संध्याकाळी फ्लाईट होती.
त्यामुळे, सर्व मंडळींचा निरोप घेऊन निघाले. मोक्ठ्या माणसांचा निरोप घेणे सोपे
असते, पण लहान मुलांचा, petsचा निरोप घेणे फार अवघड असते. पण, निरोप घ्यावाच
लागतो. तर रेणू, सचिन, सारा, आणि आरव सोबतच buddy, ballu सर्वांना बाय करून
निघाले. सचिननी एअरपोर्ट वर सोडले.
माझी फ्लाईट announce झाली,
आणि मी भराभर पुढे जाऊन उभी राहिले. तर, तिथल्या staffनी थांबायचा इशारा केला. मग
थोड्या वेळाने लोकांना सोडायला सुरुवात केली. तर आश्चर्य म्हणजे माझा पहिला नंबर
होता. मी पुढे निघाले आणि मग माझ्या ही गोष्ट लक्षात आली! मी aircraf tमध्ये शिरले,
तर सागळा staff पहिल्या passenger ला welcome करीत होता! मला खूप आनंद झाला! मी
aircraft मध्ये पहिली passenger म्हणून कधीच चढले नव्हते, त्यामुळे मी खूप खुश
झाले! लगेच, airhostess कडून एक फोटो काढून घेतला!
![]() |
| First passenger of my flight! |
अशा रितीने मेलबर्नचा मुक्काम आटोपून पुन्हा sydneyला परत! पुन्हा नवीन प्रवास, नवीन आठवणी!



No comments:
Post a Comment