Sunday, 23 December 2012

1987 _ LAGNA NANTARCHYA NAVYAA VALNAVAR

१९८७  ऑगस्ट मध्ये लग्न ठरले ,आणि आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येवून ठेपले. मला आर्मी ऑफिसरशी लग्न करायचे होते,आणि तसेच होत होते. Lt .किशोर पेटकर ह्यांच्याशी माझे लग्न ठरले. ऑगस्टमध्ये   लग्न ठरले आणि नोव्हेंबर २५ १९८७ ही लग्नाची तारीख ठरली. आधी नाशिकला घरी भेट झाली आणि नंतर मध्ये फक्त एकदाच. आमच्या साखरपुड्याची गम्मत अशी की माझा साखरपुडा झाला, पण नवरा मुलगाच  हजर नव्हता! कारण त्याला सुट्टी नाही मिळाली! तर साखरपुडा झाला आणि नोव्हेंबर मध्ये पुण्यात लग्न झाले. मी  जेंव्हा जेंव्हा हा किस्सा कुणाला सांगते,तेंव्हा  पहिली प्रतिक्रिया म्हणजे "ऑ!" आणि नंतर हसू, नंतर कौतुक मिश्रित शब्दात आर्मी बद्दल बोलणे! "म्हणजे बघा, साखरपुड्या साठी देखील रजा मिळत नाही , म्हणजे आर्मी किती भारी आहे ते " असे काहीसे त्यांना म्हणायचे असते. पण मला मात्र हसू आल्याशिवाय राहत नाही!
असो लग्न अगदी पारंपारिक पध्दतीने झाले, आणि मी नाशिकला आले.नंतर  ८ दिवसा नंतर, आम्ही दोघे कोईम्बतूर (तामिळनाडू )ला गेलो.  तिथे आर्मी लाईफ "फ्रॉम  डे  वन" बघायला आणी अनुभवायला सुरुवात झाली, ते २००९च्या जानेवारीत ते रिटायर होईपर्यंत!


ज्या दिवशी आम्ही क्वार्टर वर पोहोचलो, त्याच वेळी "सुमा" नी, म्हणजे किशोर कडे असलेल्या पोमेरिअनने माझे वाईट स्वागत केले! म्हणजे तिने रागाने भुंकून स्वागत केले. स्वागत कसले, सरळ सरळ विरोध !. असो. रात्रीतून तिने माझी नवीन कोरी चप्पल फाडून ठेवली.!  हा तिने दर्शवलेला दुसरा विरोध! सकाळ झाली आणि सगळे चित्र पालटले!  मला डॉग्सची खूपच आवड आहे,  त्यामुळे मी तिचा विरोध हसण्यावारी नेला, आणि तिच्याशी मैत्री करार केला, तो पुढे १० वर्ष तसाच राहिला!सुमा  बद्दल विशेष म्हणजे तिला फक्त दूध-ब्रेड चालायचे आणि ते  नरम करून , तिला बसवून, तोंड उघडून,तिला भरवायचे! मी कधी पार्टीसाठी तयार झालेली असेन तर, तिला डायनिंग टेबल वर बसवून खायला घातली आहे, कारण ती  स्वतः कधीच कधीच नाही जेवली.  हा घास भरवण्याचा कार्यक्रम रोज दोनदा व्हायचा!
  घास भरवायला लागायचा त्याचा हा पुरावा!  

आणि हे द्रुश्य बघून  हसू आल्याशिवाय राहिले नाही, आणि इतके वर्ष मी तिची ही सेवा करते, त्याचे पण कौतुक झाले. पण मी मात्र प्रामाणिक पणे हे काम केले, आनंदाने केले.   .


      .    

सुमा एकदम रॉयल होती, कुणाच्या अध्यात मध्यात नाही, तिला कोणी नको, "मी बाई एकली आणि नको कुणाची सावली!" अशी ती होती. अलिप्त, थोडी शिष्ट, थोडी मानी पण आमच्या दोघांवर तिचा जीव. मी हिरो होंडा मोटर सायकलकोईम्बतूरला शिकले. सुमा पुढे बसून ऐटीत निघायची, तिला लोक वळून वळून  बघायचे! आधी  बाई  बाईक चालवतात, आणि त्यात टाकीवर  कुत्रा   ऐटीत बसलाय ! दोन वर्षान नंतर त्यात भानुप्रिया ची पण भर पडली, कारण तिला मी back pack मध्ये बसवून बाईकवर फिरायला न्यायची!आम्हा तिघींना बाईकवर पाहणे म्हणजे सर्वांना कौतुकाचा विषय होता  सुमाला कधीच पट्ट्याची  गरज पडली नाही. कारण ती अतिशय आज्ञाधारक होती   तिचे गुणगान गाईन  तर शब्द अपुरे पडतील असो, तर, आमच्या सुमा सारखीच चटपटीत रेसिपी खास साउथची इडली, पण चटपटीत!

मोलागापोडी इडली : छोट्या इडली पात्रात इडल्या करून घाव्यात.एका बाउल मध्ये इडल्या ,मोलागापोडी चटणी, खोवलेल खोबर  ,थोड तूप घालून,  नीट  कालवून गरम गरम वाढावे.
टिप : मोलगापोडी चटणी बाजारात रेडी मिळते GUN  POWDER chutney   ह्या नावाने मिळेल .

