Sunday, 22 October 2017

15) आठवणींचीआणिआशीर्वादांची शिदोरी घेऊन भारतात परत!

हा माझा ऑस्ट्रेलियाचा प्रवास वैजू मामी आणि श्रीकांत मामाच्या मदतीमुळेच शक्य झाला. पण घडलं सगळं अगदी सहजच! मी विचार केला काय,मामा _ मामीला फोने केला काय, आणि पुढची सर्व तयारी झाली काय, आणि मी माझ्या पहिल्या परदेशवारीला गेले काय! आणि हे सर्व मी अथ पासून इति पर्यंत  खूप खूप एन्जॉय केलं! इकडे  रमून गेले, पण घरी परत जायचंच होतं ना? अचानक घडून आलेली ही ट्रिप माझ्या चिरस्मरणात राहील. जीवनात नवचैतन्याची एक मोठी झुळूक घेऊन आली ही ट्रिप!

मामाकडे राहिले आणि खूप एन्जॉय केले! मामीच्या हातचे स्वादिष्ट जेवण, मिल्क पावडरचे पेढे लाजवाब! मामाच्या हातची भजी, कॉर्न मसाला आणि बरेच काही! मामाचं घर खूप सुंदर आहे! त्या दोघां  सारखच... छान, टापटीप, अगत्यशील,! थोडक्यात, A very warm, cosy and welcoming HOME!
 घरात पु.ल. देशपांडेंच्या छायाचित्रांचे एक सुंदर collage आहे भिंतीवर!
पुढे आणि पाठीमागे सुंदर बगीचा आहे. drawing room मध्ये एक पुस्तकांनी भरलेले bookshelf आहे. मी पण येतांना मामीकडून काही पुस्तकांची नावं लिहून घेतली आहेत. आता ती पुस्तकं आणून वाचण्याचा मानस आहे.

























रोज सकाळी मामीला सोडायला स्टेशनवर  जायचे,येतांना ताजे वर्तमानपत्र घ्यायचे, मॉल मधून ब्रेड, पेस्ट्री  वगैरे काही आवडीचे खाण्याचे पदार्थ  घ्यायचे, घरी यायचे. संध्याकाळी मामीच्या कामावरून परत यायच्या वेळेत मी पण फिरून यायचे आणि दोघींना स्टेशनवर घ्यायला मामा यायचा.

शनिवारी रात्री मामी आणि मी एखादा पिक्चर बघायचो टीव्ही वर. आणि गप्पा तर अखंड चालूच असायच्या..तिथे राहिल्यावर कळलं की सगळी कामं स्वतः करावी लागतात...dish washer, washing machine,vaccum cleaner सर्वकाही आहे सगळ्यांकडे,  पण स्वतः सर्व काम करावं लागतं... आपल्याकडे आपल्याला मावशीबाई, इस्त्रीवाला, धोबी, शिंपी, इतर कामासाठी कुणी गडी वगैर असल्या  बारा बलुतेदारांची सवय झालेली!(हशा)

म्हणजे थोडक्यात, highend lifestyle असली तरी कष्ट करायची तयारी हवी, आणि आत्मनिर्भर असायला हवं, तरच इथे निभाव लागेल.

शेवटचे दोन तीन दिवस परिणिता इकडे राहायला आली होती, तेंव्हा पण खूप गप्पा मारल्या, एन्जॉय केलं!
परिणिताआणि मी!
सगळ्यांसोबत माझा वेळ एकदम मजेत गेला! थोड्या पुसट झालेल्या आठवणी ताज्या झाल्या! ह्या छोट्याशा मुक्कामात मला विविध अनुभवांची शिदोरी मिळाली ती ह्या दोघांमुळे! सर्वांचा निरोप घेतांना डोळे पाणावले होते...   १७ जूनला मी sydneyहून परतीचा प्रवास सुरु केला! आठवणींची शिदोरी आणि मामा मामीचे, सर्वांचे आशिर्वाद घेऊन घरी परत आले!



