 |
| Sight of Melbourne from the top of a bus !! |
|
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे मेलबर्नचा रेणु आणि सचिनकडचा ४ दिवसांचा मुक्काम... खूप मस्त ट्रिप झाली ती! २२ मे ला संपूर्ण दिवस मस्त आराम केला. कारण दुसऱ्या दिवशी लवकरची फ्लाईट होती मेलबर्नची. पहाटे ६. ला निघून रेल्वेने domestic airport च्या स्टेशनवर उतरून एअरपोर्टवर पोहोचले, check in करून ८.१५ च्या फ्लाईटने निघून १०. ३० ला मेलबर्नला पोहोचले. रेणू मला घ्यायला आली होती. एरपोर्टचे ६ मजली पार्किंग! A city in its own! त्यांच्या घरी जायला एक ते दीड तास लागला.
गाडी पार्क केली, आणि त्यांच्या गार्डनमधून ,त्यांचा 'बल्लू' प्रवेश करता झाला!
 |
| बल्लू |
दोन एक मिनिटांच्या सर्वेक्षणानंतर मला त्याने clearance दिला, म्हणजे अगदी आम्ही जुने दोस्त असल्यासारखं माझ्याबरोबर खेळायला सुरुवात झाली... भरपूर उड्या मारून झाल्या, चावून झालं, त्याचे मनसोक्त लाड करून झाले, आणि मगच घरात गेले. तर आत आणखीन एक surprise! एक पोपट! नाव buddy ! वाह!
 |
| Buddy! |
असा सुंदर, गोंडस पोपट इतक्या जवळून मी पहिल्यांदा नाही पण फार फार वर्षांनी बघत होते.! buddy ने मात्र माझ्याशी दोस्ती करण्यात थोडा वेळ घेतला... May be he was checking me out or something! (हा..हा) असो, तर नंतर आमची पण दोघांची छान गट्टी जमली की! buddy हातावर येऊन बसायचा, कान कुरतडायचा , मानेवर टोचे मारायचा... मजा यायची! आरवच्या synthesizer वर पायांनी काहीबाही वाजवून पण दाखवले! एका डोळ्याने हळूच बघतो तिरका... आणि मग दुसऱ्या डोळ्याने! सकाळी सकाळी त्याला सचिन गरमगरम नाश्ता द्यायचे... microwave मध्ये मटार आणि कणसाचे दाणे गरम करून! वाह! ती वाटी बघून तर माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटले! (हा.हा) आणि नाश्ता झाला की एकदम गोड बोलायचा! इतका गोड बोलतो तो! काही काही बोलत राहतो. आरव बोलतो तसे बोलतो. रेणूशी पण 'मा', 'मा' असे बोलत राहतो, फार मजा आली मला तर. खूप हसायला यायचं! हुशार आहे buddy! त्याने मला खूप सारे आनंदाचे क्षण दिले! असो.पण माझे प्राणी मित्र ह्यावरच संपत नाही बरं ! कारण, त्यांच्या बागेत एकfish pond होता, आणि त्यात विविध रंगाचे, आकाराचे मासे पण होते! खूप छान! त्यांना पण त्यांचे खाद्य दिले की एकदम झुंबड उडायची. मजा येते पाहायला!
मेलबर्न मध्ये माझी दोन दिवसांची tour आधीच बुक केलेली होती. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बाहेर पडले, सचिन मला गाडीतून St. Paul's Cathedral ह्या पिकअप पॉइंटवर सोडणार होते. त्याप्रमाणे मी पोहोचले,
 |
| St. Paul's Cathedral |
पण माझी बस थोडी उशिरा येणार असल्याचा फोने मला आला. मग मी तिकडे थोडा वेळ शॉपिंग केले! शॉपिंगला काय? काहीही बहाना लागत नाही! पुन्हा स्टॉपवर हजर! १०.०० वाजता बस आली. एक मोठे थोरले, ऐसपैस शरीरयष्टीचे, वयस्कर santa claus सारखे दिसणारे ड्राइव्हर खाली उतरले, आमची नावं पुकारत गेले. जसे समोर कुणी गेले, कि 'Hi there! I am Rob! How do you do?' म्हणून handshake करायचे. सर्वांचा परिचय करून घेतला, सर्व माहिती असलेली पुस्तिका प्रत्येकाला दिली.सर्वांना गाडीत घेऊन बस चालू झाली. बस चालू झाली, आणि ड्रायव्हरची कॉमेंटरी पण सुरु झाली. ते प्रत्येक ठिकाणी पोहोचायच्या आधी थोडी माहिती देत होते. रस्त्यात काही महत्वाचा पॉईंट असला तर जाता जाता त्याचे देखील वर्णन करीत माहिती देत होते. आजची Great Ocean Road ची tour होती.
