Friday, 24 May 2013

1992 च्या ऑगस्टमध्ये हैदराबादला पोस्टिंग झाली, आणि तिथे फक्त ६ महिने राहिलो होतो. पण हैदराबादच्या मुक्कामात खूप मजा आली. आम्ही सिकंदराबाद मध्ये एका भाड्याच्या घरात रहाणार होतो, कारण quarter  मिळाले नव्हते. हैदराबाद आणि सिक्न्द्राबाद  ह्या ट्विनसिटीज  आहेत .  आता मजा अशी झाली की, ज्या दिवशी सकाळी  आम्ही हैदराबादला पोहोचलो,त्याच दिवशी दुपारी ह्यांना ऑफिस मधून टेलिग्राम  मिळाला म्हणून  लगेचच तिरुचिरापल्ली (तामिळनाडू ) इथे १ महिन्या साठी जावे लागणार होते. आणि त्याच दिवशी  संध्याकाळी निघावे लागणार होते. अजून आमचे ट्रक मधून सामान देखील आले नव्हते! पण इलाज नव्हता.   तर  जेवण झाल्यावर सन्ध्याकाळी लगेच आम्ही बाहेर पडून जवळचा बाजार वगैरे पाहून आलो. आणि हे लगेच रात्रीच्या गाडीने निघून गेले. आमच्या घराच्या मालकीणबाई आणि वरच्या मजल्या वरचे २ भाडेकरू कुणालाच इंग्लिश किंवा हिंदी विशेष येत नव्हत आणि समजतही नव्हत! पण तरी त्यांनी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, आणि आम्ही त्यांच्याशी! तेंव्हा 'रोजा' पिक्चर लागला होता, आणि त्या शेजारणीने मला विचारले तुम्ही येणार का?  म्हणून! (आणि तिथे तेलगु सिनेमा लागलेला बर का!, हिंदी नाही !) आणि वर म्हणल्या "i  tell you no, in english!(अरे देवा!) कठीणच आहे! मी काय म्हणणार? पण नंतर नंतर त्या बायका आणि त्यांच्या मुली आमच्याशी जमेल तस कधी  इंग्लिश मध्ये ,कधी खुणेच्या भाषेत, कधी कधी समोर वस्तू दाखवून बोलायला लागल्या ना, तेंव्हा पटलं, की संवाद साधायला भाषाच पाहिजे अस नाही! फक्त एकमेकाचे विचार एकमेकाला पोहोचवता आले पाहिजेत!  एक महिन्यात अस झालं  की मी आणि त्या बायका सकाळी _ सन्ध्याकाळी एकमेकींशी बोलायचो! आपोआप एक नात  निर्माण होत! खूप छान  अनुभव होता तो!


तर, सांगत काय होते, की लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडले! अर्थात ह्यात नवल काय! मला तर शहर बघायची इच्छा होती, शिवाय भानूची  शाळा पण शोधायची होती. मग काय मोटर सायकल घेवून बाहेर पडले! इथे पण नवलाने बघत होतेच! कारण तिथे अजून महिला  पारंपारिकच होत्या! पण मजा यायची! २ दिवसात भानूची अडमिशन झाली, आणि तिला मी शाळेत मोटरसायकलवर घेवून  जायची, तर शाळेतल्या बायका, मुल पण कुतुहलाने बघायची!  ह्याच भानूच्या शाळेत मला एकदा रांगोळी, drawing  वगैरेच्या स्पर्धा होत्या, त्यासाठी जज म्हणून पण मला  बोलावल होत!


असो, पण गाडी ही माझी लाईफ लाईन होती! नंतर नंतर आम्ही दोघी हैदराबाद शहरात पण जायला लागलो, तिथे पण भरपूर फिरलो! मला हैदराबाद शहर इतक व्यवस्थित माहित झाल की, १ महिन्यानी हे  आल्यावर मीच ह्यांना फिरवून, सगळे रस्ते दाखवून दिले!


