नव्हते म्हणून मोहनकाकांनी माझे  मेलबर्नचे तिकीट पण अरेंज करून दिले, त्यामुळे माझी खूप सोय झाली! त्यांच्याकडे जेंव्हा जेंव्हा गेले, हाती आनंदच घेऊन आले! अनेक वर्षांपासून ह्यांचे  सिडनी मध्ये वास्तव्य आहे. वैजूमामी आणि मामा पण सुरुवातीला ह्यांच्याकडेच  राहिले, आणि मग आपल्या स्वतःच्या घरात राहायला गेले. तसे इथे सिडनी  मध्ये अनेक मंडळी अशीच आपल्या सगेसोयऱ्यांच्या कडे काही काळ राहतात,नोकरी वा  व्यवसायात जम  बसवतात, आणि मग आपल्या परिवारासाठी घर घेऊन राहतात. आपल्याला कुणीतरी इथे पाय रोवायला मदत  केली होती, म्हणून आपले आयुष्य सुखाचे ,भरभराटीचे आणि सम्पन्न आहे ह्याची जाण ठेऊन सर्व मंडळी एकमेकांना, आणि नव्याने इकडे स्थायिक होऊ पाहणाऱ्या मंडळींना शक्यतोपरी सर्व मदत करतात. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!' खरंच, इथे जास्त दिवस राहिल्यामुळे,अनेक लोकांना भेटल्यामुळे ,त्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या कहाण्या ऐकल्यामुळे हे सर्व कळले, आणि खूप नवल  वाटले, कारण आपल्याकडे सहसा मराठी माणसांमध्ये हे असे घडतांना दिसण्याची उदाहरणे फार थोडी आहेत, असे सर्वश्रुत आहे.असो.

नीला मावशीच्या सासूबाईंना ज्या old age care homeमध्ये ठेवले होते, तिकडे जाण्याचा योग आला. इथे ह्या सर्व वयस्क मंडळींची उत्तम काळजी घेतली जाते. त्याचं जेवण खाण, स्वच्छता, औषधोपचार सर्वकाही उत्तम रीतीने केलं जातं . तिथे recreation रूम पण आहे. तिथे अनेक वृद्ध  महिला सदस्य   खेळत बसल्या होत्या. पत्ते, chess , carrom, ह्यासारखे अनेक खेळ तिथे होते. वाचण्यासाठी मासिके, वर्तमानपत्रे वगैरे पण होते. कुणी स्वयंसेवक वाचन पण  करून देत होते

 इथेच एक इंग्लंडच्या आजीबाई भेटल्या! टोपीवाल्या आजीआहेत,आणिदुसऱ्या महिला त्यांच्या कन्याआहेत.

हर्षला आणि राहुल हे दोघे सुद्धा मस्त! हर्षला कथ्थक शिकवते. तिच्या क्लासमध्ये पण मी एक दिवस गेले होते..

मजा आली! तिच्याकडे पण डिनरला गेले होते. छान मेनू आणि रुचकर जेवण! मजा आली!

सुनील आणि आरतीची पण ओळख झाली. एकदा त्या दोघांसोबत बाहेर जाण्याचा योग्य आला. तेंव्हा त्यांनी मला एका सुप्रसिद्ध फूड जॉईंट वर चिकन रोल खाण्यासाठी नेले! खूपच टेस्टी होता. खाऊन झाल्यावर मी पुढे गेले, पण त्यांच्या सोबत घालवलेला वेळ एकदम मजेत गेला! त्यांची मुलगी करिष्मा मी आले त्याच दिवशी भेटली  होती, आणि तिने माझे सामान उचलायला मदत केली होती! It was a very sweet gesture !.नंतर  एकदोनदा कार्यक्रमात पण  भेटलो.