 |
| City of Melbourne |
मेलबर्न शहरातून मजा बघत, शहराचे मनोहारी दर्शन घेत,आम्ही शहराच्या बाहेर पडलो, आणि लांबच लांब, सुंदर, दुतर्फा झाडांचे आच्छादन असलेल्या विस्तीर्ण रस्त्यावरून आमचा प्रवास सुरु झाला! ह्या सम्पूर्ण सौंदर्याचे मी म्हटले तसे वर्णन केवळ अशक्य.समुद्राच्या शेजारून जाणारा लांबसडक रस्ता!
निव्व्ल अप्रतिम! सर्व दूर स्वच्छ, नितळ पाणी, फेसाळणारा समुद्र! मध्ये मध्ये अनेक ठिकाणी खाण्या पिण्यासाठी निवांत अशा जागी, लाकडी टेबलं , बाकं बनवलेली. झाडांच्या गर्दराईच्या मधोमध अशाच एका निवांत ठिकाणी आमच्यासाठी ब्रेकफास्टची सोय केलेली होती.ब्रेकफास्ट करून मार्गस्थ झालो. ह्याच पट्ट्यात अशी अनेक शानदार घरं बघायला मिळाली, ज्यांची किंमत अंदाजे ३ ते ५ million डॉलर्स आहे.
अनेक सुप्रसिद्ध नट नट्यांची , बड्या नेत्यांची, उद्योगपतींची घरे आहेत. हाय सेक्युरिटी, अद्ययावत सुखसोयीनीं युक्त घरे, तिही अशा रम्य प्रदेशात लांबूनच नयनसुख घेत(?) आम्ही पुढे निघालो.त्यानंतर पुन्हा गाडी लंच ब्रेकसाठी थांबली. Apollo Bay ह्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये आमच्या लंचची सोय होती. Stir fried vegs with rice मस्त चविष्ट भोजन झाले! नंतर तिथेच थोडी शॉपिंग केली
Rain forest एरिया आहे, इथे कांगारू पहिले. मजा आली...
एक एक स्वप्न पूर्ण होत होते. पुढे जाऊन Twelve Apostles बघितले. समुद्रामध्ये १२ उंच सुळके आहेत अगदी जवळ जवळ. त्यातले आता फक्त ८ शिल्लक आहेत.
 |
| The Twelve Apostles |
इथून मग परत पिकअप पॉईंटवर मेलबर्नला सोडून दिलं. समोरच 'Shindler;s Street' रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडून रेणूच्या घरी 'Glen waverly' स्टेशनला पोहोचले, तिथे सचिन मला घरी नेण्यासाठी आले होते.
दुसऱ्या दिवशी मी glen waverlyहून रेल्वेने St. Paul's Cathedral वर आले, आणि टूरच्या दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरु झाला. आजची टूर मेलबर्न सिटी मध्ये जास्त होती.
 |
| Pirates of the Carribean Island |
. 'Maru Animal Park' मध्ये गेलो, आणि सगळे प्राणी पाहायला मिळाले. Kakatoos, woombats, woolabees आणि koala सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळाले.
इथे लंच मध्ये चिकन हॉटडॉग, सलाड,आणि चहा कॉफी! ,आणि नंतर चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं ! तिथे गेल्यावर, तिथल्या floor manager ने आम्हाला फॅक्टरीचा परिचय दिला, सोबतच भरपुर चॉकलेट्स दिली, मग सगळे खरेदीमध्ये व्यस्त झाले!
ह्यानंतर wooloomai beach वर गेलो, थंड गार वारं , सोबतच छान ऊन! अजब कॉम्बिनेशन होतं! पण मजा आली!
ह्यानंतर St. Phillip Island कडे गाडी निघाली. तिकडे रॉक आयलंड म्हणजे खडकांतून अनेक शिल्प होती,ते पाहिलं.
