Friday, 17 May 2013

हे बाळंतपण घरीच  झाल्यामुळे, हॉस्पिटलमधून  घरी आल्यावर लगेचच कामाला सुरुवात झाली. मग काय, आणखीनच कसरत! काही दिवसांनी अभिषेकच बारसं   केल , पुण्याला!
कुणी गोविंद घ्या,  कुणी गोपाळ  घ्या!
बारसं  झाल्यानंतर मग मात्र  रुटीन फिक्स झाल. त्याला  रोज अंघोळ घालणे, दिवसभराच त्याच खाण्या पिण्याच लक्षात ठेवण, फिरायला नेणे वगैरे.
बाळा …… कुर्रर्र …। तुझ नाव अभिषेक बर का !
या, या, सर्वांनी बाळाला आशिर्वाद  द्या, आणि हो गिफ्ट पण हं !(just  joking रे बाबा!)

    अभिषेक हळू हळू मोठा होत होता. त्याचा स्वभाव शांत होत. खेळकर होता, आणि हट्टी  अजिबात नव्हता! त्याला खाण्याचा खूप शौक होता . जेंव्हा पासून दोन दात आले,तेंव्हा  पासून वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला लागला . शेव, फरसाण, फार आवडायचं. खीर, शिरा, फळ,दूध_केळी,सर्व आवडीने खायचा. भानुप्रीयाला खाण्यात फार कमी इंटरेस्ट , कारण तिला टिपिकल मुलींचे म्हणजे,शॉपिंग,आणि भटकणे आवडायचे!त्याच्या उलट अभिषेक, सगळा खाण्यात इंटरेस्ट!


आमच्या कामवाल्या मावशी आणि त्यांची मुल _ सगळे जण  त्याला खरच  छान सांभाळायचे!
मावशीबाई आणि अभिषेक,भानुप्रिया 



      आता, खाली दोन छानशा रेसिपी देते, हे पदार्थ  लहान मुलांना फार आवडतात!


आंब्याच्या पुऱ्या _  १ वाटी आमरस घेवून २ _ ३ tbsp  साखर घालून थोडे शिजवावे. थंड करून त्यात कणिक,आणि थोडे तूप घालून कणिक घट्ट  मळावी. हवा असल्यास थोडा पिवळा रंग घालावा. पुऱ्या  तुपात  तळून घ्याव्यात.


 फ्रुट साल्सा पार्फ़े _ एका उंच ग्लासमध्ये पाहिलं एक किंवा मिक्स फ्रुटचे तुकडे घालावेत, वरून आईसक्रीम चा स्कूप  घालावा, नंतर  थोडे चोकलेट सॉस किंवा फ्रुट सिरप घालावा, नंतर ड्राय फ्रुट्स चे तुकडेघालावेत.  घालावेत.  पुन्हा सर्व वस्तूंचे लेयर अरेंज करावेत. थंड सर्व्ह करावे.


अजून अभिषेकच्या बऱ्याच  आठवणी आहेत!     
             

No comments:

Post a Comment