Tuesday, 21 May 2013

17 सप्टेंबरला अभिषेकचा  वाढदिवस होता! भानुप्रियानी सगळ्या फ्रेंड्सना बोलावलं  होत. मी केक बनवला, तयारी झाली,   आणि वाढदिवस मजेत साजरा झाला!
अभिषेकचा बर्थडे केक! !
जनरली, वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या  मुलाचं लक्ष फक्त केककडे  असत! तसचं  झालं होत. त्यामुळे आधी केक कापला, आणि मग सगळ्यांना खायला दिलं. 
मला केक मिळाला ना, आता तुम्ही सगळे खा!
अभिषेकला काहीच कळत नव्हत! सगळे ओरडा आरडा करीत होते, तो आपला माझ्याकडे बघत होता. मग त्याला केक भरवला, की तो खुश!
HAPPY  BIRTHDAY  TO  YOU!
   थोड्या वेळानी अभिषेक एकटाच बसला होता सगळ्यांच्या गमती बघत!
काय गोंधळ चाललाय काय माहित?
ह्या वाढदिवसानंतर आम्ही तिघ श्रीनगरला जाणार होतो. आता तिकडे एकवीस दिवसांच्या  सुट्टीवर जाणार होतो, त्यामुळे तयारी भरपूर करावी लागणार होती. विशेष म्हणजे अभिषेकची औषधं, वगैरे.

श्रीनगरला आर्मी कॅम्पमध्ये राहणार, तिथे दुकानं वगैरे काही मिळत नाही.  त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोबत न्याव्या लागणार होत्या. तिकडे थंडी नुकतीच सुरु झाली होती, त्यासाठी पण गरम कपडे न्यावेलागणार होते. ट्रेनचा जवळ जवळ ३० तासांचा प्रवास करून श्रीनगरला पोहोचलो.

ट्रेन मध्ये अभिषेकला खेळायला जागा नव्हती, पण तरी  त्याची खेळणी बरोबर  होती,म्हणून बर !    पाण्यासाठी  मोठा कुलकेग  घेवून निघालो होतो त्यामुळे पाणी तेच राहणार होते ,ते बर!पण त्यान काहीच त्रास दिला नाही! मस्त एन्जॉय  केल.  शिवाय भानू पण होती, तिची पुस्तकं  वाचणे, चित्र पाहण,वगैरे मध्ये वेळ कधी गेला कळलच  नाही!


स्टेशनवर भानुचे बाबा घ्यायला आले होते. आर्मी कॅम्प मध्ये आलो, आणि आपल्या रूम मध्ये आलो, तेंव्हा कुठे बर वाटलं!

 आर्मी कॅम्प मध्ये जेवायला मेसमध्ये  जायला लागायचं ,तिथून परत येताना पोळीचा तूप साखरेचा रोल आणायचा, म्हणजे अभिषेक हळू  हळू खात बसायचा! तिथे जे जवान होते, ते भानुचे आणि अभिषेकचे खूप लाड करायचे!

.भानुप्रीयाला बाग बगीचा फार आवडीचा! श्रीनगरच्या कॅम्प मधल्या बगीचात पण ती रमली!  
श्रीनगरच्या कॅम्प मध्ये बगीचात भानू !
श्रीनगर हा अती संवेदनशील  इलाका असल्यामुळे, तिथे आर्मीच्या गाडी व्यतिरिक्त फिरायची बंदी होती पण तरी जेवढे   फिरणे शक्य होते तेवढे  फिरलो.  .   

केवढी थंडी !पण मजा आहे ना !
      तिथे असा नियम  आहे की, एक  ठिकाणाहून दुसरीकडे जातो, तेंव्हा एकटी एखादीच गाडी निघत नाही बऱ्याच  गाड्या एकत्र निघतात. गाड्यांच्या ह्या ताफ्याला ''कोन्व्होय ' म्हणतात convoy  मधूनच जाव लागत. श्रीनगरच्या पुढे जायचं तर रस्ते फार जोखमीचे आहेत. ठराविक ठिकाणी हा convoy  थांबतो,  तिथे ब्रेकफास्टची, जेवणाची सोय असते. नंतर सर्व गाड्या पुढे निघतात. संध्याकाळ नंतर कुठलीही हालचाल होत नाही. ठराविक ठिकाणी मुक्कामाची पण सोय असते. सकाळी लवकर convoy  निघतो.  तर असा हा प्रकार! पण मजा येते हे मात्र नक्की !
अभिषेक आणि त्याचे बाबा !
   तर श्रीनगरचा  २१ दिवसांचा मुक्काम करून, आम्ही पुण्याला परत आलो! काय बर वाटल! नाहीतर तिकडे थंडीन बेजार झालो होतो!येतांना भानुचे बाबा पण बरोबर होते, कारण त्यांना सुट्टी मिळाली होती!एक महिन्याची!
अरे  मौसम बेमिसाल बेनझीर है!  ये कश्मीर है  ! ये कश्मीर है!

  सर्वांना बाय करून निघालो !        



                                



 

No comments:

Post a Comment