timmy च्या गमती आठवत आठवत मला लखनौ मधल्या होळीची आठवण झाली. होळीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे बरीच मन्डळी आली होती, आणि टेरेस वर रंग खेळत होती. सगळ्यांना मी बुंदीचे लाडू दिले, आणि बाऊल हॉलमध्ये ठेवला. तर कुणीतरी मुल मला सांगत आली,"आंटी,आंटी, timmy ने लड्डू उठा लिया!और कोने में बैठकर खा रहा है! timmy ला बुंदी चे लाडू फारच आवडायचे, त्या मुळे आम्हाला फारच मजा वाटली. हा पिल्लू होता ना, तेंव्हा चहा फार आवडायचा त्याला . सकाळी आणि दुपारी आमच्या बरोबर चहा प्यायचा!
 |
चहा प्यायला की मी कसा एकदम active baby ! |
 |
बघा बर मी कुठे दिसतो का ते ?आता बुंदीचे लाडू फस्त केल्या वर पचवायला हवेत ना? म्हणून थोडी विश्रांती, इतकचं! |
काय असेल ते असो, पण लखनौ कॅंटच्या सदर बजार मधल्या "छप्पन भोग मिठाई "ह्या प्रसिद्ध दुकानातले बुंदीचे लाडू हे आमच्या कडे सतत येत राहिले आणि timmy ते खात राहिला! तर आणि आमची, सर्वांचीच मजा. खरेदी आणि खाणे दोन्ही भरपूर केले!
 |
आईने packing ला सुरुवात केली, तर मी म्हटल थोडी मदत आपली पण! मी आपला इथे बसून सगळ्यांवर लक्ष ठेवून असतो ,कसं? |
अरे हो, किल्ला केला ते सांगितलच नाही की! मी पुण्यातच किल्ला करायला सुरुवात केली होती. लखनौला तर वरच्या मजल्यावर flat होता तर बाल्कनीत किल्ला केला होता. दिवाळीची खरी मजा फराळ आणि किल्ला!माझ्या लहानपणच्या छंदाला नव्याने उजाळा मिळाला होता.
भानुप्रीयाला पण शिकायला मिळालं. दगड,माती, पोती, काय काय समान लागायचं! किल्ला बनवायचा, गवत उगवायचं, खेळणी सजवायची, दिवे, मेणबत्त्या लावायच्या, रांगोळी काढायची! आणि रोज दिवसातून दोनतीनदा बघायचा! आमच्या कडे दिवाळीत घरी कोणी आल, की पहिला किल्ला बघूनच खुश व्हायचे. फराळ वगैरे नंतर. मुल तर एकदम आश्चर्याने बघायची!
आणि नाशिकला आल्यावर देखील हा किल्ला बनवणे चालू आहे. ह्या किल्ल्या संदर्भात मी "गावकरी"ह्या स्थानिक पेपर मध्ये माझा एक लेख देखील प्रसिद्ध झाला होता,"आम्ही किल्लेदार" ह्या नावाने. पण त्यातल एक वाक्य फार बोलक होत,"जेंव्हा किल्ला उतरवतो, तेंव्हा अगदी गणपती विसर्जनाच्या वेळी बाप्पा बोळवताना जसं मन भरून येत, तसच मन भरून येत! तर नाशिक मधल्या केलेल्या किल्ल्यांचे हे फोटो….
 |
त्या काळी गणेशोत्सवात होणारे गावातले करमणुकीचे कार्यक्रम |
 |
महाराजांचा दरबार भरलाय ! किल्ल्याच्या बाजूने कडेकोट बंदोबस्त आहे! |
 |
हा शिवाजी महाराजांचा किल्ला, आणि खाली वसलेलं गाव! आणि हो, अत्याधुनिक ऐअर फोर्स स्टेशन पण आहे!
|
आणि २ वर्षांनंतर आमची पोस्टिंग बंगलोरला झाली. मला फारच आनंद झाला! एप्रिल २००० मध्ये बंगलोरला गेलो. आता timmy ला २ जवानां बरोबर सामानाच्या ट्रक बरोबर पाठवलं. ३ _४ दिवसांचा प्रवास करून timmy आणि सामान बंगलोरला पोहोचले. तसा timmy अगदी दोनच वर्षांचा होता, पण फार समजूतदार होता. त्यानं काहीही त्रास दिला नाही. आणि मुख्य म्हणजे त्याची तब्येत व्यवस्थित राहून तो आला हे आम्हाला महत्वाचं होत.
पण आमचे जवान खरच आमची सर्वांचीच खूप काळजी घेतात, अगदी जिवाला जीव लावतात असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे समोर आपण नसलो तरी निष्काळजीपणा नाही करत. खरतरं we owe them our very existence in the army!आम्ही लेडीज आणि मुल त्यांना "भैया" म्हणतो. म्हणजे हा कॉमन शब्द आहे. आम्ही ऑफिसर्स आणि लेडीज दोघही कितीतरी वेळ, आणि किती तरी वेळा घरा बाहेर असतो, पण मुलांची काळजी हेच जवान करतात, त्यांना खायला देणे,लक्ष ठेवणे, आणि कितीतरी वेळा आमचे भैय्याच जेवण बनवून घालतात मुलांना!
 |
भैया सोबत असले की अगदी सुरक्षित वाटत! |
!
भानुप्रिया अगदी लहान होती तेंव्हा आमचा "पाटील भैय्या" होता, तो तिची खूप काळजी घ्यायचा! त्यांचे अगदी दोस्तच होऊन जातात हे भैया! पोस्टिंग आली की निघतांना अनेक वेळा हे भैया रडतात! फार इमोशनल सीन होतात कधी कधी. अजून सुद्धा तो कधीतरी भेटायला येतो , कारण तो मालेगावला रहातो जे नाशिक पासून जवळच आहे. एखाद्या पार्टीला जायचं असलं तर हाच पाटील भैया भानुला चारपाई वर ठेवून ,लक्ष ठेवायचा.
 |
पाटीलभैय्या जवळ बसूनच कार्यक्रम बघणार मी! |
अशी नाती बनून जातात,आणि काही काही आठवणी तर आयुष्यभर आपल्या सोबत राहतात!अशा भैय्यानच्या पण बऱ्याच आठवणी आहेत. पुन्हा केंव्हा तरी!
No comments:
Post a Comment