आणि ह्यानंतर दिवसाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे penguin parade पाहण्यासाठी निघालो!


समुद्रा जवळ अनेक ठिकाणी अनेक छोटे छोटे लाकडी बॉक्स आहेत, त्यात संध्याकाळी penguin येतात, राहतात आणि सकाळी पुन्हा समुद्रात जातात. penguin ची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रजातीची संख्या वाढवण्यासाठी सरकारी उपक्रम आहे. ते बघितलं, आणि आता खरे penguin बघण्यासाठी निघालो. तिकडे एक मोठे centre आहे जिथे penguin बघण्याची विशेष व्यवस्था आहे. पण इकडे आत शिरल्यावर तर एखाद्या मॉल मध्ये आल्यासारखेच वाटले! souveniers ची दुकानं, soft toys खाण्या पिण्याची दुकाने तर होतीच. इथे penguin समुद्रा काठी येण्याची वेळ असते तेंव्हाच लोकं येतात. त्या दिवशी तिथल्या हवामानुसार संध्याकाळी ६ च्या सुमारास penguin यायला सुरुवात होणार होती. तिकडे बोर्डवरती हे टाईमिंग दाखवतात! त्या दिवशी किती penguin अपेक्षित आहेत त्यांची संख्या पण दर्शवलेली असते! मला जरा नवलच वाटलं! असो. तर, इथे मंडळी लवकर जमा होतात. त्यांच्या लवकर डिनर करण्याच्या सवयी प्रमाणे तिथल्या रेस्टॉरंट मध्ये मजेत जेवण घेतात, ड्रिंक्स घेतात, शॉपिंग करतात, आणि मग हळूहळू penguin बघण्यासाठी स्टँड्स कडे जातात.जाण्यासाठी लाकडी फळ्यांचा रास्ता केलेला आहे. त्यावरून गेलं की भरपूर कट्टे आहेत स्टेडियम सारखे. तिथे बसले, आणि जसा अंधार पडला, हळूहळू penguins यायला सुरुवात झाली! पाण्यातून दहा बारा येणार, काठावर, खडकावर थांबणार, आणि मग अक्षरशः army precision नी एकामागोमाग एक असे लुटूलुटू चालत स्टॅंडकडे येतात, आणि त्यांच्यासाठी केलेल्या गार्डन सारख्या जागेतून पुढे जात राहतात. तिथे फोटो काढायला परवानगी नाही, खाली उतरून त्यांच्या जवळ जायला परवानगी नाही. इतकं छान वाटलं ते दृश्य पाहून! असे सारखे येतच राहतात! बऱ्याच वेळेपर्यंत येतात.

मग लाकडी पायवाटेने परत जातांना ते बाजूबाजूने जात असतात ते दिसतात. लोकं , लहान मुलं सगळेच त्यांना पाहण्यात गुंग होतात, हसतात, मजा घेतात! आणखीन एक स्वप्न पूर्ण झाले!
सिडनी म्हणजे मुंबई, आणि मेलबर्न म्हणजे पुणे! सिडनीमध्ये सतत गडबड, धावपळ,ट्रेन पकड, कामावर जा, पुन्हा घरी या... असे फास्ट लाईफ! मेलबर्न थोडे स्लो.. इथे जुन्या पध्द्तीची घरं, थोडे आरामशीर जीवन वगैरे बघायला मिळते.
हा मेलबर्न मधल्या एका लोकॅलिटी मधल्या जुन्या पद्धतीच्या घराचा बसमधून मी टिपलेला फोटो! असे अनेक antic homes ओळीने होते! किती मजा वाटली!आपल्याकडचे चांगल्या स्थितीतले, जतन केलेले, सुंदर वाडे बघतांना वाटतो ना आनंद, अगदी तसाच!
सिडनी मध्ये circular quey (सर्क्युलर की) , town hall , central अशा काही suburbs मध्ये एकदम मुंबईच्या फोर्ट वगैरे भागासारखे वातावरण असते. सतत गजबजलेले! इतर suburbs मध्ये थोडे शांत असते, पण लोक ह्याच suburbs मध्ये कामासाठी येतात . तर अशा सुंदर वातावरणात तो दिवस संपला! पुन्हा ट्रेनने घरी आले.
तर अशा सुंदर वातावरणात तो दिवस संपला! पुन्हा ट्रेनने घरी आले.
No comments:
Post a Comment