Wednesday, 19 December 2012

B,COM CHI DEGREE AANI MAG NOKAREE

  हडपसरला आल्यानंतर एक वर्षभर कॉलेजला जायला,  खूप त्रास व्हायला लागला आणि अभ्यास होईनासा झाला , त्यामुळे sndt  च्या होस्टेल मध्ये रहायच  ठरल.t .y . च वर्ष होस्टेलवर काढल. एखाद्या रविवारी घरी यायचे, खूप मजा यायची. होस्टेल मध्ये मैत्रिणी होत्या , शिस्तीचे वातावरण होते. रोज सकाळी लवकर उठून कॉलेजला जायला छान  वाटायचं ,कारण कॉलेज  जवळ होत. दुपारी आणि रात्री mess  मध्ये  जेवण करायचं. शिवाय कॉलेज कॅन्टीन  होतच. तिथे मैत्रिणी बरोबर गप्पा, सोबत खायला काहीतरी चमचमीत!होस्टेलच्या रेक्टर अतिशय कडक शिस्तीच्या! पण सर्वांकडे लक्ष पण द्यायच्या.होस्टेलवर कुणाच्या घरून गेस्ट आले, की त्यांच्या बरोबर खाऊ  पण यायचा. मग फराळ ! जिचा डबा  तिला चाखायला मिळाला  तरी पुष्कळ अशी परिस्थिती  व्हायची. ! होस्टेल वर रहायल्याने  बाहेरच्या जगाचे थोडेसे भान आले म्हणायला हरकत नाही.पण माझ्यां स्वभावात तसा काहीच फरक पडला नाही. उलट माझा खंबीर स्वभावच मला अनेक वेळा उपयोगी पडला.मी कधी नियम तोडले नाहीत, फालतू गोष्टी केल्या नाहीत,त्यामुळे काही त्रास न होता वर्ष निघून गेल. b.com  झाले आणि आनंद वाटला.हो, वर्षभर फ्रेंच चा कोर्स पण केला  मजा आणि आनंद  मस्ती आणि शिस्त सगळ मिळाल ,शिवाय घराचे महत्व पण मनात  पुन्हा प्रस्थापित झाले.१९८१ मध्ये पासआउट  झाले  . .  .आणि आणखीनच वेगळ्या आणि आनंदाच्या पर्वाला सुरुवात झाली.
सचिन ,नितीन, प्रमोदिनी आणि मी _माझ्या लग्नानंतरचा फोटो

आता मी नोकरीला लागले. १९८१ ते १९८७ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. ते दिवस पण मंतरलेले होते म्हणायला  हरकत नाही. स्वतंत्रपणे नोकरीचा आनंद घेतला, मिळणारा पगार उडवण्यात आनंद वाटला. दिवाळीला सगळ्यांना स्वतःच्या पैश्यातून गिफ्ट देण्याचा आनंद काही वेगळाच! तेंव्हा  मी माझ्या कमाईतून  m ८० गाडी घेतली, तो क्षण खरच सोनेरी होता. ड्रायविंग लायसन्स मिळवलं, आणि गाडीवर मनसोक्त भटकले. त्या काळी मी बाबांची lambretta  देखील चालवली! गाडीची नशा उतरता उतरत नाही हे मी अनुभवले!पुढे लग्न झाल्यावर तर  मी hero honda  चालवली! त्या गाडीची तर शानच निराळी! नुसती झिप,झिप, झूम!

 प्रिंटिंग  प्रेस, ऑटोमोबाईल  कंपनी, estate  agency ,पुस्तक प्रकाशन कंपनी, असे करत करत,१९८५ मध्ये  sndt  college मध्येच परत govt  job  मिळाला. adult  education  centre  मधली ही नोकरी म्हणजे सुवर्ण काळ  होता. नोकरीत खूप काही नवीन शिकायला मिळाल, खूप प्रवास केला, खूप लोक भेटली. आणि प्रमोदिनी  होम सायन्सला ह्याच कोलेजला होती, त्यामुळे तिच्या मैत्रिणी पण होत्या. खूप धमाल दिवस होते ते.

आणि अशाच एका धमाल रेसिपीने आजच्या ब्लॉगची सांगता करू.

कॉर्न फ्लेक्सचा चटपटा चाट :   १ वाटी कॉर्न फ्लेक्स, १/२ वाटी उकडलेल्या  बटाट्याच्या फोडी, काकडीचे तुकडे, टोमाटो चे तुकडे, कापलेला कांदा, कापलेली कोथिंबीर तळलेले दाणे, चाट मसाला, चिंच गुळाची चटणी, मीठ तिखट - सर्व वस्तू एकत्र करून, लिम्बाचा रस घालून मिक्स करून त्वरीत सर्व्ह करावे.          




.

Monday, 17 December 2012

HADAPSARCHA GHARAT - PUNYATEEL NAVIN PARV

१९८० मध्ये हडपसरला आल्या नंतर परत एका नवीन पर्वाला सुरुवात झाली अस म्हटल  तरी चालेल.मी s .y .b .com  ला sndt  college  ला admn  घेतली प्रमोदिनी ७ विला आणि सचिन नितीन ६ वीला होते,. तेंव्हाचे हडपसर म्हणजे गावठाण होते, कोणतीही सोय नाही, बस नाही, दुकान नाहीत, आजूबाजूला फक्त शेत आणि कच्ची पक्की घर. आमचीच सोसायटी  म्हणजे मोठी खूण! घराचे भूमी पूजन झाले तेंव्हा मला आठवते की १ किंवा २ रिक्षाच मिळाल्या आणि त्यां पण मुश्किलीने! सगळे जण  बाबांना म्हणाले की हे काय जंगलात घर घेतलेस ? असो. आणि हो, आम्ही ज्यांना हे घर भाड्याने दिले होते, त्यांनी पण थोडा त्रास दिला, पण शेवटी घर   आमच्या ताब्यात आले. म्हणजे इथे देखील बाबांना त्रास चुकला नाही! घरी आमच्या बरोबर  माई पण रहात होत्या, त्यामुळे मजा वाटायची. तशी आम्हाला माई दादांची सवय होतीच आणि लळा पण होता,पण आम्ही नेल्लोरला असतांनाच दादा वारले.  हो,  सांगायचं राहीलच. ज्या वेळी आम्ही पुण्याहून निघालो, तेंव्हा आजोबांची त्रीचीला घरी आलो, त्याच दिवशी संध्याकाळी  आजोबा गेल्याची तार आली. आम्ही चौघच घरी होतो. आई बाबा बाहेर गेले होते. मी थोडी घाबरले,पण  आणि आई बाबा  त्यांना तार दिली . माई  सारख्या काही तरी काम करीत असत. ताक  करणे हे त्यांचे आवडते काम., त्या तांदुळाची उकड फार चविष्ट करायच्या. रोज पेपर मधल्या बातम्या त्यांना वाचून दाखवाव्या लागत. फार मजा यायची. रेडियो वर गाणी लागली की, मान डोलावायच्या, बातम्या पण ऐकायच्या  आणि अधून मधून काही प्रतिक्रिया पण द्यायच्या. "पुष्पा, छान  लागलाय हो कार्यक्रम , ऐक " अस म्हणायच्या. माइचे तळपाय एकदम गोरेपान  आणि, अक्षरशः गुलाबी दिसत. मला तर अजून आठवल तरी नवल वाटत. माईला तिच्या बिटकी एवढ्या आंबाड्यात   फुल, गजरा  माळायला  फार आवडायच.
माई आणि मी  हडपसरच्या घरात