हैदराबादच्या काही खास रेसेपी खाली देत आहे,,,,

 हैदराबादी  पुलाव:  १ वाटी बासमती तांदूळ १/२ तास आधी धुवून निथळत ठेवावे. आलं ,लसूण, हिरवी मिरची. पुदिना, कोथिंबीर, सर्व एकत्र करून पेस्ट तयार करावी. तेल/तूप ३टेबलस्पून गरम  करून दालचिनी,लवंग, ,छोटी वेलची,तमालपत्र, मोठी वेलची, घालून परतावे. नंतर लांब पातळ चिरलेला कांदा घालून परतावा.  नंतर हिरवी सिमला मिरची लांब तुकडे, नंतर बीन्सचे लांब तुकडे , आणि मटार घालून परतावे. नंतर तांदूळ घालून परतावेत. वरील हिरवी पेस्ट घालून परतावी. गरम पाणी २ ते २ १/२ वाटी घालून भात मोकळा शिजवावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे . हा पुलाव मिर्च का सालन बरोबर सर्व्ह करावे.


मिर्च का सालन :१/४ वाटी तीळ आणि २ टेबल स्पून खसखस, आणि १/४ वाटी सुक खोबर वेगळ वेगळ थोड्या तेलावर परतू एकत्र पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, मेथी दाणे, जिरे,हळद,  हिंग, आणि नंतर आलं _लसूण पेस्ट घलावे परतावे . नंतर पाणी घालुन उकळावे. वरील पेस्ट घालावी.मीठ, चिंच पेस्ट घालावी. शेवटी लांब जाड हिरव्या मिरच्या मध्ये चीर पाडून त्या मिरच्या सोडाव्यात. २  गरम करून कोथिंबीर घालून परोठा, आणि हैदराबादी पुलाव बरोबर सर्व्ह करावे.


शामी कबाब :   १ पाव मटन खिमा घ्यावा. १/२ वाटी हरबरा डाळ  भिजवून जाडसर वाटावी. तेल गरम करून त्यावर मिरे, जिरे, आलं _लसूण  पेस्ट आणि लाल मिरची पेस्ट घालून परतावे. त्यावर खिमा, डाळ  घालून ,  परतावे. कोरडे करावे. बारीक वाटावे. नंतर ही पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, तिखट घालून कबाब तळून  घ्यावेत. किंवा shallow fry  करावेत.      


 जानेवारी ९३  मध्ये आम्ही पुन्हा देवलालीला पोस्टिंगवर आलो. आणि हे जम्मू काश्मीरला duty वर दीड वर्षा   साठी गेले.                  

Thursday, 23 May 2013

खूप दिवस नानाविध  विचारांमध्ये गेले. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होत. प्रश्न भरपूर होते पण उत्तर एकाही प्रश्नाला नव्हत. अभिषेक १ १ /२  महिन्याचा होता तेंव्हा त्याला मी घरच्यांबरोबर देवदर्शनाला घेवून गेले होते. कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, सर्व करून आलो. गाडीतून जातांना त्याला पूर्ण वेळ हातात वरच्या वर धरून प्रवास केला, त्याला मानेला, पाठीला धक्का बसू नये म्हणून!   शिवाय श्रीनगरहून परत येताना आम्ही वैष्णोदेवीला पण जाऊन  आलो. घोड्यावरून वैष्णोदेवीला जाताना आणि येताना अभिषेकला मी backsack मध्ये घालून अगदी घट्ट  धरून बसले होते, त्याला धक्के बसू नये म्हणून! मी अगदी दमून गेले होते, पण मला त्याचे काहीच वाटले नाही .

तर, ह्या सगळ्यातून मी स्वतः ची   ही समजूत करून घेतली, की तो बहुधा देवदर्शना साठीच आला होता, ते झालं, आणि तो निघून गेला. पण, आज सुद्धा एकही  क्षण असा नाही की त्याचे  नाव   माझ्या  डोक्यात, मनात, नाही, किंवा त्याचा विचार माझ्या मनात नाही.


त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही उपक्रम करते आणि त्याची आठवण ठेवते.कधी लहान मुलांना कपडे, कधी कुणाची शाळेची फी भरणे,  किंवा असे  काहीही ज्यामुळे मला आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल
.





