Pattisserie म्हणजे पेस्ट्री शॉप! अरेबाप रे! mind bogling variety of cakes , pastries, doughnuts, rolls,baklava etc. from all corners of the world! काहीकाही वस्तूंची नावं देखील लक्षात ठेवू शकत नाही!
फक्त बघायचं, सिलेक्ट करायचं, आणि खायचं! बस! आनंद घ्यायचा! डोळे, मन, पोट, आणि मुख्य म्हणजे आत्मा तृप्त झाला! प्रत्येक ठिकाणी होत होतं असं बरं का... कपड्यांच्या दुकानात, मिठाईच्या दुकानात, इतर शोभेच्या वस्तूंच्या दुकानात...सगळीकडे.कॉफी शॉपमध्ये पण असेच व्हायचे. एवढे विविध प्रकार पहिले,काही चाखले, काही नुसते बघितले, मजा घेतली.Coles आणि Wool worths सारख्या मॉल ची chain आहे. प्रयेक neighbourhood मध्ये एक एक आहे. तिकडे भाराभर सगळीकडे किंवा जिकडे तिकडे दुकानं नसतात. जिकडे रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड असतो, तिकडे हे शॉपिंग मॉल, आणि इतर दुकानं असतात. तर तिथे जाऊन वस्तू आणायच्या. पण कार असल्यामुळे अगदी सोपे जाते. एक baker, एक मेडिकल शॉप, एक barbar शॉप, काही restaurants, knick knack शॉप्स, अशा सर्व दुकानांनी सज्ज असते एक neighbourhood. आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जागोजागी मेडिकलची दुकाने नाहीत. मेडिकल शॉप म्हणजे मोठे डिपार्टमेंटल स्टोरच असते. तिथे सर्व औषधे मिळतात.
ह्याशिवाय अनेक अद्यावत मॉल्स आहेतच. Huge malls, unlimited variety, and difficult choices! Spoilt for choices! But enjoyed every bit of it! फार काही नाही म्हटलं तरी भरपूर खरेदी झाली! तिकडे सगळ्यांना गिफ्ट्स आणले ते crockery आणि गिफ्ट आयटम्सचे दुकान..Habitania फार छान आणि भरपूर वस्तूंनी भरलेले होते. आणि मला छान प्रेसेंटस मिळाल्या! मी खुश, ... सर्व मंडळी पण खुश! सर्वांना गिफ्ट्स खूप आवडले! अर्थात माझा गिफ्ट्सचा चॉईस कधी चुकत नाही! पण मला इकडे घरी सर्वांसाठी मात्र मनासारख्या गिफ्ट्स नाही आणता आल्या, ही एक मनाला बोच आहे, त्याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे luggage च्या वजनाचे limitation! नाहीतर मी छानछान गिफ्ट्स आणल्या असत्या...असो. अगदीच नाईलाज होता ह्याबाबतीत.
अगदी सुरुवातीला एकदा bankstown ह्या suburb मध्ये Target mall मध्ये गेले होते. मामानी मला गाडीतून सोडलं, १ वाजेपर्यंत घरी पोहोचून जा असं सांगितलं होतं . मी पोहोचले ४ वाजता! मामाचे BP हाय झाले ना! मी खूप हसले...त्याला म्हटलं काळजी करू नकोस, कारण सिडनी एकदम चांगलं शहर आहे, आणि लोकं पण खूप हेल्पफुल आहेत. आणि मुख्य म्हणजे मी अगदी धीट मुलगी आहे, ती पण पुण्याची! शिवाय इतकी वर्ष एकटीने बऱ्याच ठिकाणी फिरले, तेवढा अनुभव असतोच कि गाठीशी. आणि थोडं स्वतःची बुद्धी, कौशल्य, बोलण्याची धिटाई,स्वतःला येत असलेल्या इंग्रजी भाषेचा फायदा करून घेता आला पाहीजे. आणि मुख्य म्हणजे स्वच्छंद फिरायला मिळण्याचं सुख अनुभवायचं असेल तर थोडी मजबूत आणि खंबीर मानसिकता असायलाच हवी ना?आणि तिकडे बघितलं ना, बरेच टुरिस्ट असे बिनधास्त फिरतअसतात. सोबत maps असतात, मोठ्या ट्रॅव्हल backpack लावून फिरतात. त्यांना बघितलं म्हणजे आणखीन हुरूप येतो.
मामी जिकडे कामाला जाते ती एरिया म्हणजे सुप्रसिद्ध bondai beach ! मामी तिकडे bondai beach council म्हणजे थोडक्यातcivil administrative office मध्ये काम करते.
तिकडे बीच खूप सुंदर... स्वच्छ, नितळ पाणी, प्रदूषणमुक्त हवा
ह्या बीचवर फिरतांना अनेक प्रकारच्या वेशभूषा, केशभूषा, अनेक भाषा, अनेक संस्कृतींच्या लोकांचे दर्शन घडत जाते. कुणी एकटेदुकटे, कुणी आपल्या मित्रमैत्रिणीं समवेत, कुणी आपल्या छोट्या, सुटसुटीत परिवार सोबत...सुटसुटीत म्हणजे नवरा_बायको किंवा पार्टनर्स, त्यांची २ ते ३ मुलं,कुणी pram मध्ये, कुणी चालत, कुणी कडेवर! सोबत सामान पण असतं बरं... कारण तिकडे बीच जवळ बऱ्याच दुकानांतून स्विमिंग, राफ्टिंग, वगैरे वॉटर स्पोर्ट्सचे साहित्य मिळते. त्यामुळे प्रत्येका सोबत ह्यातले काही ना काही सामान असतेच. शिवाय सोबतच्या बॅगमध्ये मुलांसाठी खाण्याचे ,मोठ्यांसाठी पिण्याचे(हा..हा..हा) सामान.हा लवाजमा तिथे लोक स्वतःच वाहून नेतात. मग बीचवर छान जागा शोधायची, तिथे सर्व सामान ठेवायचं, (हो, इकडे चोरीला जात नाही सामान, त्यामुळे कुणी म्हातारं माणूस राखणीला लागत नाही!(हशा!) आणि मग मनसोक्त पाण्यात पोहायला, बागडायला, राफ्टिंग किंवा नुसतं मजा करायला जायचं!
असचं बीच म्हणजे Manley Beach. तिकडे झाली...म्हणजे त्या बीचची खासियत अशी कि इथे येणारी मंडळी अत्यल्प वस्त्र परिधान करून, मनसोक्त ऊन्ह अंगावर घेत पहुडलेली असतात (आता डोळ्यासमोर लगेच चित्र आले ना? असो, असो..) तिकडे सगळेच अशा अवस्थेत पहुडलेले असतांना,आम्ही दोघी म्हणजे मामी आणि मी selfie काढण्यासाठी जागा शोधात होतो, पण दर वेळी फोटोत कुणीना कुणी व्यक्ती येतच होती (हशा!) शेवटी एक फोटो काढलाच!
इथे turkish pide खाल्ला, चिकन खाल्ले, मस्स्त!आणि हो, इथेच एक Yoghurt Bar मध्ये गेलो. तिथे सॉफ्टी आइस्क्रीम असते तसे yoghurt साठी डिस्पेन्सर असते. बाऊल घ्यायचा,त्यात पाहिजे तेवढे yoghurt घ्यायचे, आणि तिथे असलेल्या असंख्य टेस्टचे toppings मधून आपल्याला जी जी toppings हवीत ती ती घ्यायची, आणि त्या yoghurt चा आस्वाद घ्यायचा ! वाह! लाजवाब होत ते! It was a visual and culinary delight to say the least! पुन्हा हा पदार्थ कुठे खायला मिळेल कुणास ठाऊक?