हां.. सिडनी  मध्ये सावरकर जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, आणि त्या कार्यक्रमाला मला हजेरी लावण्याचा योग्य आला. बरेच दिवसांनी सावरकरांवर काही ऐकायला मिळणार होतं. तिथेच कार्यक्रमात मला नाशिकच्या एक गायिका गीता भेटल्या. छान वाटलं त्यांना भेटून.
सावरकर जयंती निमित्त कार्यक्रम
आणखीन पण नाशिकची एकदोन मंडळी भेटली. 'दुनिया किती छोटी आहे' ह्याचे प्रत्यंतर आले! तिथे 'मी नथुराम बोलतोय' ह्या नाटकाचा प्रवेश  श्री. शरद पोंक्षेंनी सादर केला..नंतर मध्यंतरात त्यांच्या सोबत फोटो काढला!
शरद पोंक्षें सोबत !
संबंध दिवस कार्यक्रम चालला. सावरकरांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा मिळेल असे कर्यक्रम झाले. जयोस्तुते... गाणं सुरु झालं, आणि सिडनीवासियांचं देशप्रेम उफाळून आलं! त्या दिवशी वाटलं आपण पुण्या  मुंबईतच एखाद्या कार्यक्रमात आहोत कि काय? नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण, शिवाय चहा कॉफी...   भरगच्चं आणि चविष्ट मेनू होता! आणि हो, सर्व आयोजनात, आणि खास  करून मेनू ठरवण्यात  मामाचा भलामोठा हात होता बरं ! भारतातून खास ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांबरोबरच त्या सर्व कार्यकारी  मंडळींचा पण  सत्कार झाला! मजा आली!

मी ऑस्ट्रेलियाहून निघाल्यानंतर मामीचा पण एक कार्यक्रम झाला... कालिदास जयंती.हा कार्यक्रम मला बघता आला नाही, पण ह्या कार्यक्रमाची सर्व तयारी, नियोजन वगैरे मामीच्या घरीच होतं, त्यामुळे मला पण सर्व बघता आलं.  ह्या कार्यक्रमाची पूर्वपिठीका अशी आहे की,२५ वर्षांपूर्वी मामीकडे सर्व साहित्यप्रेमी मंडळी जमायची, आणिआपले स्वरचित साहित्य  वाचून दाखवायचे, जसे कथा कथन,  नाटक, स्वगत, कविता वगैरे. मग  चर्चा व्हायच्या, आणि आणखीन काही नवीन, उत्तम करण्याची ऊर्जा त्यातून मिळत गेली. आणि तो पहिला सादरीकरणाचा दिवस हा कालिदास जयंती असा  उल्लेख कॅलेन्डरमध्ये आढळला, म्हणून तेंव्हा पासून त्याच दिवशी 'कालिदास जयंती' ह्या नावाने कार्यक्रम होऊ लागला. मग तो घरातून निघून रंगमंचावर आला, आणि  बघता बघता २५ वर्ष पूर्ण झाली! ह्या वर्षी कार्यक्रमात गेल्या २५ वर्षातले उत्तम उत्तम सादर झालेले कार्यक्रम पुन्हा होणार होते, शिवाय अनेक मान्यवरांचे सत्कारही होणार होते. पण मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, कारण तोवर मी इंडियाला परत आले होते. पण कार्यक्रम सुंदर झाला असे मला कळले...  का नाही होणार सुंदर? ज्या कार्यक्रमाला मामी आणि तिच्या सारख्या अनेक हरहुन्नरी मंडळींचे योगदान मिळाले आहे, हळू हळू छोट्याशा रोपट्याचे संवर्धन, जोपासना करून नावारूपाला आणले आहे तो कार्यक्रम यशस्वी होणारच!

मामीनी  दोन पुस्तकं पण लिहिली आहेत. मी वाचली आहेत. छान लिहिते मामी .एकूणच, साहित्यप्रेमी  आहेत दोघे मामा आणि मामी. नुसते साहित्य प्रेमी नाहीत, तर माणसांची आवड असणारे, माणसात रमणारे  आहेत.          

Thursday, 19 October 2017

9) MALLS AND BEACHES

Pattisserie  म्हणजे पेस्ट्री शॉप! अरेबाप रे! mind bogling variety of cakes , pastries, doughnuts, rolls,baklava etc. from all corners of the world! काहीकाही   वस्तूंची  नावं देखील लक्षात ठेवू शकत नाही!
फक्त बघायचं, सिलेक्ट करायचं, आणि  खायचं! बस! आनंद घ्यायचा! डोळे, मन, पोट, आणि मुख्य म्हणजे आत्मा तृप्त झाला! प्रत्येक  ठिकाणी होत होतं असं बरं का... कपड्यांच्या दुकानात, मिठाईच्या दुकानात, इतर शोभेच्या वस्तूंच्या   दुकानात...सगळीकडे.कॉफी शॉपमध्ये पण असेच व्हायचे. एवढे  विविध प्रकार  पहिले,काही चाखले, काही नुसते बघितले, मजा घेतली.Coles आणि Wool worths सारख्या मॉल ची chain आहे. प्रयेक neighbourhood मध्ये एक एक आहे. तिकडे भाराभर सगळीकडे किंवा जिकडे तिकडे दुकानं नसतात. जिकडे रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड असतो, तिकडे हे शॉपिंग मॉल, आणि इतर दुकानं असतात. तर तिथे जाऊन वस्तू आणायच्या. पण कार असल्यामुळे अगदी  सोपे जाते. एक baker, एक मेडिकल शॉप, एक barbar शॉप, काही restaurants, knick knack शॉप्स, अशा सर्व दुकानांनी सज्ज असते एक neighbourhood.  आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जागोजागी मेडिकलची दुकाने नाहीत. मेडिकल शॉप म्हणजे मोठे डिपार्टमेंटल स्टोरच असते. तिथे सर्व औषधे मिळतात.