प्रमोदिनीला माझ्या नंतर एक महिन्यानीच मुलगा  झाला.  आदित्य!. त्यामुळेच की काय, माझा आदित्यवर जास्त जीव आहे, आणि त्याच्या प्रगतीत मी मनातल्या मनात अभिषेकची पण प्रगती बघते.
अभिषेक आणि आदित्य!
.आता आदित्य मोठा झाला आहे. त्याच्याशी बोललं  की छान  वाटत. त्याला बघीतलं की आनंद वाटतो. त्याला काही गिफ्ट दिलं, की मनाला समाधान मिळत!
थोडे मोठे ८ _ ९ महिन्याचे आदित्य आणि अभिषेक !
असो, सगळ दुःख आता मागे टाकले आणि फक्त छान  आठवणी समोर ठेवून पुढे निघाले.  
         .         

Tuesday, 21 May 2013

२१ दिवसांच्या सुट्टी नंतर पुण गाठलं! ती आठ नोव्हेंबर ची तारीख होती. दुसऱ्या  दिवशी अभिषेकला दवाखान्यात न्यायचं होत. थोडी सर्दी, खोकला, झाला होता आणि थोडा मलूल पण दिसत होता. आई, बाबा पण आले होते रहायला.  घराचा  गाडा  पुन्हा जागेवर आणला . घरचे जेवण जेवल्यावर काय बर वाटल, काय सांगू! अर्थात बहुतेक मन्डलींना असच वाटत असणार! दुसऱ्या दिवशी दुपारी अभिषेकला दवाखान्यात न्यायचं होत. त्यामुळे दुपारी रिक्षात बसले, तर त्याला बाय करायला ४_५  मुलांनी गर्दी केली. सगळ्यांना बाजूला केलं  आणि निघालो.मी दवाखान्यात कधीच  कुणाला बरोबर नेत नाही,तशी गरजही कधी वाटायची नाही.   पण का कोण जाणे, त्या दिवशी आईला बरोबर घेतले.

आणि अघटीत घडलं ….   चेकअप करून अभिषेकला बाहेर आणलं, आणि खुर्चीवर आईच्या मांडीवर झोपवून कपडे घालून देत होते.  तेवढ्यात___तो एकदम स्तब्ध झाला आणि डोळे मिटल्यासारखे वाटले. मला काही तरी खटकले, आणि एकदम त्याला उचलून डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी लगेच त्याला  ICU मध्ये नेले ,जे करू शकत होते ते केले ,पण…. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले …।

दिवाळीचे दिवस होते ते. घरात आकाश कंदील  लावले होते, पण  आम्ही सगळे वेगळ्याच मनः स्थितीत घरी परत आलो होतो. न माझ्या मनात प्रश्न होता की, मी भानुप्रियाला  काय उत्तर देणार होते? आणि तिला काय समजणार होते? तिचे वय तरी होते का काही समजायचे? मन सुन्न झाले होते.  अभिषेक बरोबर घालवलेले सर्व क्षण झरझर डोळ्या समोरून तरळून  गेले. पण आता काहीच हाती लागणार नव्हते….              
17 सप्टेंबरला अभिषेकचा  वाढदिवस होता! भानुप्रियानी सगळ्या फ्रेंड्सना बोलावलं  होत. मी केक बनवला, तयारी झाली,   आणि वाढदिवस मजेत साजरा झाला!
अभिषेकचा बर्थडे केक! !
जनरली, वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या  मुलाचं लक्ष फक्त केककडे  असत! तसचं  झालं होत. त्यामुळे आधी केक कापला, आणि मग सगळ्यांना खायला दिलं. 
मला केक मिळाला ना, आता तुम्ही सगळे खा!
अभिषेकला काहीच कळत नव्हत! सगळे ओरडा आरडा करीत होते, तो आपला माझ्याकडे बघत होता. मग त्याला केक भरवला, की तो खुश!
HAPPY  BIRTHDAY  TO  YOU!
   थोड्या वेळानी अभिषेक एकटाच बसला होता सगळ्यांच्या गमती बघत!
काय गोंधळ चाललाय काय माहित?
ह्या वाढदिवसानंतर आम्ही तिघ श्रीनगरला जाणार होतो. आता तिकडे एकवीस दिवसांच्या  सुट्टीवर जाणार होतो, त्यामुळे तयारी भरपूर करावी लागणार होती. विशेष म्हणजे अभिषेकची औषधं, वगैरे.