 माई शेवटी आजारी होती, तेंव्हा  मी ऑफिसला निघाले की काही आणू का? अस मी  रोज विचारायची,आणि ती   रोज काहीतरी पदार्थ सांगायची. आणला तर खायची मात्र अगदी थोड. असो.नंतर थोडे दिवसच सहवास मिळाला. पण माई ची तांदुळाची उकड मात्र कधीतरी करते, तेंव्हा तिची आठवण येतेच.

तेंव्हा  त्याच उकडीची कृती आज लिहिते , तिच्या सारखी  चविष्ट होत नाही पण तरी ---------

तांदुळाची उकड:

१ चमचा तूप गरम करून , त्यात किंचित जीर घालावे. नंतर १ वाटी  पाणी घालूनउकळावे . मीठ, तूप, घालावे. उकळल्या बरोबर १ वाटी  तांदुळाचे पीठ घालून ढवळून  घेत रहावे. नीट  उकड झाली, की गरम गरम वाढावी. तूप पण वाढावे. हवी असल्यास, थोडी कोथिंबीर   चिरून घालावी.

 bye !
  
  ,
  .

Sunday, 16 December 2012

ANDHRA MADHEEL 1978 CHE VAADAL

  नेल्लोर मध्ये १९७८ मध्ये प्रचंड वादळ झाले होते. पावसाचे दिवस,त्यात वादळ ! त्या संध्याकाळी १२० kms  च्या वेगाने पावसा बरोबर वादळ सुरु झाले. अचानक वादळ आले आणि सगळे घाबरून गेलो. तरी बर सगळे घरीच होतो. आमच्या घराची रचना अशी होती की बंगल्याच्या  वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. मालक खाली रहात होते, पण तेंव्हा ते मद्रासला गेलेले होते,आणि त्यांचे पाळलेले कुत्रे खाली बांधलेले असायचे. तर, ज्या संध्याकाळी वादळ सुरु झाले, तेंव्हा ह्या tommy  ला आम्ही जिन्यात बांधले आणि घरात आलो. मोठी चौकोनी बाल्कनी. एक छोटी खोली साईडला होती, आणि मेन घर होते. मेन दरवाज्यातून वादळी वार यायला लागले म्हणून, ते बंद केले. साईडच्या खोलीच्या खिडक्या बंद करण्यासाठी बाबा तिकडे गेले. आणि, latch lock  असलेले दार एकदम बंद झाले. latch  तर बाहेरून उघडणार आता. बाबा आतमध्ये अडकले. त्यांनी दरवाजा ठोकून ठोकून आम्हाला आवाज दिला. बरयाच वेळाने लक्षात आले की बाबा तिकडे अडकले! आता काय करायचे? मग मी किल्ली  घेवून घराच्या मागच्या बाजूने ,घरा   भोवती मध्यभागी जो parapet  wall  बांधलेला  होता, त्यावर उतरले, आणि धूम पाउस आणि सोबत वादळ, अशा भयंकर परिस्थितीत अक्षरशः झोपून रांगता रांगता गोल फिरून पुढच्या बाल्कनी पर्यंत आले,  वर  चढले  आणि मग दार उघडले ! माझ्या धाडसाचे फारच कौतुक झाले, पण मला तेंव्हा काहीच कळत नव्हत, फक्त बाबा दिसत होते. धाडस वगैरे आत्ता  कळले. पण मी पहिल्या पासून अशीच आहे.
मायपाडू बीच नेल्लोर

दुसऱ्या  दिवशी देखील वादळ शमले नाही, आणि आम्ही मिल्क पावडरचे दूध, आणि जे काही घरात होते त्यावर  भागवले.  दोन दिवसांनी  वादळ शामाले, आणि गाडी पूर्वपदावर आली. पण ही आठवण मात्र काल घडल्या सारखी  हकीकत वाटते.

१९८० मध्ये  आमचे हडपसर चे  घरी पुण्याला येण्याचे नक्की झालेपुण्याला ,कारण बाबांची बदली पुण्याला झाली  .
 
    

हा फोटो माझा आणि बाबांचा आहे. मथुरेचा आहे. जुनी आठवण काढलीच आहे, तर शनिवार पेठेतील एक मजेशीर  किस्सा आठवला. करंदीकर काकूंचा शिरीष हा मुलगा. शिरीष आणि शेखर असे दोघे   भाऊ आणि, जयश्री   त्यांची बहीण तर शिरीषने मला एक दिवस बोलावले आणि काहीतरी खायला दिले. चौकोनी तुकडे आणि डाळ ओळखली.    छान  लागले म्हणून सगळे  खाल्ले.  आणि मग विचारले काय होते ते? तो म्हणाला 'तू आज मासे खाल्लेस ' मला इतका राग आला त्याला खूप मारले, आणि रडत रडत घरी जावून आईला सांगितले  नंतर  कळले, की, माझी चेष्टा केली म्हणून. खरतर ती "आमटी फळ " नावाची रेसिपी होती.  तर तीच रेसिपी देते  खूप tasty  बनते. करून पहा आणि चांगली झाली तर नक्की सांगा.