ह्याशिवाय अनेक अद्यावत मॉल्स आहेतच. Huge malls, unlimited variety, and difficult choices! Spoilt for choices! But enjoyed every bit of it!  फार काही नाही म्हटलं तरी  भरपूर खरेदी झाली!  तिकडे सगळ्यांना गिफ्ट्स आणले ते crockery आणि गिफ्ट आयटम्सचे दुकान..Habitania  फार छान आणि भरपूर वस्तूंनी भरलेले होते. आणि  मला  छान प्रेसेंटस  मिळाल्या!  मी खुश, ... सर्व मंडळी पण खुश! सर्वांना गिफ्ट्स खूप आवडले! अर्थात माझा गिफ्ट्सचा चॉईस कधी चुकत  नाही! पण मला इकडे घरी  सर्वांसाठी मात्र मनासारख्या गिफ्ट्स नाही आणता आल्या, ही  एक  मनाला बोच आहे, त्याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे luggage च्या वजनाचे limitation! नाहीतर मी छानछान गिफ्ट्स आणल्या असत्या...असो.  अगदीच नाईलाज होता ह्याबाबतीत.

अगदी सुरुवातीला एकदा   bankstown ह्या suburb मध्ये Target mall मध्ये गेले होते. मामानी मला गाडीतून सोडलं,  १ वाजेपर्यंत घरी पोहोचून जा असं सांगितलं होतं . मी पोहोचले ४ वाजता! मामाचे BP हाय झाले ना! मी खूप हसले...त्याला म्हटलं काळजी करू नकोस, कारण सिडनी एकदम चांगलं शहर आहे, आणि लोकं पण खूप हेल्पफुल आहेत. आणि मुख्य म्हणजे मी अगदी धीट मुलगी आहे, ती पण पुण्याची! शिवाय इतकी वर्ष एकटीने बऱ्याच ठिकाणी फिरले, तेवढा अनुभव असतोच कि गाठीशी. आणि थोडं स्वतःची बुद्धी, कौशल्य, बोलण्याची धिटाई,स्वतःला  येत असलेल्या इंग्रजी भाषेचा फायदा करून घेता आला पाहीजे. आणि मुख्य म्हणजे स्वच्छंद फिरायला मिळण्याचं सुख अनुभवायचं असेल तर थोडी  मजबूत आणि खंबीर मानसिकता असायलाच हवी ना?आणि तिकडे बघितलं ना, बरेच टुरिस्ट असे बिनधास्त फिरतअसतात. सोबत maps असतात, मोठ्या ट्रॅव्हल backpack  लावून फिरतात. त्यांना बघितलं म्हणजे आणखीन हुरूप  येतो.  

मामी जिकडे कामाला जाते ती एरिया म्हणजे सुप्रसिद्ध bondai  beach ! मामी तिकडे bondai  beach council  म्हणजे थोडक्यातcivil   administrative office मध्ये काम करते.
तिकडे बीच खूप सुंदर...  स्वच्छ, नितळ पाणी, प्रदूषणमुक्त हवा


ह्या बीचवर फिरतांना अनेक प्रकारच्या वेशभूषा, केशभूषा, अनेक भाषा, अनेक संस्कृतींच्या लोकांचे दर्शन घडत जाते. कुणी एकटेदुकटे, कुणी आपल्या मित्रमैत्रिणीं समवेत, कुणी आपल्या छोट्या, सुटसुटीत परिवार सोबत...सुटसुटीत म्हणजे  नवरा_बायको किंवा पार्टनर्स, त्यांची २ ते ३ मुलं,कुणी  pram मध्ये, कुणी चालत, कुणी कडेवर! सोबत सामान पण असतं बरं... कारण तिकडे बीच जवळ बऱ्याच दुकानांतून स्विमिंग, राफ्टिंग, वगैरे वॉटर स्पोर्ट्सचे साहित्य मिळते. त्यामुळे प्रत्येका सोबत ह्यातले काही ना  काही सामान असतेच. शिवाय सोबतच्या बॅगमध्ये मुलांसाठी खाण्याचे ,मोठ्यांसाठी पिण्याचे(हा..हा..हा) सामान.हा  लवाजमा तिथे लोक स्वतःच वाहून नेतात. मग बीचवर छान जागा  शोधायची, तिथे सर्व सामान ठेवायचं, (हो, इकडे चोरीला जात नाही सामान, त्यामुळे कुणी म्हातारं  माणूस राखणीला लागत  नाही!(हशा!) आणि मग मनसोक्त पाण्यात पोहायला, बागडायला, राफ्टिंग किंवा नुसतं मजा करायला जायचं!

