भनुप्रियाच्या एका मैत्रिणीची गोष्ट मला आठवत्ये. पुण्यात ही मैत्रीण होती,तन्वी !दोघींची छान मैत्री होती. एकदा तन्वी आमच्या कडे दिवसांसाठी रहायला आली होती. भानुप्रियाला तर काहीतरी खाण्यासाठी सारखं सारखं सांगायला लागायचं, तेंव्हाच ती काही तरी खायची! ह्या सवयी मुळे तिच्या ह्या मैत्रीणीला सारखी सारखी खाण्या साठी विचारायचे माझ्या लक्षातच यायचे नाही! पण तन्वीला सतत काही तरी snacks लागायचे! मग ती सारखी मला येवून म्हणायची, काकू, काही तरी खायला घेवू ?मग मीच थोड लक्षात ठेवून तिला विचारायला लागले ! पण दोघींनी खूप मजा केली! आणि मला पण काही न काही snacks बनवण्याचे काम पण मिळाले!
पुण्यात होतो तेंव्हा आम्ही दोघी मोटरसायकल वर खूप भटकायचो!मला आठवतंय, भानुप्रियाला एमज़ी. रोड वर फिरायला फार आवडायचं. तिथे नाझ केफे म्हणून बेकरी होती. खूप छान छान केक आणि पेस्ट्रीज मिळायच्या. तिथे बसून खाण्याची सोय होती. तिला तिथे बसूनच केक खायला आवडायच! ती हळू हळू खायची त्यामुळे वेळ लागायचा! तिथले स्टाफ चे लोक पण तिला ओळखायला लागले होते. किती तरी लोक येवून निघून जायचे, तरी आम्ही दोघी आपल्या तिथेच ! तर अशी मजा होती!
पुण्यात जेंव्हा CROSSWORD हे पुस्तकांचे दुकान सुरू झाले, तेंव्हा आम्ही दोघी तिकडे गेलो होतो. कारण तिला पुस्तकांचे फार वेड होत! त्या नंतर बऱ्याच वेळा आम्ही तिकडे गेलो!तिथे पुस्तकं चाळायची, पुस्तकं विकत घ्यायची, आणि सर्वात आवडीचं काम म्हणजे, तिथल्या कॉर्नर मध्ये असलेल्या छोट्याश्या कॅफे मधे बसून कॉफी आणि sandwiches खायचे!अल्टीमेट आनंद होता तो तिच्या साठी! आणि तिच्या साठी तो आनंद तर मग तो माझ्या साठी पण आनंदच!
अर्थात, इकडे जेवढी रमायची , तेव्ढीच लक्ष्मी रोड च्या गर्दीत पण रमायची!
आता झाली छानशी रेसिपीची वेळ:
इंडो_अमेरिकन डोसा : गाजर, कोबी, सिमला मिरची, कांदा, कांदा पात, सर्व बारीक कापून घ्यावे. मीठ,मिरेपूड, कोथिंबीर, टोमेटो सॉस, मेयोनेस, क्रीम घालून फिलिंग तयार करावे. डोश्याच्या पिठाचा डोसा तयार करून, त्यावर मिश्रण पसरून, डोसा रोल करून, किंवा घडी घालून गरम सर्व्ह करावा.
खरतर, ह्या फिलिंग चे sandwiches बनतात हे मला माहित होत. पण मी ही डिश एका हॉटेल मध्ये खाल्ली आणि त्याच नाव इंडो अमेरिकन डोसा असं होत. तर sandwich चा झाला डोसा!
| माझी खास मैत्रीण तन्वी आणि मी! |
| हा आमचा नाटकातला कॉस्च्युम ! |

No comments:
Post a Comment