आमटी फळ :   आमटी :  १ वाटी  तुरडाळ  शिजवून घ्यावी. त्यात चिंच,गूळ , मीठ  घालून पातळसर करावे तेल गरम करून , मोहरी,जिर ,हिंग, हळद, कढीपत्ता, लाल सुकी मिरची, हिरवी मिरची, घालून लाल तिखट घालून डाळीत   ओतावी ,डाळ  उकळू द्यावी .

फळ : १/२ वाटी  कणिक, १/२ वाटी  बेसन, मीठ, तिखट , हळद, ओवा,कोथिंबीर, थोडे तेल घालून घट्ट  मळुन  घ्यावे. जाड  पोळी लाटून चौकोनी तुकडे कापून वरील आमटीत  सोडावेत. झाकण ठेवून ५ मिनिटे उकळू द्यावे. तुकडे वरती आले, की झाले समजावे. कोथिंबीर, फ्रेश  नारळ खवून घालावा  गरम  वाढावे .

ही फळ  माश्यांचे तुकड्यांसारखे दिसतात , म्हणून शिरीष मला म्हणाला मासे खाल्ले!  मला हा पदार्थ मनापासून आवडतो, आणि कधीही केला की हा प्रसंग आठवून हसू आल्या शिवाय रहात नाही! .           .

आणखीन  बरच काही , पण ;परत भेटू तेंव्हा !

Tuesday, 4 December 2012

NELLORE CHE COLLEGE DAYS AANI GAMAATEE

त्रिची मधील मुक्काम हलवून आम्ही १९७८ मध्ये आंध्रा प्रदेश मधील नेल्लोर येथे गेलो. मी १०वी करून आल्यामुळे मी कॉलेज मध्ये admission साठी गेले तो  हा किस्सा फार रंजक आहे. मला खरतर ११वी ला admission  मिळायला हवी पण नजर चुकीने मला फ  स्ट  ईयर  B .com  साठी adm  दिली गेली. मी दुसऱ्या  दिवशी कॉलेज ला  गेले, आणि f .y  च्या वर्गात जावून बसले. मला तिथली सर्व मुल मुली निरखून पहात होती, आणि थोडी   विचित्र पणे observe  करतांना जाणवली, पण मी विचार केला, आपले दिसणे, ड्रेस, बरेच वेगळे असावे, म्हणून बघत असतील.  कारण, मी पाहिलं तेव्हां सगळ्या मुली तिकडच्या पारंपारिक Half -sari  किंवा साडी नेसलेल्या होत्या, आणि मी जीन्स ! आणि त्यांचे तिथले  वावरणे बरेचसे अंग चोरल्या सारखे, आणि संकोच्लेले वाटले. म्हणजे, त्या मुली अगदी जीव मुठीत धरून, भेदरलेल्या अशाच वाटत होत्या, निदान मला तरी . कारण मी म्हणजे एकदम बिंधास ! आणि त्रिची मध्ये co -ed  school  मध्ये शिकल्या मुळे , मुलांची भीती वगैरे वाटण, म्हणजे हास्यास्पदच!
V  R College नेल्लोर


माझं  कॉलेज VR college,  पहिल्या दिवशीच, पहिलेचदोन तास  accounts  चे ! सर आले आणि नवीन मुलांची  introduction  झाली, त्यात मीही आले. पण, माझी जरा जास्तच  माहिती घ्यावी लागली. पण त्यांनी मला विचारले की १०  वी तून f .y  मध्ये कशी काय आली ! पण माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते! i  was  clueless ! त्या वेळी मला पण काही तरी खटकल. असो, सर क्लास घ्यायला लागले, आणि ते म्हणायचे, 'we  have  learnt  this  last  year ! आणि पुढे जात होते. असा गोंधळ झाला! मग ऑफिस मध्ये   पुन्हा गेलो तेंव्हा  कळले की, चुकीची  adm  दिली गेली.! jr  college  ला पुन्हा adm  घ्यावी लागणार.! पण बाबांनी आणि मी प्रिन्सिपल ना भेटून हा प्रश्न कसा सोडवायचा हे विचारले. तर ते म्हणाले, की bright  student  आहे, तर, तिला  १२ th  std मध्ये adm देतो,आणि  ११ th  ची exam   internal  देणार , पण,अभ्यास खूप करावा लागणार! मी काही वेळ न घालवता  हो म्हणाले  पण त्यानंतर संपूर्ण  वर्ष म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास! पण आधीच सांगितलेले सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि  माझी नैया ११ वी आणि  १२ वीची  परीक्षा पार करून पुढे निघाले !
कामाक्षी मंदिर नेल्लोर

आंध्र प्रदेश ची एक पारंपारिक पाककृती - हैद्राबादमधील ईद निमित्त बनवला  जाणारा 'शीर कुर्मा '
शीर कुर्मा :

बदाम, काजू, खारीक, पिस्ते, १ वाटीभर घेवून, २ तास पाण्यात भिजवून ठेवावेत, आणि नंतर पातळ काप करून तळून घ्यावेत.   १/४ वाटी   सुके खोबरे काप किंवा कीस कोरडा भाजावा. २ tbsp खसखस कोरडी भाजावी.
शीर कुर्मा  बनवायच्या वेळी, २ tbsp  तुपावर १ १/२ वाटी  बारीक शेवया परतून घ्या काढून ठेवा .. ड्राय फ्रुट्स घाला. दूध गरम करून, त्यात शेवया, ड्राय फ्रुट्स,खसखस, खोबर , घालून नीट   शिजू  द्या. चारोळ्या, वेलची दाणे, केशर घालून   सर्व्ह  करावे. २ tbsp  खवा घातला तर आणखी स्वादिष्ट होतो

आणखी काही आठवणी,  पण पुन्हा केव्हा तरी! अरे हो, आजच मूगडाळीचे  लाडू केले होते. मस्त झाले!.

ह्याची रेसिपी पुन्हा केंव्हातरी!

