![]() |
सेंट हेलेनाज स्कूल, पुणे |
क्रिसमस च्या सुट्टी आधीच, शाळेत मुल santaclaus, रेनडीअर, स्नोमन, मिशेलटो, वगैरे वस्तू बनवायचे, आणि त्यातल्या उत्तम कलाकृती ला बक्षीस पण मिळायचं! शिवाय, रिझल्टच्या आधी हे सगळ व्हायचं, त्यामुळे रिझल्ट च्या दिवशी क्लास मध्ये सर्व वस्तू पालकांना बघायला मिळायच्या. भानुप्रियाला बक्षीस नक्की मिळायचं, आणि टीचर तिचं कौतुक करायच्या ते वेगळच! कारण, ती नेहमी पहिली किंवा दुसरी यायची वर्गात! पण टीचरची एक तक्रार नेहमी असायची की ही क्लास मध्ये अजिबातच बोलत नाही! म्हणजे अबोल आहे! पण त्याला इलाज नव्हता! भानुला फार कौतुक आहे त्या शाळेच! शिवाय, annual day च्या दिवशी देखील कार्यक्रमात ती भाग घ्यायचीच! नाच, नाटक, कॅरोल सिंगिंग सगळीकडे ती अगदी उत्साहानी असायची! नंतर बक्षीस समारंभ व्हायचा! त्यात पण तिला बक्षीस असायचं!
माझं बाई बक्षीस ठरलेलच बर! |
कॅरोल सिंगिंग मला फार आवडायचं! |
मला सवय आहे बक्षिसाची! पण आनंद होतो, हो की नाही? |
मी कुठे आहे, ओळखा पाहू ? |
भानुप्रियाला मी कधी कधी शाळेतून आणायला जायची, तेंव्हा फार गम्मत व्हायची! म्हणजे व्हायचं काय की, जिन्याकडे बघत उभी रहायची,की मला ती आलेली दिसेल म्हणून. पण सगळ्या मुली सारख्याच दिसायच्या मला! तेच युनिफोर्म, तीच उंची, त्याच दोन वेण्या!(पुरावा हवा असेल तर वारचा फोटो बघा,म्हणजे कळेल!) आणि एव्हढ्यात ती पुढे येवून उभी रहाते, आणि विचारते, आई , तुला मी दिसत नाही का? फार हसू यायचं तेंव्हा!
आमची आई पण कमाल आहे! कशी ओळखत नाही मला, कुणास ठाऊक! |
आणि त्या नंतर बंगलोर च्या शाळेत गेल्यावर थोडी सुधारणा झाली, आणि नंतर इतकी सुधारणा की सांबा (जम्मू _काश्मीर)च्या शाळेत तिला अगदी बडबडी म्हणायचे! मला आठवतंय,त्या आधी लखनौ च्या शाळेत मी तिच्या क्लास मध्ये मुलींना विचारल,'ये भानुप्रिया बात वात करती है के नही? तर तिच्या मैत्रिणी म्हणाल्या,'आंटी ,इसको तो चूप कराना पडता है!'
तर आत्ता एक अशीच चूप बसवणारी छान टेस्टी डिश:
शाही ब्रेड: ब्रेडचे मोठे तुकडे करून तुपात तळून घ्यावेत. नारळाचे काप, काजू , बदाम तुकडे तुपात तळून घ्यावेत. गुळाचा पातळ पाक करून ठेवावा. नारळाचे दूध काढून ठेवावे.
आता, तूप गरम करून gas स्लो ठेवून त्यात पाक ओतावा. हळू हळू नारळाचे दूध घालावे.gas बंद करावा. तळलेले ब्रेडचे तुकडे, काजू, बदाम, मिक्स करावेत. थंड सर्व्ह करावे.
वेरिएशन म्हणून _ ट्रे मध्ये ब्रेडचे तुकडे अरेंज करून त्यावर नारळाचे दूध व पाकाचे मिश्रण , ड्राय फ्रुट्स घालून थंड सर्व्ह करावे.
एन्जॉय करा!
No comments:
Post a Comment