अभिषेकचं जावळ काढायचं होत. मग मामाला बोलावण गेलं . आणि मामाला महत्वाची जवाबदारी दिली गेली!
 |
| मामावर महत्वाची कामगिरी सोपवली! |
अभिषेकचं जावळ काढलं तेंव्हा खूप मजा आली! जसं जावळ काढायला सुरुवात झाली, तसं रडायला सुरुवात झाली!
 |
| बाळ रडतय पण बाकी सगळे खूष! |
.पण जावळ काढल्या नंतर थोडं तेल, क्रीम लावलं , थोडं खायला दिलं, तेंव्हा रडायचा थांबला !
 |
| झालं बुआ एकदाचं ह्यांच्या मनासारखं! |
भानुप्रीयाला मात्र ह्या सगळ्या गोंधळात फक्त अभिषेकचीच काळजी होती!
 |
| तसं तर मी इतर वेळेस खूशच असतो! |
आता त्याचा पहिला वाढदिवस येणार होता! त्याबद्दल पुढे लिहिणार आहेच. पण, त्या आधी एक छान रेसिपी देते __ एक समर स्पेशल mocktail !
mango pina aqua फेस्का : १ वाटी आंब्याच्या फोडी, १ वाटी, अननसाच्या फोडी, ३ टेबलस्पून किंवा जास्त साखर,१/२कप आमरस, २ पुदिना पाने,१ टीस्पून लिंबूरस,आणि १ वाटी पाणी _ सर्व मिक्सर मधून फिरवून घ्यावे, आणि चिल्ड सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment