काल दुपारी गौरींना, आणि बाप्पाला दहीभात, भाजीपोळीचा साधासाच नैवेद्य दाखवून, संध्याकाळी घरच्या गणपती बाप्पाचे विसाजन केले. बाप्पाला निरोप देतांना, ' गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असं म्हणत म्हणत संपूर्ण घरातून बाप्पाला फिरवून, घरा भोवती फेरी मारून, नंतर बादलीत बाप्पाचे विसर्जन केले, तेंव्हा खरच डोळ्यात पाणी येतं, आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणतांना तोंडातून शब्द फुटत नाहीसे होतात.
बाप्पाची शाडू मातीची मूर्ती आणली, आणि घरीच बादलीत विसर्जन केले. ह्याचे बरेच फायदे आहेत…. एक तर, शहर हद्दीत गर्दीत जाण्याचा त्रास वाचतो, दुसरं म्हणजे, नदीच्या काठी जाऊन , प्रदूषित पाण्यातले प्रदूषण वाढवण्याचे पाप होत नाही, तिसरं म्हणजे, शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाला पूरक असे विसर्जन होते. चौथा फायदा हा की, बादलीत विसर्जन करून दोन चार दिवसांनी ही माती बागेत खत आणि बाप्पाचा आशीर्वाद म्हणून पसरून देवून, बागेची देखभाल पण Eco _ friendly पद्धतीने करता येते.
बाप्पाला शिधा म्हणून दहीपोहे आणि कान्होले होते.
विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्याच्या स्रोतां जवळ, खडकांवर, गणपतीच्या प्लास्टर ऑफ पेरिसच्या छोट्यामोठ्या मूर्ती भंगलेल्या अवस्थेत इतस्तः पडलेल्या आढळतात, त्यांच्या भोवती निर्माल्य, कचरा, आणि अनेक प्रदूषित वस्तू अडकलेल्या आढळतात, तेंव्हा अत्यंत दुःख होतं, मनाला क्लेश होतो. एक विचारावेसे वाटते, आपण इतक्या श्रद्धेने, प्रेमाने ज्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली, दहा दिवस त्याच्या आरती, पूजनात लीन होतो , त्याच बाप्पाला असे विसर्जन करून हालत केलेली आपल्याला पटते? मनाला रुचते? पाहूयात की असे वेडेवाकडे पडलेल्या त्या बाप्पाला काय वाटत असेल? आपल्याला कुणी असे वरून नदीत फेकून दिले, लोटून दिले, नदीच्या किनारी कचऱ्यात फेकले तर आपल्याला कसे वाटेल? मग विचार करा,त्या \विघ्नहर्त्याला किती क्लेश, किती दुःख होत असेल ते. हा 'विनायक' असा 'विदारक' अवस्थेत पडलेला अनेकांना वाईट वाटतं, पण ह्यात आपण एकटे फारसं काही करू शकणार नाही, हे प्रत्येकाला माहित असतं, आणि ही लाचारीची भावना, त्या विदारक दृश्यापेक्षा अनेक पटींनी जास्त क्लेशकारक असते .
तेंव्हा ही लाचारीची, अगतिकतेची बोच थोडी कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या परीने शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करून, त्याचे आशीर्वाद मागतो एवढेच! प्रत्येकाने एक छोटीशी सुरुवात केली, तरी बरच काही होऊ शकतं!

| बाप्पाचा शिधा_ कान्होले आणि दहीपोहे |

No comments:
Post a Comment