Bondai बीचवर खायची रेलचेल! एका ठिकाणी tea and coffee kiosk वर indian masala chai लिहिले होते, म्हटलं, चला चहा पिऊन बघुयात. छान होता! नंतर पुनः एकदा गेले होते, तेंव्हा chilli coffee प्यायले. म्हणजे कॉफी होती गोड,पण मधूनच छान मिरचीची चव यायची! मस्त होती! नंतर तिथे लेबनीज, पोर्तुगाल,वगैरे अनेक पदार्थ पाहायला,चाखायला मिळाले. लेबनीज kurtos (कूतोस असा उच्चार आहे.) खाल्ले, म्हणजे मैद्याची लांबट चापटी पोळी करून, लोंखंडाच्या लाटण्यावर गुंडाळली,आणि ओव्हनमध्ये भाजली के कुतोस! मग दालचिनी, आमंड पावडर किंवा hezalnut powder वगैरे मध्ये घोळून गरमगरम खायचं, मस्त! सोबत chilli coffee किंवा एस्प्रेसो होतीच...बहार! ह्याच कूतोसच्या स्टॉलवर मी दोघाजणांशी सहज गप्पा मारल्या. त्यातले एक साहेब अनेक वेळा "बॉम्बे" कामानिमित्त गेल्याचे संगत होते. आणि "मद्रास"ला पण राहिलो होतो असे म्हणाले,आणि इंडिया विषयी गप्पा सुरु झाल्या. ते खूप जाणकार वाटले. त्यांनी मोदीजीं बद्दल खूप छान मत व्यक्त केलं! He is a good leader! People all over the world are appriciating his work! Demonetization was a good move !" वगैरे अनेक गोष्टींचे कौतुक केले... मला इतका अभिमान वाटला त्या दिवशी,काय सांगू? आणि असे ४ ते ५ वेळा घडले बरं ! ट्रेनमध्ये एकदा असेच मी कुणाशीतरी बोलत होते, तेंव्हा, त्यानंतर एकदा बसमध्ये एक म्हातारे गृहस्थ भेटले, ते पण चांगलं म्हणत होते.. म्हणजे आपल्या तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी मोदींचे कौतुक केलेच , पण दुसऱ्या देशातील नागरिकांनी आपल्या पंतप्रधानांचे असे कौतुक करावे हे अभिमानास्पद आहेच!
फक्त बघायचं, सिलेक्ट करायचं, आणि खायचं! बस! आनंद घ्यायचा! डोळे, मन, पोट, आणि मुख्य म्हणजे आत्मा तृप्त झाला! प्रत्येक ठिकाणी होत होतं असं बरं का... कपड्यांच्या दुकानात, मिठाईच्या दुकानात, इतर शोभेच्या वस्तूंच्या दुकानात...सगळीकडे.कॉफी शॉपमध्ये पण असेच व्हायचे. एवढे विविध प्रकार पहिले,काही चाखले, काही नुसते बघितले, मजा घेतली.Coles आणि Wool worths सारख्या मॉल ची chain आहे. प्रयेक neighbourhood मध्ये एक एक आहे. तिकडे भाराभर सगळीकडे किंवा जिकडे तिकडे दुकानं नसतात. जिकडे रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड असतो, तिकडे हे शॉपिंग मॉल, आणि इतर दुकानं असतात. तर तिथे जाऊन वस्तू आणायच्या. पण कार असल्यामुळे अगदी सोपे जाते. एक baker, एक मेडिकल शॉप, एक barbar शॉप, काही restaurants, knick knack शॉप्स, अशा सर्व दुकानांनी सज्ज असते एक neighbourhood. आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जागोजागी मेडिकलची दुकाने नाहीत. मेडिकल शॉप म्हणजे मोठे डिपार्टमेंटल स्टोरच असते. तिथे सर्व औषधे मिळतात.
ह्याशिवाय अनेक अद्यावत मॉल्स आहेतच. Huge malls, unlimited variety, and difficult choices! Spoilt for choices! But enjoyed every bit of it! फार काही नाही म्हटलं तरी भरपूर खरेदी झाली! तिकडे सगळ्यांना गिफ्ट्स आणले ते crockery आणि गिफ्ट आयटम्सचे दुकान..Habitania फार छान आणि भरपूर वस्तूंनी भरलेले होते. आणि मला छान प्रेसेंटस मिळाल्या! मी खुश, ... सर्व मंडळी पण खुश! सर्वांना गिफ्ट्स खूप आवडले! अर्थात माझा गिफ्ट्सचा चॉईस कधी चुकत नाही! पण मला इकडे घरी सर्वांसाठी मात्र मनासारख्या गिफ्ट्स नाही आणता आल्या, ही एक मनाला बोच आहे, त्याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे luggage च्या वजनाचे limitation! नाहीतर मी छानछान गिफ्ट्स आणल्या असत्या...असो. अगदीच नाईलाज होता ह्याबाबतीत.