Sunday, 2 December 2012

TIRUCHIRAPALLI CHA MUKKAM

 1975  मध्ये बाबांनी पुन्हा आर्मी जॉईन केली. आता  त्यांनी NCC  ऑफिसर  म्हणून join  केले आणि त्यांची पोस्टिंग थेट तिरुचिरापल्ली, तामिळनाडू  ला झाली.
आम्हाला  फारशी   कल्पना नव्हती की काय आहे ते पण  नवीन गावाला जायचे आहे  ते पण सर्व सामान pack  करून ! काहीतरी वेगळ वाटल पण जेव्हा  खरच ट्रेनन  प्रवास केला , तेव्हां खरी  मजा वाटली ! मी तर ट्रेनमधून  प्रत्येक  स्टेशन वर खाली उतरायची,पाणी भरून आणायची, जेवणाचे काय मिळेल ते घेवून यायची, खिडकीतून आत pass  करायची , फारच मजा   वाटायची !  कधी ट्रेन  चुकली नाही, की कोणती गडबड झाली नाही !
हळूच सुरू झालेल्या ट्रेन मध्ये चढायची मजा वेगळीच होती !माझ सगळ कामच अस होत.  मला आठवतंय, आमच्याकडे एक केन बास्केट होती, त्यात सर्व खायच्या वस्तू असायच्या. ती बास्केट म्हणजे गारुड्याची पोतडी होती, त्यातून कोणत्या वस्तू निघतील  हे फक्त आईच सांगू शकायची ! पण एक खर, भरपूर खायचो कारण ३० तासांचा प्रवास आणि १st  class चा  ६ seater  coupe असायचा त्यामुळे  सगळी जागा आपलीच!   पत्ते, लुडो,असले  काहीतरी खेळायचो नाहीतर berth  वर- खाली मस्ती आहेच ! एकदा बंद केलेला दरवाजा उघडून वरती ठेवलेल्या shirt मधून पैसे  गुल झाले होते.! तेव्हां पासून थोडे जास्त सावध रहायला लागलो ! माझी झोप फार सावध आहे आणि train  मध्ये तर खूपच सावध ! त्याचा हा पाया  बहुधा !आईची खाउची  basket  ची परंपरा मी सोडली नाही. २० वर्ष झाली लग्नाला, त्या दरम्यान जो प्रवास केला, त्यात ही basket  म्हणजे प्रवासाचे मेन आकर्षण राहिले !
निघालेत ६,सोडायला आलेत ६०!  

बर, आम्ही पुण्याला सुट्टीवर आलो की तर परत निघतांना स्टेशन वर आणखी मजा ! म्हणजे, जाणारी माणस  ६ आणि bye  करायला आलेली  माणसं  ६०! अशी गत असायची! कारण एव्हड्या लांबचा प्रवास कुणी करीत नव्हते म्हणून  सगळ्यांना  स्टेशन वर यायचे आकर्षण!

आमची खाजामलाई  कोलोनी

RSK  higher secondary school चे campus


नवीन गाव, नवीन शाळा, त्या शाळेच्या admission   साठी  केलेला खटाटोप, नवीन रस्ते, आणि मुख्य म्हणजे नवीन भाषा  ! तमिळ भाषा पहिल्यांदाच कानी पडली! म्हणजे मराठी, आणि हिंदी व्यतिरिक्त कानी पडलेली ती भाषा! पहिले तर फार मजा आली, आणि नंतर हळू हळू समजल की, तमिळ नाही बोललं  तर  काहीच convey  नाही करू शकणार! शाळेत कुणी काही तमिळ मध्ये विचारले तर पंचाईत व्यायची. मग सगळे जण  तमिळ शिकलो . आणि तमिळ इतक चांगल यायला लागल की, सचिन आणि नितीनचे भांडण  तमिळ मध्ये  व्हायचे ! आमचा मामा त्या दोघांना अस बोलायला सांगायचा आणि सगळ्यांचे भरपूर मनोरंजन व्हायचे!. तिथे लोकांची लुंगी नेसायची पध्दत हे  दोघे करून दाखवत तेव्हां सगळ्यांची   हसून पुरे वाट  व्यायची.  अशा  रीतीने आम्ही त्रिची मध्ये दोन वर्ष रहायलो. खूप मजेचे दिवस गेले ते! अजून सुद्धा ते दिवस आठवले की हसू येत आणि मन ताजतवान होत.
आमच्या शेजारच्या flat मधले आमचे शेजारी

तर south india  ची बात होते आहे तर मग एक south  indian  रेसेपी  होऊन जाउ दे.तामिळनाडू special  आहे.
पाराप्पू  पायसम: :   १ वाटी  मुगडाळ  शिजवून घ्यावी  १/२ साबूदाणा  भिजवून घ्यावा १ वाटी  नारळाचे दूध, १ वाटी  गूळ , वेलची पूड, काजू तुकडे, नारळाचे काप.
कृती:   थोडे तूप गरम करून, त्यात मुगडाळ, साबूदाणा,घालून परतून घ्यावे. नारळाचे दूध घालावे, शिजले  की गूळ  घालावा. वेलची, काजू काप, नारळाचे काप घालून तूप टाकून गरम किंवा थंड सर्व करावे .  

आता जाता जाता त्रिची शहराचे दर्शन____
श्री रंगनाथ मंदिर
rock  fort  temple
आणि  हे नवीन त्रिची शहराचे चित्र!
नवीन त्रिची! वा! 

 bye!









      .