श्रीनगरला आर्मी कॅम्पमध्ये राहणार, तिथे दुकानं वगैरे काही मिळत नाही.  त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोबत न्याव्या लागणार होत्या. तिकडे थंडी नुकतीच सुरु झाली होती, त्यासाठी पण गरम कपडे न्यावेलागणार होते. ट्रेनचा जवळ जवळ ३० तासांचा प्रवास करून श्रीनगरला पोहोचलो.

ट्रेन मध्ये अभिषेकला खेळायला जागा नव्हती, पण तरी  त्याची खेळणी बरोबर  होती,म्हणून बर !    पाण्यासाठी  मोठा कुलकेग  घेवून निघालो होतो त्यामुळे पाणी तेच राहणार होते ,ते बर!पण त्यान काहीच त्रास दिला नाही! मस्त एन्जॉय  केल.  शिवाय भानू पण होती, तिची पुस्तकं  वाचणे, चित्र पाहण,वगैरे मध्ये वेळ कधी गेला कळलच  नाही!


स्टेशनवर भानुचे बाबा घ्यायला आले होते. आर्मी कॅम्प मध्ये आलो, आणि आपल्या रूम मध्ये आलो, तेंव्हा कुठे बर वाटलं!

 आर्मी कॅम्प मध्ये जेवायला मेसमध्ये  जायला लागायचं ,तिथून परत येताना पोळीचा तूप साखरेचा रोल आणायचा, म्हणजे अभिषेक हळू  हळू खात बसायचा! तिथे जे जवान होते, ते भानुचे आणि अभिषेकचे खूप लाड करायचे!

.भानुप्रीयाला बाग बगीचा फार आवडीचा! श्रीनगरच्या कॅम्प मधल्या बगीचात पण ती रमली!  
श्रीनगरच्या कॅम्प मध्ये बगीचात भानू !
श्रीनगर हा अती संवेदनशील  इलाका असल्यामुळे, तिथे आर्मीच्या गाडी व्यतिरिक्त फिरायची बंदी होती पण तरी जेवढे   फिरणे शक्य होते तेवढे  फिरलो.  .   

केवढी थंडी !पण मजा आहे ना !
      तिथे असा नियम  आहे की, एक  ठिकाणाहून दुसरीकडे जातो, तेंव्हा एकटी एखादीच गाडी निघत नाही बऱ्याच  गाड्या एकत्र निघतात. गाड्यांच्या ह्या ताफ्याला ''कोन्व्होय ' म्हणतात convoy  मधूनच जाव लागत. श्रीनगरच्या पुढे जायचं तर रस्ते फार जोखमीचे आहेत. ठराविक ठिकाणी हा convoy  थांबतो,  तिथे ब्रेकफास्टची, जेवणाची सोय असते. नंतर सर्व गाड्या पुढे निघतात. संध्याकाळ नंतर कुठलीही हालचाल होत नाही. ठराविक ठिकाणी मुक्कामाची पण सोय असते. सकाळी लवकर convoy  निघतो.  तर असा हा प्रकार! पण मजा येते हे मात्र नक्की !
अभिषेक आणि त्याचे बाबा !
   तर श्रीनगरचा  २१ दिवसांचा मुक्काम करून, आम्ही पुण्याला परत आलो! काय बर वाटल! नाहीतर तिकडे थंडीन बेजार झालो होतो!येतांना भानुचे बाबा पण बरोबर होते, कारण त्यांना सुट्टी मिळाली होती!एक महिन्याची!
अरे  मौसम बेमिसाल बेनझीर है!  ये कश्मीर है  ! ये कश्मीर है!

  सर्वांना बाय करून निघालो !        



                                



 

Saturday, 18 May 2013

अभिषेकचं  जावळ काढायचं होत. मग मामाला बोलावण  गेलं . आणि मामाला महत्वाची जवाबदारी दिली गेली!
मामावर महत्वाची कामगिरी सोपवली!
 अभिषेकचं जावळ  काढलं  तेंव्हा खूप मजा आली!  जसं  जावळ काढायला सुरुवात झाली, तसं  रडायला सुरुवात झाली!
बाळ  रडतय पण बाकी सगळे खूष! 
.पण जावळ काढल्या नंतर थोडं  तेल, क्रीम लावलं , थोडं  खायला दिलं, तेंव्हा रडायचा थांबला !
झालं  बुआ एकदाचं  ह्यांच्या मनासारखं!
भानुप्रीयाला मात्र  ह्या सगळ्या गोंधळात फक्त अभिषेकचीच काळजी होती!  