अगदी सुरुवातीला एकदा bankstown ह्या suburb मध्ये Target mall मध्ये गेले होते. मामानी मला गाडीतून सोडलं, १ वाजेपर्यंत घरी पोहोचून जा असं सांगितलं होतं . मी पोहोचले ४ वाजता! मामाचे BP हाय झाले ना! मी खूप हसले...त्याला म्हटलं काळजी करू नकोस, कारण सिडनी एकदम चांगलं शहर आहे, आणि लोकं पण खूप हेल्पफुल आहेत. आणि मुख्य म्हणजे मी अगदी धीट मुलगी आहे, ती पण पुण्याची! शिवाय इतकी वर्ष एकटीने बऱ्याच ठिकाणी फिरले, तेवढा अनुभव असतोच कि गाठीशी. आणि थोडं स्वतःची बुद्धी, कौशल्य, बोलण्याची धिटाई,स्वतःला येत असलेल्या इंग्रजी भाषेचा फायदा करून घेता आला पाहीजे. आणि मुख्य म्हणजे स्वच्छंद फिरायला मिळण्याचं सुख अनुभवायचं असेल तर थोडी मजबूत आणि खंबीर मानसिकता असायलाच हवी ना?आणि तिकडे बघितलं ना, बरेच टुरिस्ट असे बिनधास्त फिरतअसतात. सोबत maps असतात, मोठ्या ट्रॅव्हल backpack लावून फिरतात. त्यांना बघितलं म्हणजे आणखीन हुरूप येतो.
मामी जिकडे कामाला जाते ती एरिया म्हणजे सुप्रसिद्ध bondai beach ! मामी तिकडे bondai beach council म्हणजे थोडक्यातcivil administrative office मध्ये काम करते.
तिकडे बीच खूप सुंदर... स्वच्छ, नितळ पाणी, प्रदूषणमुक्त हवा
असचं बीच म्हणजे Manley Beach. तिकडे झाली...म्हणजे त्या बीचची खासियत अशी कि इथे येणारी मंडळी अत्यल्प वस्त्र परिधान करून, मनसोक्त ऊन्ह अंगावर घेत पहुडलेली असतात (आता डोळ्यासमोर लगेच चित्र आले ना? असो, असो..) तिकडे सगळेच अशा अवस्थेत पहुडलेले असतांना,आम्ही दोघी म्हणजे मामी आणि मी selfie काढण्यासाठी जागा शोधात होतो, पण दर वेळी फोटोत कुणीना कुणी व्यक्ती येतच होती (हशा!) शेवटी एक फोटो काढलाच!
![]() |
| turkish pide |
![]() |
| Yoghurt with toppings |
Bondai बीचवर खायची रेलचेल! एका ठिकाणी tea and coffee kiosk वर indian masala chai लिहिले होते, म्हटलं, चला चहा पिऊन बघुयात. छान होता! नंतर पुनः एकदा गेले होते, तेंव्हा chilli coffee प्यायले. म्हणजे कॉफी होती गोड,पण मधूनच छान मिरचीची चव यायची! मस्त होती! नंतर तिथे लेबनीज, पोर्तुगाल,वगैरे अनेक पदार्थ पाहायला,चाखायला मिळाले. लेबनीज kurtos (कूतोस असा उच्चार आहे.) खाल्ले, म्हणजे मैद्याची लांबट चापटी पोळी करून, लोंखंडाच्या लाटण्यावर गुंडाळली,आणि ओव्हनमध्ये भाजली के कुतोस! मग दालचिनी, आमंड पावडर किंवा hezalnut powder वगैरे मध्ये घोळून गरमगरम खायचं, मस्त! सोबत chilli coffee किंवा एस्प्रेसो होतीच...बहार! ह्याच कूतोसच्या स्टॉलवर मी दोघाजणांशी सहज गप्पा मारल्या. त्यातले एक साहेब अनेक वेळा "बॉम्बे" कामानिमित्त गेल्याचे संगत होते. आणि "मद्रास"ला पण राहिलो होतो असे म्हणाले,आणि इंडिया विषयी गप्पा सुरु झाल्या. ते खूप जाणकार वाटले. त्यांनी मोदीजीं बद्दल खूप छान मत व्यक्त केलं! He is a good leader! People all over the world are appriciating his work! Demonetization was a good move !" वगैरे अनेक गोष्टींचे कौतुक केले... मला इतका अभिमान वाटला त्या दिवशी,काय सांगू? आणि असे ४ ते ५ वेळा घडले बरं ! ट्रेनमध्ये एकदा असेच मी कुणाशीतरी बोलत होते, तेंव्हा, त्यानंतर एकदा बसमध्ये एक म्हातारे गृहस्थ भेटले, ते पण चांगलं म्हणत होते.. म्हणजे आपल्या तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी मोदींचे कौतुक केलेच , पण दुसऱ्या देशातील नागरिकांनी आपल्या पंतप्रधानांचे असे कौतुक करावे हे अभिमानास्पद आहेच!

No comments:
Post a Comment