Thursday, 29 November 2012

SHAHA BLDG MADHALE RAMYA BAALPAN

शनिवार पेठेतून शहां बिल्डींग, कर्वे रोड ला रहायला आल्या नंतरचे दिवस मात्र फार मस्त, मजेत आणि आनंदाचे गेले. इथे खरतर आम्ही   चौघे  मोठे झालो आणि एकत्र खेळलो, अभ्यास केला, मजा केली    मोठी .सोसायटी असल्यामुळे  भरपूर मुल मुली होतो . लगोरी, विटी दांडू , लंगडी, लपायला भरपूर जागा असल्यामुळे लपा -छापि , आणि, ग्राउंड वर बास्केट -बॉल ,  व्हॉं ली -बॉल ,बेस बॉल ,कबड्डी, अनेक प्रकारचे खेळ खेळायला मिळाले. खरच,खूप भाग्याचे वाटते. एक सर होते ते हे सर्व खेळ शिकवायचे. खूप  मजा यायची. आणि घराच्या आतले खेळ, तर काही कमीच नाही. भातुकली रंगायची दुपारभर, पत्ते खेळायला बसलो, तर संध्याकाळ केव्हा व्हायची ते कळायचेच नाही. आणि मग कधी कधी घरात जायला उशीर झाला तर शिक्षा झालीच समजायची !  बर, घरात बसून पण खेळ होतेच की ! पेपर गेम्स  तर किती तरी खेळायचो !पण संध्याकाळी सात वाजता घरात हवे ! त्यानंतर अभ्यास, जेवण आणि गप्पा मारीत झोपणे ! वा! आठवले तरी अंगावर मोरपिसारा फिरल्यासारखा  वाटतो . तेव्हा माई आणि दादा  पण आमच्या कडे होते. त्यांची पण खूप आठवण होते. आजोबांची  खूप वेळ चालणारी देवपूजा, माईंची ताक  करायची लगबग , त्यांची तासंतास चालणारी वेणीफणी , एका छोट्या रुमालात ठेवलेला त्यांचा चष्मा, तो जपण्यासाठी केलेला खटाटोप, दादांच्या जेवणाची वेळ होत आली की त्यांची आईला एक वार्निग बेल जाई. कारण आजोबा आले आणि, जेवण वाढलेले नसेल तर ते न जेवताच ऑफिस ला गेल्याचे माई नेच आम्हाला सांगितल्याचे आठवते ! आजोबा कर्मठ आणि माई    भोळ सट ! प्रचंड मजा यायची ! पण मी दादांची लाडकी होते असे वाटते. कारण फक्त मीच त्यांच्या शेंडीची तीन   पदरी वेणी घालण्याची हिम्मत करू शकत होते. आज देखील हे आठवल की हसू येत. त्यांच्या कमरेचा जुना पैसा होता तो जर खाली पडला,तर फक्त सचिनच तो पैसा उचलू शके, कारण जर नितीनने तो उचलला    तर ते त्याला  रागावून हाकलून देत आणि, सचिनला आवाज देत !    पण दादा अतिशय काटेकोर होते हे ही खरच . रोज सकाळी माझ्या बसची वाट  पहात बाल्कनीत उभे रहायचे, बस आली की मला सांगायचे आणि, मला बस मिळालेली त्यांना दिसे आणि, मगच ते खोलीतखूप  जात. आणि हे सगळ सकाळी  पावणे सहा वाजता !

आमच्या   बिल्डींग मधली मंडळी म्हणजे    पण वेगवेगळे नमुने!  अतिशय हुशार असे बिरारी, खोडकर अशी  गोरे भावंड, मनमोकळे आणि अतिशय खेळकर भागवत फ़े मिली , आम्ही ज्यांच्या खूप खोड्या काढत असू ते  इतर सर्व flat चे लोक. पण, कोणाला मदत लागली, तर, सर्व मंडळी  त्वरीत हजर ! हीच खासियत जी आजकाल कमी झालेली दिसते .ती सर्व मंडळी  चाळीतून flat  मध्ये आलेली त्यामुळे ती संस्कृती घेवून आलेले. पण आता हे दिसत नाही

.आता एक सोप्पी  रेसिपी सांगते. आजच्या आज करून बघा आणि    मला कळवा .

पंचामृताचे  पानगे :

दूध - १ वाटी , दही- १/४ वाटी ,- तूप - २ टेबल स्पून, मध - २ टेबल स्पून ,साखर - २ ते ३ टेबल स्पून - सर्व पदार्थ        मिक्स करून, साधारणपणे १ वाटी  कणिक आणि १/२ वाटी  तांदूळ पीठ (नसल्यास कणिक घ्यावी) घालून,किंचित  मीठ घालून  सरबरीत डोश्या  सारखे पीठ घेवून, pan  मध्ये छोटे पानगे तुपावर घाला.दोन्हीकडे  खरपूस भाजून घ्या. प्लेट मध्ये घेवून, मध, क्रीम, घालून  द्यावे.
variation -  वरील mixture  मध्ये पनीर किसून घालावे.
. bye !

Wednesday, 28 November 2012

MALAA MILALELI ANMOL SHIKVAN

काल  मी शनिवार पेठेतील गमती   आठवत होते. त्या गमती आठवताना तिथे घडलेले नाटय  देखील आठवल्या शिवाय रहात  नाही. तिथे घडलेल्या ह्या नाटयाने तर मला खूप लवकर आयुष्यात खूप काही शिकवले असे आज वाटते. आमचे शेजारी जे परांजपे रहात, ते पूर्ण कुटुंबच  वेडयांनी  भरलेले होते ! नवरा बायको, ३ मुलगे  सर्वांचे च आमच्या कुटुंबाशी बहुधा मागील जन्माचे वैर होते. लाईटचे कनेक्शन रात्री कापणे, पाण्याची पाईप ठोकून ठेवून पाणी पुरवठा बंद करणे, आमच्या बाहेर ठेवलेल्या  सामानाला रात्री-बेरात्री नुकसान पोहोचवणे, भांडणे काढणे, अपशब्द बोलणे, मुलांना वाईट बोलणे, असे अनेकानेक गलिच्छ प्रकारांनी  आम्हाला त्रास दिला. पोली स  स्टेशन मध्ये रात्री-बेरात्री हजेरी लावावी लागणे,कोर्ट केसेस करायला भाग पाडणे,हे सर्व दशावतार मी पाहिले,जवळून अनुभवले, आई-बाबांची  होणारची कुचंबणा, घरातील तारांबळ, ,आपण चांगले असून देखील, आपल्याला अशा दुष्ट लोकांना सामोरी जायला लागावे ह्याची खंत, हे सगळ तेंव्हा कदाचित उमगत नसेल, पण जाणवल असणार नक्की. पण शेवटी, वाड्यातल्या लोकांनी, पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी  दाखवलेला बाबांवरचा विश्वास,माझ्या मामांनी दिलेली भक्कम साथ,आणि देवावरची ह्या दोघांची अपार आणि पूर्ण श्रद्धा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले काही चुकलेच नाही, तर का घाबरायचे? हा आत्मविश्वास जबरदस्त होता. आणि म्हणूनच सर्व कोर्ट केसेस बाद ठरल्या.सर्वांना आनंद तर झालाच,  पण -'बाबा' आणि 'हेमाची आई'(असेच म्हणायचे सगळेजण) ह्या संकटातून सुटले ह्याचे समाधान जास्त होते. तर,वाड्यातल्या ह्या दिवसांची ही सर-मिसळ आठवणींची!