तसं  तर मी इतर वेळेस खूशच असतो!

 आता त्याचा पहिला वाढदिवस येणार होता! त्याबद्दल पुढे लिहिणार आहेच. पण, त्या आधी एक छान  रेसिपी देते __ एक समर स्पेशल mocktail !

mango  pina aqua  फेस्का :  १ वाटी आंब्याच्या फोडी, १ वाटी, अननसाच्या फोडी,  ३ टेबलस्पून किंवा जास्त साखर,१/२कप आमरस, २ पुदिना पाने,१ टीस्पून लिंबूरस,आणि १ वाटी पाणी _ सर्व मिक्सर मधून फिरवून घ्यावे, आणि चिल्ड सर्व्ह करावे.  

 




 

Friday, 17 May 2013

हे बाळंतपण घरीच  झाल्यामुळे, हॉस्पिटलमधून  घरी आल्यावर लगेचच कामाला सुरुवात झाली. मग काय, आणखीनच कसरत! काही दिवसांनी अभिषेकच बारसं   केल , पुण्याला!
कुणी गोविंद घ्या,  कुणी गोपाळ  घ्या!
बारसं  झाल्यानंतर मग मात्र  रुटीन फिक्स झाल. त्याला  रोज अंघोळ घालणे, दिवसभराच त्याच खाण्या पिण्याच लक्षात ठेवण, फिरायला नेणे वगैरे.
बाळा …… कुर्रर्र …। तुझ नाव अभिषेक बर का !
या, या, सर्वांनी बाळाला आशिर्वाद  द्या, आणि हो गिफ्ट पण हं !(just  joking रे बाबा!)

    अभिषेक हळू हळू मोठा होत होता. त्याचा स्वभाव शांत होत. खेळकर होता, आणि हट्टी  अजिबात नव्हता! त्याला खाण्याचा खूप शौक होता . जेंव्हा पासून दोन दात आले,तेंव्हा  पासून वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला लागला . शेव, फरसाण, फार आवडायचं. खीर, शिरा, फळ,दूध_केळी,सर्व आवडीने खायचा. भानुप्रीयाला खाण्यात फार कमी इंटरेस्ट , कारण तिला टिपिकल मुलींचे म्हणजे,शॉपिंग,आणि भटकणे आवडायचे!त्याच्या उलट अभिषेक, सगळा खाण्यात इंटरेस्ट!


आमच्या कामवाल्या मावशी आणि त्यांची मुल _ सगळे जण  त्याला खरच  छान सांभाळायचे!
मावशीबाई आणि अभिषेक,भानुप्रिया 



      आता, खाली दोन छानशा रेसिपी देते, हे पदार्थ  लहान मुलांना फार आवडतात!


आंब्याच्या पुऱ्या _  १ वाटी आमरस घेवून २ _ ३ tbsp  साखर घालून थोडे शिजवावे. थंड करून त्यात कणिक,आणि थोडे तूप घालून कणिक घट्ट  मळावी. हवा असल्यास थोडा पिवळा रंग घालावा. पुऱ्या  तुपात  तळून घ्याव्यात.


 फ्रुट साल्सा पार्फ़े _ एका उंच ग्लासमध्ये पाहिलं एक किंवा मिक्स फ्रुटचे तुकडे घालावेत, वरून आईसक्रीम चा स्कूप  घालावा, नंतर  थोडे चोकलेट सॉस किंवा फ्रुट सिरप घालावा, नंतर ड्राय फ्रुट्स चे तुकडेघालावेत.  घालावेत.  पुन्हा सर्व वस्तूंचे लेयर अरेंज करावेत. थंड सर्व्ह करावे.


अजून अभिषेकच्या बऱ्याच  आठवणी आहेत!     
             