असचं  बीच म्हणजे Manley Beach. तिकडे  झाली...म्हणजे त्या बीचची खासियत अशी कि  इथे येणारी  मंडळी अत्यल्प वस्त्र परिधान करून, मनसोक्त  ऊन्ह अंगावर घेत  पहुडलेली असतात (आता डोळ्यासमोर लगेच चित्र आले   ना? असो, असो..)  तिकडे सगळेच अशा अवस्थेत पहुडलेले  असतांना,आम्ही दोघी म्हणजे मामी आणि मी selfie काढण्यासाठी जागा शोधात होतो, पण दर वेळी   फोटोत कुणीना कुणी  व्यक्ती येतच होती (हशा!) शेवटी एक फोटो काढलाच!
turkish  pide

Yoghurt with toppings
इथे turkish  pide  खाल्ला, चिकन खाल्ले, मस्स्त!आणि हो, इथेच एक Yoghurt Bar मध्ये गेलो. तिथे सॉफ्टी आइस्क्रीम असते तसे yoghurt साठी डिस्पेन्सर असते.  बाऊल  घ्यायचा,त्यात पाहिजे तेवढे   yoghurt  घ्यायचे, आणि तिथे असलेल्या असंख्य टेस्टचे toppings मधून आपल्याला जी जी toppings हवीत ती ती घ्यायची, आणि त्या yoghurt चा आस्वाद घ्यायचा ! वाह! लाजवाब होत ते! It was a visual and culinary delight to say the least! पुन्हा हा पदार्थ  कुठे खायला मिळेल कुणास ठाऊक?


Bondai बीचवर खायची रेलचेल! एका ठिकाणी tea and coffee kiosk वर indian masala chai लिहिले होते, म्हटलं, चला चहा पिऊन बघुयात. छान होता! नंतर पुनः एकदा गेले होते, तेंव्हा chilli coffee प्यायले. म्हणजे कॉफी होती गोड,पण मधूनच छान मिरचीची चव यायची! मस्त होती! नंतर तिथे लेबनीज, पोर्तुगाल,वगैरे अनेक  पदार्थ  पाहायला,चाखायला मिळाले. लेबनीज kurtos  (कूतोस  असा उच्चार आहे.) खाल्ले, म्हणजे मैद्याची लांबट चापटी पोळी करून, लोंखंडाच्या लाटण्यावर  गुंडाळली,आणि ओव्हनमध्ये भाजली के कुतोस! मग दालचिनी, आमंड पावडर किंवा hezalnut powder वगैरे मध्ये घोळून गरमगरम  खायचं, मस्त! सोबत chilli coffee किंवा एस्प्रेसो होतीच...बहार! ह्याच कूतोसच्या स्टॉलवर मी दोघाजणांशी सहज गप्पा मारल्या. त्यातले एक साहेब अनेक वेळा "बॉम्बे" कामानिमित्त गेल्याचे संगत होते. आणि "मद्रास"ला पण राहिलो होतो असे  म्हणाले,आणि इंडिया विषयी गप्पा सुरु झाल्या. ते खूप जाणकार वाटले. त्यांनी मोदीजीं बद्दल खूप छान मत व्यक्त केलं! He is a good leader! People all over the world are appriciating his work! Demonetization was a good move !" वगैरे अनेक गोष्टींचे कौतुक  केले...   मला इतका अभिमान   वाटला त्या दिवशी,काय  सांगू? आणि असे ४ ते ५ वेळा घडले बरं ! ट्रेनमध्ये एकदा असेच मी कुणाशीतरी बोलत होते, तेंव्हा, त्यानंतर एकदा  बसमध्ये एक म्हातारे गृहस्थ भेटले, ते पण चांगलं म्हणत होते.. म्हणजे आपल्या तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी मोदींचे   कौतुक केलेच , पण दुसऱ्या देशातील नागरिकांनी  आपल्या पंतप्रधानांचे असे कौतुक करावे हे अभिमानास्पद आहेच!