| पहिल्या दिवशी काढलेला अभिषेकचा फोटो |
.
१८ तारखेला अभिषेक झाला, तर दुपारी शाळेतूनच सरळ दवाखान्यात! बाळ पहायचं म्हणून केव्हडी घाई! बाळ हातात घेतल, मांडीवर घेतल, एकटक त्याच्याकडेबसली बघत बसली होती! लगेचच बाळाला घरी न्यायचं म्हणत होती, पण ३ दिवस इथेच रहाव लागणार सांगितल्यावर घरी गेलॆ. मग रोज संध्याकाळी दवाखान्यात येणार, बाळाचे कपडे, पावडर, टिकली, करणार, डोळे का उघडत नाही म्हणून वाट बघत राहणार!
घरी आल्यावर मग वेगळीच कसरत सुरु झाली!सकाळची ह्या दोघांची घाई, आणि! त्यात बाळाची पण घाई ! पण मजा यायची. लहान बाळांच काय गणित असत माहीत नाही, पण आईनी एक घास खाल्ला, की बाळ उठलच !चांगले झोपलेले असतात, आणि आपण जेवायला म्हणून बसाव, की ह्यांची रडायला सुरुवात!असो, पुन्हा एकदा बाल संगोपन सुरु झाले , मोठ्या जोमाने! आमच्या शेजारी एक छोटी मुलगी होती, तिचं नाव आकाशा . दोघे एकाच वयाचे, त्यामुळे दोघांची फार छान गट्टी जमली होती! आकाशाला पण माझा भारी लळा लागला होता. दोघ एकत्र छान खेळायचे,खायचे, तासन तास रमायचे! नाशिकची आजी आली म्हणजे मग मुलांचा चार्ज आजीकडे !
| नाशिकच्या आजीची नातवंडे ! |
| अभिषेक आणि त्याची मैत्रीण आकाशा ! |
अभिषेकला इंजेक्शन द्यायचं तर भानू पण हॉस्पिटल मध्ये येणार, त्याची सामानाची पिशवी घेणार, सगळ तीच करणार !शाळेतून आली की कपडे बदलून आधी बाळाला घेणार, त्याच्या दिवसभरातल्या गमती ऐकणार, भरपूर हसणार आम्ही दोघी, आणि मग जेवायला बसणार! काही खायला घेतल की त्याला विचारणार "तुला हवं ?" संध्याकाळी फिरायला नेणार, मग अभ्यासाला बसल तरी, त्याला तिथे जवळ ठेवायचं! शाळेत निघाली की त्याला सांगून जाणार "मी दुपारी परत येते हं ! तू झोप !अरे बापरे! इतक हसू यायचं तिची वाक्य ऐकून की बस! खूप जपायची. त्याला दुधाची बाटली देणार, नंतर थोडा मोठा झाला मग खायला देणार, त्याला शेव, छोटी बिस्कीट फार आवडायची ,ते त्याला देणार, आणि एकीकडे त्याच्याशी गप्पा मारणार! एकदम छान सांभाळायची त्याला!
| मामा बरोबर गप्पा मारताना अभिषेक |
| अभिषेकला सांभाळायला कधीपण रेडी ! |
जसा अभिषेक चालायला लागला, तसं त्याला सगळीकडे हात धरून न्यायची ! त्यानं काही केल तरी कधी रागवायची नाही . त्याच कोणतही काम करायला तयार ! त्याच्या साठी खरेदी करायची म्हटल की, हिलाच फार आनंद! वस्तू आणल्या की त्याला दाखवणार, नीट जाग्यावर ठेवून देणार! खरच, ते एक वर्ष कसं गेलं कळलच नाही
| ही अभिषेकची आवडती जागा_ सेंटर टेबलला धरून उभे राहणे! |
चौपाटी पोहे _. जाड पोहे तळून घ्यवेत. त्यात तळलेले दाणे ,बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमेटो ,चिंचेची चटणी,फरसाण,शेव,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करून द्यावे. हवे असल्यास लाल मिरचीची चटणी , कोथिंबीर_ पुदिना चटणी घालून द्यावे
SMOOTHIE: एका उंच ग्लासमध्ये पहिले थोडा फ्रुट पल्प घालावा, वरून थोडे घट्ट क्रीम घालावे, नंतर घट्ट दही घालावे, नंतर बिस्किटचा चुरा घालावा, नंतर केकचे छोटे तुकडे घालावेत,आणि शेवटी थोडा फ्रुट पल्प घालून, वरती चेरी लावून द्यावे.
दोन्ही डिशेस उन्हाळ्यात करून खाण्यासारख्या आहेत . :
.
No comments:
Post a Comment