Tuesday, 14 May 2013



पहिल्या दिवशी  काढलेला अभिषेकचा फोटो 
 भानू UKG मध्ये होती, तेंव्हा 'अभिषेक' झाला, आणि खर तर खूप खूप आनंद झाला. खूपच आनंद झाला. १८ सप्टेंबरला पुण्यात अभिषेकचा जन्म  झाला, भानुप्रिया तर खूप  लहान होती. पण तिला बाळ येणार ह्याचे    फार कौतुक!  बाळा  बद्दल सर्व माहिती आधीच करून घेतली होती.  रोज नवीन प्रश्न विचारायची!
.

  १८ तारखेला  अभिषेक झाला, तर दुपारी शाळेतूनच सरळ दवाखान्यात! बाळ  पहायचं म्हणून केव्हडी घाई! बाळ  हातात घेतल, मांडीवर घेतल, एकटक  त्याच्याकडेबसली  बघत बसली होती! लगेचच बाळाला घरी न्यायचं म्हणत  होती, पण ३ दिवस इथेच रहाव लागणार सांगितल्यावर घरी गेलॆ. मग रोज संध्याकाळी दवाखान्यात येणार, बाळाचे कपडे, पावडर, टिकली, करणार, डोळे का उघडत नाही म्हणून वाट  बघत राहणार!

 
घरी आल्यावर मग वेगळीच कसरत सुरु झाली!सकाळची  ह्या दोघांची घाई, आणि! त्यात बाळाची पण घाई ! पण मजा यायची. लहान बाळांच काय गणित असत माहीत नाही, पण आईनी एक घास खाल्ला, की बाळ  उठलच !चांगले झोपलेले असतात, आणि आपण जेवायला म्हणून बसाव, की ह्यांची रडायला सुरुवात!असो, पुन्हा एकदा बाल संगोपन सुरु झाले , मोठ्या जोमाने! आमच्या शेजारी एक छोटी मुलगी होती, तिचं नाव आकाशा . दोघे एकाच वयाचे, त्यामुळे दोघांची फार छान गट्टी जमली होती! आकाशाला पण माझा भारी लळा  लागला होता. दोघ एकत्र छान  खेळायचे,खायचे, तासन तास रमायचे! नाशिकची आजी आली म्हणजे मग मुलांचा चार्ज आजीकडे !
नाशिकच्या आजीची नातवंडे !

अभिषेक आणि त्याची मैत्रीण आकाशा !


अभिषेकला इंजेक्शन द्यायचं तर भानू पण हॉस्पिटल मध्ये येणार, त्याची सामानाची पिशवी घेणार, सगळ  तीच करणार !शाळेतून आली की कपडे बदलून आधी बाळाला घेणार, त्याच्या  दिवसभरातल्या गमती ऐकणार,  भरपूर हसणार आम्ही दोघी, आणि मग जेवायला बसणार! काही खायला घेतल की त्याला विचारणार "तुला हवं ?" संध्याकाळी  फिरायला नेणार, मग अभ्यासाला बसल तरी, त्याला तिथे जवळ ठेवायचं!  शाळेत निघाली की त्याला सांगून जाणार "मी दुपारी परत येते हं ! तू झोप !अरे बापरे! इतक हसू यायचं  तिची वाक्य ऐकून की बस! खूप जपायची.  त्याला दुधाची बाटली देणार, नंतर थोडा मोठा झाला मग खायला देणार, त्याला शेव,  छोटी बिस्कीट फार आवडायची ,ते त्याला देणार, आणि एकीकडे त्याच्याशी गप्पा मारणार! एकदम छान सांभाळायची त्याला!
मामा बरोबर गप्पा मारताना अभिषेक 




अभिषेकला सांभाळायला कधीपण रेडी ! 


जसा अभिषेक चालायला लागला, तसं  त्याला सगळीकडे हात धरून न्यायची ! त्यानं  काही केल   तरी कधी रागवायची नाही . त्याच कोणतही काम करायला तयार ! त्याच्या साठी खरेदी करायची म्हटल की,  हिलाच फार आनंद! वस्तू आणल्या की त्याला दाखवणार, नीट जाग्यावर ठेवून देणार! खरच, ते एक वर्ष कसं   गेलं कळलच नाही
ही अभिषेकची आवडती जागा_ सेंटर टेबलला धरून उभे राहणे!
.  तर , अश्याच गोड आठवणी काढत काही गोड रेसिपी शेअर करते, ज्या लहान मुलांना फार आवडतात !

चौपाटी पोहे _. जाड पोहे तळून घ्यवेत. त्यात तळलेले दाणे ,बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमेटो ,चिंचेची चटणी,फरसाण,शेव,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करून द्यावे. हवे असल्यास लाल मिरचीची चटणी , कोथिंबीर_ पुदिना चटणी घालून द्यावे



SMOOTHIE:  एका उंच ग्लासमध्ये पहिले थोडा फ्रुट पल्प घालावा, वरून थोडे घट्ट  क्रीम घालावे, नंतर घट्ट  दही घालावे, नंतर बिस्किटचा चुरा  घालावा, नंतर केकचे छोटे तुकडे घालावेत,आणि शेवटी थोडा फ्रुट पल्प घालून, वरती चेरी लावून द्यावे.

दोन्ही  डिशेस  उन्हाळ्यात करून खाण्यासारख्या  आहेत .          :



.


      


                 

Thursday, 9 May 2013



२ रीतला क्लास फोटो !
भानुप्रियाचे सेंट हेलेनाज्चे दिवस फार छान   होते. ह्या शाळेत तिला १ तासाचा  लंच ब्रेक होता .  सकाळी ८ वाजता शाळा त्यामुळे ७ . ३ ० लाच रिक्षावाले यायचे. एक छोटी सुट्टी आणि जेवणाची सुट्टी, त्यामुळे दोन दोन डबे सकाळी तयार व्हायचे. भाजी, पोळी, भात आणि आमटी, सलाड, ताक  असे सर्व काही डब्यात असायचे. असा शाही लंच ब्रेक ह्याच शाळेत अनुभवायला मिळाला. कारण , ह्या शाळेत मुली   जवळपास च्याच म्हणजे cantt एरीयातल्या_ सिंधी, पंजाबी , क्रिश्चन ,वगैरे जास्त. त्यांच्या लाइफ स्टाईल प्रमाणे, त्यांच्या  घरूनबहुतेक करून कामाला येणारी मन्डळी  डबे घेवून यायची. ही मंडळी  कारमधून प्रॉपर   डब्बा आणीत असत . _बास्केट मध्ये सोफ्ट ड्रिंकची छोटी बाटली, ताकाची बाटली, भाजी,पोळी, नमकीन, पेपरनाप्कीनच नाही तर काटा,चमचा सुद्धा असायचा !व्यवस्थित पणे mat टाकून , त्यावर डब्बा अरेंज केला जायचा !मग त्यांचे बाबा किंवा बेबी लोग जेवणार!
पहिल्या पासून हुशार हो! दर वर्षी काही न काही बक्षीस ठरलेलच!


सकाळी साडेसातला गेली की भानुप्रिया संध्याकाळी चार वाजता  यायची. मग दूध, खाणे ,आणि विश्रांती झाली की खेळणे! नंतर आम्ही दोघी मोटरसायकल वर फिरायला जायचो. cantt , हडपसर, पुणे सिटी, सगळीकडे फिरायचो. मला आठवतंय,  मोटरसायकल वर सुमा पुढे tank  वर  बसायची, आणि भानूला बेल्ट लावून मागे बसवायची! अशी आमची वरात निघाली, की सगळे लोक   कौतुकाने पहायचे!नंतर मग  भानुप्रिया पुढे बसायला लागली तर सुमाला ते अजिबात आवडायचं नाही! पण भानू तिच्याशी इतक गोड बोलायचे की बस!

शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही तिचा सहभाग असायचा! कॅरोल सिंगिंग हा अनोखा प्रकार ती ह्या शाळेतच शिकली. हा फार युनिक असा अनुभव होता. . . ती शाळेत तशी अबोल होती पण, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायची. तशी कमी बोलायची, पण  एकदम वागण बोलण एकदम करेक्ट, टीचरसना फार आवडायची !                





कॅरोल सिंगीन्गच्या ग्रुपमध्ये !

