BHANUPRIYA!!!!!
 |
| रोल करीत करीत खुर्ची खाली केव्हा अडकली तिलाच कळल नाही ! |
 |
| पहिल्यांदा रांगली तो क्षण लगेच टिपला ! |
 |
| madam ना बागकामाची भारीच आवड ! |
 |
| भानुप्रियाचा पहिला वाढदिवस ! आणि मी केलेला केक |
पहिला वाढदिवस होता आणि भानुप्रीयाला फ्रॉक घालून तयार केल, आणि मग मी तयार झाले आणि पाहते तर दोघींच्या ड्रेसचा कलर सेम टू सेम! फोटो पाहताच आहात ना ! पण तेंव्हा पासून ही ट्रेंड आहे बर का! आमच्या दोघींच्या ड्रेस किंवा माझी साडी आणि तिचा ड्रेस हे match होत असतात ! आम्ही कितीही ठरवून कपडे केले तरी बर्याच वेळा हे matching घडूनच येते ! आजकाल तर असे matching झाले की भानुप्रिया चेष्टेने म्हणते की, ममी ,डोंट embaress मी ,okay ! असो, तर अशी मजा असते!
तिला हळू हळू नवीन नवीन गोष्टी शिकवत गेले,वाचनाची गोडी लावली, खूप पुस्तक आणली, गाण्यांच्या कसेट आणल्या, आणि गाणी लावली की, मस्त नाचत बसायची !तिच्या खोलीत, तिच्या वस्तूंमध्ये ती खूप रमायची! बार्बी डॉल ,भातुकली, छोटे छोटे खेळ , काही न काही खेळत रहायची ! कुणी मुल आली तर त्यांच्या बरोबर पण खेळायची!
देवळाली मधील दिवस कसे गेले कळलच नाही ! जशी जशी भानुप्रिया मोठी होत होती, नवीन नवीन गोष्टी शिकत होती. २ 1/२ वर्षांची झाली तेंव्हा तिला play school मध्ये घातली. तिच्या क्रिश्चन टीचर होत्या,त्या फ्रॉक घालायच्या, म्हणून त्यांचे नाव 'फ्रॉक वाल्या मिस ' भानुला त्या फार आवडायच्या, आणि अजून पण त्यांची आठवण काढते. मध्यंतरी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, तेंव्हा त्यांना फार आनंद झाला होता.
ह्या शाळेतून नंतर आर्मी स्कूल मध्ये गेलॆ. UKG झाली आणि आम्ही पुण्याला पोस्टिंग वर आलो. St . हेलेना'ज मध्ये 6th पर्यंत दिवस फार छान गेले, अगदी चटपटीत चाट प्रमाणे! तर खाली दोन चाटच्या रेसिपी देते आहे.
कॉर्न फ्लेक्स _आलू चाट : १/२ वाटी कॉर्न फ्लेक्स, १/२ वाटी उकडलेले बटाटे फोडी, १/४ वाटी बारीक तुकडे काकडी,१/४ वाटी बारीक कापलेले टोमाटो तुकडे , १/४ वाटी बारीक चिरून कांदाबारीक चिरून हिरवी मिरची, तळून शेंगदाणे, कोथिंबीर,चाट मसाला,चिंच_गुळाची चटणी, आणि लिंबू रस _सर्व साहित्य एकत्र करून, चाट सर्व करावा.
चना _आलू चाट _ वरील प्रमाणेच चाट करणे, पण कॉर्न फ्लेक्स ऐवजी काला चना भिजवून शिजवून घ्यावा.
पुन्हा भेटूयात!
No comments:
Post a Comment