२१ दिवसांच्या सुट्टी नंतर पुण गाठलं! ती आठ नोव्हेंबर ची तारीख होती. दुसऱ्या दिवशी अभिषेकला दवाखान्यात न्यायचं होत. थोडी सर्दी, खोकला, झाला होता आणि थोडा मलूल पण दिसत होता. आई, बाबा पण आले होते रहायला. घराचा गाडा पुन्हा जागेवर आणला . घरचे जेवण जेवल्यावर काय बर वाटल, काय सांगू! अर्थात बहुतेक मन्डलींना असच वाटत असणार! दुसऱ्या दिवशी दुपारी अभिषेकला दवाखान्यात न्यायचं होत. त्यामुळे दुपारी रिक्षात बसले, तर त्याला बाय करायला ४_५ मुलांनी गर्दी केली. सगळ्यांना बाजूला केलं आणि निघालो.मी दवाखान्यात कधीच कुणाला बरोबर नेत नाही,तशी गरजही कधी वाटायची नाही. पण का कोण जाणे, त्या दिवशी आईला बरोबर घेतले.
आणि अघटीत घडलं …. चेकअप करून अभिषेकला बाहेर आणलं, आणि खुर्चीवर आईच्या मांडीवर झोपवून कपडे घालून देत होते. तेवढ्यात___तो एकदम स्तब्ध झाला आणि डोळे मिटल्यासारखे वाटले. मला काही तरी खटकले, आणि एकदम त्याला उचलून डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी लगेच त्याला ICU मध्ये नेले ,जे करू शकत होते ते केले ,पण…. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले …।
दिवाळीचे दिवस होते ते. घरात आकाश कंदील लावले होते, पण आम्ही सगळे वेगळ्याच मनः स्थितीत घरी परत आलो होतो. न माझ्या मनात प्रश्न होता की, मी भानुप्रियाला काय उत्तर देणार होते? आणि तिला काय समजणार होते? तिचे वय तरी होते का काही समजायचे? मन सुन्न झाले होते. अभिषेक बरोबर घालवलेले सर्व क्षण झरझर डोळ्या समोरून तरळून गेले. पण आता काहीच हाती लागणार नव्हते….

No comments:
Post a Comment