अशीच  मिळून मिसळून ती आजही वागते! तर तिला आवडणारी एक डिश म्हणजे ______


सेवरी ब्रेड ___तेल गरम करून, लसूण, कांदा, परतणे . त्यावर टोमेटो  puree घालून परतणे  . नंतर त्यात कोथिंबीर _पुदिना पेस्ट घालून परतणे. प्लेटमध्ये मोठे ब्रेडचे तुकडे ठेवावेत. त्यावर हा रस्सा घालावा,. वरून शेव, लिंबू रस,कोथिंबीर घालून गरम सर्व्ह करावे.                       
               

Tuesday, 7 May 2013

BHANUPRIYA!!!!!
रोल करीत करीत खुर्ची खाली केव्हा अडकली तिलाच कळल  नाही !

पहिल्यांदा  रांगली  तो क्षण लगेच टिपला !














madam  ना बागकामाची भारीच आवड !
 भानुप्रियाचा  पहिला वाढदिवस ! आणि मी केलेला केक 
पहिला वाढदिवस होता आणि भानुप्रीयाला फ्रॉक  घालून तयार केल, आणि मग मी तयार झाले आणि पाहते तर दोघींच्या ड्रेसचा कलर सेम टू  सेम! फोटो पाहताच आहात ना ! पण तेंव्हा पासून ही ट्रेंड आहे बर का! आमच्या  दोघींच्या  ड्रेस किंवा माझी साडी आणि तिचा ड्रेस हे match होत असतात ! आम्ही कितीही ठरवून कपडे केले तरी बर्याच वेळा हे matching  घडूनच येते ! आजकाल तर असे matching  झाले की  भानुप्रिया चेष्टेने म्हणते की, ममी ,डोंट  embaress मी ,okay ! असो, तर अशी मजा असते!
 
तिला हळू हळू नवीन नवीन गोष्टी शिकवत गेले,वाचनाची गोडी लावली, खूप पुस्तक आणली, गाण्यांच्या कसेट  आणल्या, आणि गाणी लावली की, मस्त नाचत बसायची !तिच्या खोलीत, तिच्या वस्तूंमध्ये ती खूप रमायची! बार्बी डॉल ,भातुकली, छोटे छोटे खेळ , काही न काही खेळत रहायची ! कुणी मुल आली तर त्यांच्या बरोबर पण खेळायची!

देवळाली मधील दिवस कसे गेले कळलच नाही ! जशी जशी भानुप्रिया मोठी होत होती, नवीन नवीन गोष्टी शिकत होती. २ 1/२  वर्षांची झाली तेंव्हा तिला play  school मध्ये घातली. तिच्या क्रिश्चन टीचर होत्या,त्या   फ्रॉक घालायच्या, म्हणून त्यांचे नाव 'फ्रॉक वाल्या मिस ' भानुला त्या फार आवडायच्या, आणि अजून पण त्यांची आठवण काढते. मध्यंतरी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, तेंव्हा त्यांना फार आनंद झाला होता.


ह्या शाळेतून नंतर आर्मी स्कूल मध्ये गेलॆ. UKG झाली आणि आम्ही पुण्याला पोस्टिंग वर आलो. St . हेलेना'ज मध्ये 6th  पर्यंत दिवस फार छान गेले, अगदी चटपटीत चाट प्रमाणे!  तर खाली दोन चाटच्या रेसिपी देते आहे.

कॉर्न फ्लेक्स _आलू  चाट :  १/२ वाटी  कॉर्न फ्लेक्स, १/२ वाटी उकडलेले बटाटे फोडी, १/४ वाटी  बारीक तुकडे काकडी,१/४ वाटी  बारीक कापलेले टोमाटो तुकडे ,  १/४ वाटी बारीक चिरून कांदाबारीक चिरून हिरवी मिरची,  तळून शेंगदाणे, कोथिंबीर,चाट  मसाला,चिंच_गुळाची चटणी, आणि लिंबू रस _सर्व साहित्य एकत्र करून, चाट सर्व करावा.

                     
चना _आलू चाट  _  वरील प्रमाणेच चाट करणे, पण कॉर्न फ्लेक्स ऐवजी काला चना  भिजवून शिजवून घ्यावा.

पुन्हा भेटूयात!