असो,   मूड ठीक करण्यासाठी, आणि थंडीचे दिवस उबदार करण्यासाठी, डिंकाच्या लाडुची  ही सोप्पी रीत खाली देत आहे.
डिंकाचे लाडू:

खायचा डिंक - १/२ वाटी , सुक खोबर कीस -१/२  वाटी, बदाम-१/४ वाटी , काजू-१/४ वाटी , तीळ -१/८ वाटी , खसखस-१/८ वाटी , पिठी साखर - १ १/२ ते २ वाटी ,  साजूक तूप - १ ते १/४ वाटी, कणिक - १/२ वाटी 

डिंक  १/२ वाटी  तुपात थोडा थोडा करीत तळून  घ्यावा .. खोबर कीस., तीळ , खसखस  कोरडे  भाजून घ्यावे. बदाम, काजू, तुपात तळून  घ्यावेत. सर्व मिक्स करून,भरड किंवा बारीक पावडर मिक्सरवर करावी. कणिक तुपावर गुलाबी परतून घ्यावी. थंड करून,, सर्व वस्तू , पिठी साखर, तूप घालून, लाडू करावेत .   हवे असल्यास, वेलची, सुंठ पावडर घालावी. हवे असल्यास तूप जास्त घालावे.  लाडू  न वळता नुसते पण खावू  शकतो.

वर दिलेली आपली पुणेरी डिंक  लाडू ची रेसिपी. खाली, "पंजिरी' म्हणजे उत्तर भारतात बनणारा प्रकार.थोडा फरक आहे, करून पहा
पंजिरी:

 कणिक - १ वाटी , रवा   -१/२ वाटी , डिंक - १ वाटी , बदाम - १/४ वाटी , काजू - १/४ वाटी  पिठी साखर - १ १/२ ते २ वाटी

कृति : कणिक आणि रवा वेगवेगळे तुपावर गुलाबी भाजून घ्यावे. बदाम,काजू ,डिंक  वेगवेगळे  तळून  घ्यावेत. बदाम,काजू आणि, डिंक  मिक्सर मधून बारीक पावडर  करावी. सर्व वस्तू मिसळून नंतर त्यात वेलची पूड,सुंठ पूड, अख्खे बदाम,काजू घालावेत. थंडीसाठी उत्तम पदार्थ आहे. खराब होत नाही

हवा असल्यास, १/२ वाटी  खवा परतून घालावा. पण हे जास्त टिकणार नाही.


ह्या सगळ्या लिखाणामध्ये माझा gas वरचा मसाला जळून  गेला ना! . असो !

 ,







 


  


            

Tuesday, 27 November 2012

SHANIWAR PETHETEEL DIVAS

पुण्याची शान _ शनिवार वाडा !

मी   काल मथूरेतील  अनुभवा बद्दल  लिहिल  होत .त्या नंतर  बाबा army तील  सर्विस काळ संपल्या नंतर पुण्याला आले। शनिवार पेठेतील वाड्यात  राहायला आल्या नंतर एक वेगलाच  अनुभव आल़ा मी तेव्हा  दुसरीत होते। सैंट  मीराज शाळेत जात होते। वाडयात भरपूर मुल  होती त्यामुले  भरपूर खेलने  व्हायचे।सचिन आणि नितिन  चा  जन्म  ह्यावाडयात  झाला .    मला   चांगले .आठवते  दोघां कड़े  बघतांना, ,दोघांचे संगोपन करताना, आईची  , बाबांची , खूप ताराम्बळ   उडायची . कधी दोघे आजारी , कधी दोघे मजेत ! एकाला दूधाची  बाटली दिली तर ,तो ती  बाटली  फेकून  द्यायचा , कारण ती  बाटली   दूस्र्याची  असायची ! दोघे एकाच   वेळी आजारी पडले तर  मग विचारूच नका ! समोरच डॉ। देशपांडे ह्यांचा दवाखाना होता। मग दोघांना घेवुन आमची वरात दवाखान्यात ! पण डॉ तर   अवलीयाच  होते  ! ""ते अतिशय शांत पणे  तपासणी करायचे , औशध  द्यायचे, अणि कधी कधी  आईला म्हणायचे 'अत्ता त्रास होतोय, पण  जेव्हा   चार हातांनी कमावातील , तेव्हा माझी आठावण  काढाल ! खरच  आहे त्यांचे म्हणणे !   आज आई -बाबांना खरच  अभिमान वाटत आहे! डॉ देशपांडे आठवले की हे सगळे आठवते।,अणि वाडा  आठवला की ते आठवतात .
वाड्यातली आमची gang
मला  आठवतय वाड्यात  जी बिऱ्हाडे   होती, जी मुल  होती, सर्वांना  सचिन आणि नितिन आणि प्रमोदिनीला खेळवायला   फार आवडायचे। त्यामुळे ,आईला थोड़ी मोकळीक मिळत  असे .
डावीकडे सचिन, मध्ये प्रमोदिनी आणि नितीन ! आजवरचा सगळ्यात गोड फोटो ! 
आम्ही वरच्या मजल्यावर  रहात होतो,   खाली मधो मध  मोठे  अंगण  होते। तिथे उन्हाळ्यात  सगळ्यांचे पापड व्हायचे , घरोघरी लोणची  व्हायची , ते पापड खाण्यात  जी मजा होती, ती  आज कुठल्याच  पापड़ात  नाही! हरबरा, ऊस, बोर आवळे ,खूप मजा! प्रत्येकाच्या घरात केव्हाही, प्रवेश  मिळत असे। आमच्या शेजारी सोहोनी काकू रहात। त्यांचे कड़े  खूप खेळायची ,  त्यांच्या कड़े मला जेवायला  फार  आवडायचे  पण , नंतर कळले , की ते  जेवण आईच पाठवायची!   सगळीच  मजा ! देशपांडे , मुकीम , करंदीकर , सोहोनी , अणि मालकीण  बाई होत्या  परांजपे काकू  , सगळे लोक खूप चांगले होते। पण ,ह्याच  वाड्यातल्या काही कदू  आठवणी  पण  आहेत,पण त्या उद्या ! .   

Monday, 26 November 2012

MY DAYS IN MATHURA


Today, I was very excited to write on my blog, but was wondering what to write. Going  back to my earliest memory of food, is about the white bread sandwiches, which Aai would send in my tiffin. With the crusts cut off, and butter and powdered sugar spread liberally on the bread slices, it was the best tiffin in those days! Aai would send dahi bhat, sandwiches and a small bottle of milk in the hands of our sahayak, in a small cane basket. It is still etched in my mind clearly.We had a huge kitchen garden where there were fresh vegetables. We have a photo of my Aaji plucking fresh green chillies from the garden. So, I think the sight of a kitchen garden with fresh veggies makes me nostalgic.T his I talk about the time when we were in Mathura,where my Baba was posted.

This incident brings a smile on my face, everytime I think of it. Once , an officer who was my baba’s colleague had come over, and he had given me a box of chocolates. But since I didn’t wish him’good evening’, Baba made me sit on the window sill, until I said sorry, which obviously , I didn’t!. Later after some time, he did take me to sleep! That was the end of the chapter!

Pramodini, was born in Mathura, and I remember she looked like a DOLL! – lliterally!. There are photos to prove my point. I remember the house vividly, as it was then, and still I go back in time , and just reminiscing about those days,  is a good stress buster for me!


Now for a traditional receipe of RAWA LADOO but with a few  variations. This is one sweet which everyone relishes- young or old alike
Take 100 gms of real fine rawa, roast it in 30 gms of ghee, till it turns pinkish brown. Make syrup with 75 gms sugar and little water, to make 1 thread consistency, and when the rawa is still hot, pour the hot syrup, stir to mix thoroughly and keep the mixture covered overnight or for 7 to 8 hrs. Then, mix again, adding elaichi pwd, kesar, kaju pieces, kishmish whatever you prefer. Add  a little ghee if the mixture looks too dry, and sprinkle a few drops of milk, roll into laados , put a kaju piece of the top, and serve.
Variations – You can substitute 25 gms of rawa for khava, which needs to be roasted separately and then mixed into the roasted rawa. OR 25 gms of milk powder to be added in the final mixture, before rolling the laados.OR 3 tbsp of grated fresh coconut which is to be mixed in the final mixture.

So, here’s happy cooking! 

Sunday, 25 November 2012

Welcome to my BLOG!!!!


Hi  Friends,

I would love to share this blog with all the food lovers - those who believe the FOOD is definitely LIFE!
This blog is not just about food, but it is about life, its experiences, that we share, and which many a times, culminates into a food item, which is then associated with the particular memory or experience.

If we look at it plainly, cooking is that activity, which goes on constantly, many times very mechanically, some times, with a little thought and care. But if look at life and cooking as its integral part, then we will know that food is one of the major criteria for deciding the quality of life that we live.

Life style changes happen over 20 to 25 yrs roughly. And if we were to look at the past century or so, then we will find that food has constantly evolved. New techniques, new ideas,  raw materials, new food items, keep coming from time to time.

So, if we stick to the same old routine through the years, without incorporating any changes in our food, then we tend to become rigid in our thoughts in life, and more rigid towards towards life also.
There is so much fun, so much happiness in cooking! Even everyday cooking could be made special with some special touch!

Cooking is a challenge as well! Sometimes, you have to accept challenges from Time, from occasions, and from people. As you are confronted with a challenge, your senses become sharper, respond to the given situation, fast, and to the mark, thus fulfilling your challenge and giving a sense of achievement to yourself!

Cooking is an ongoing process, which for any homemaker, is as good as any other corporate job, albeit without the fat pay packet! But the joy on the faces of your folks, a word of appreciation from your friend, from your boss, a pat of those wrinkled hands from your elders is more than a fat paypacket could offer in terms of happiness!

So friends, as a foodie blogger, I start off with a sweet dish, to instantly connect with all my friends. This receipe is worth trying and since it has chocolate in it, rest assured, it will be an uplifting experience!


CHOCO CUTIES:   


Take 100 gms of crumbled Christmas cake, or Christmas pudding, or Plum cake, or chocolate cake, whatever is easily available. Add 2 to 3 tsps of rum or red wine, as per your taste and preference, And now add 50 ml of golden syrup which is easily available in supermarkets, or regular sugar syrup made at home.  Now, mix 75 to 100 gms of melted dark chocolate, or cooking chocolate. Mix together, and roll into small walnut sized balls, and keep in paper cups in the fridge for an hour. Remove the cups onto a tray, and pour a big drop of melted white chocolate over it. Now stick some red and green tutti frutti, or coloured cherries pieces on the white chocolate. Serve these choco cuties as After dinner cups or for birthday parties, or just any time! Literally any time! They will vanish before your very eyes in no time.