14) लागले परतीचे वेध!

तर अशी अशी ही ऑस्ट्रेलियाची टूर! दीड महिना कसा आणि कुठे गेला काही कळलं नाही! एकेक दिवस मजेचा, उत्साहाचा, अनेकविध रंजक, मजेशीर, माहितीपूर्ण घडामोडींनी भरलेला! Not A Single Dull Moment!  मी जे नेहमी म्हणते, की आजचा दिवस हा  कालच्या दिवसापेक्षा आणखीन उत्तम व्हावा! तसंच  काहीसं इकडे झालं! रोज काहीतरी नवीन, रोज ज्ञानात  काहीतरी भर घालणारं, रोज काहीतरी उत्साह वाढवणारं! मी अनेक प्रकारच्या सुंदर, अभिरुचीपूर्ण,ज्ञानवर्धक गोष्टींनी समृद्ध झाले हे मात्र खरे!

 माझा स्वतःवरचा ठाम विश्वास, कुठेही बिनदिक्कत, निर्भयपणे वावरण्याचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता,  नेहमी सतर्क राहण्याची सवय,आणि मुळातला धाडसी स्वभाव... अशा अनेक गोष्टींचा मला इकडे उपयोग झाला असं मला वाटतं. मला दोन तीन जणांनी विचारलं  देखील की तुम्ही ह्यापूर्वी परदेशवारी केलेली आहे का?  मी नाही म्हणल्यानंतर  त्यांना आश्चर्यच वाटलं! कारण त्यांना माझा एकूण वावरण्यातला confidence कमालीचा वाटला! कारण इथे आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मला मामानी आणि अनिरुद्धनी ट्रान्सपोर्ट बाबत समजून सांगितलं, आणि मी रोज एकटीनेच प्रवास केला! कुठेही रेस्टॉरंट मध्ये एकटीने बसावं, खावं, प्यावं, कुठेही एकटीने पायी फिरावं, दुकानं बघावीत, शॉपिंग करावं, साईट सिईंग करावं, काहीच दडपण नाही, भीती नाही, एकदम फुल्ल टु एन्जॉय!

Buddhist Temple sydney


एकदा मामा मामी सोबत buddhist temple ला गेले होते. तिथे मंदिरात पादत्राणे घालून जाता येतं, ही पाटी वाचून थोडसं वेगळ वाटलं .  पण आम्ही ही पाटी वाचून देखील चपला बाहेर काढून ठेवणे योग्य समजलो, कारण आपले संस्कार!  तिथल्या coffee shopमध्ये   chop sticks नी गरम गरम momo खाल्ले! मजा आली!

तिथल्या  लोकांचे हे वैशिष्ठ्य आहे की,  त्यांच्याकडे बघितलं, की त्यांच्यातलंच व्हायला होतं! त्या वातावरणात आपण रमून जातो! हरवून जातो. पण असं एकट्याने परका मुलुख एन्जॉय करणं सगळ्यांनाच शक्य होणार नाही, हेही तितकंच खरं आहे असो.

ऑस्ट्रेलियात आले, इथे फिरले, बराचसा प्रदेश पहिला, लोकांना जवळून [पाहिलं, अनुभवलं, आणि प्रेमात पडले मी ऑस्ट्रेलियाच्या! खूप सुंदर देश, प्रदेश, चांगली, मदतीला तत्पर माणसं, उत्तम नागरिक कसे असावे हे इकडे कळते. नियमांचे काटेकोर पालन, अन्यथा कठीण शिक्षा किंवा दंड हे इथे पहिले. टोल ब्रिज म्हणजे माणसं ,नाका, बुबी ट्रॅप सारखं आपल्याला अडकवून ठेवणं, मोठा गुन्हा केल्यासारखं टोल नाही दंडच भरतोय असं वाटण्यासारखे वातावरण,काही नाही! त्या कमानीखालून आपली गाडी गेली, की आपल्या गाडीवर लागलेला डिजिटल सेन्सर बीप करतो, आणि टोल भरल्याची डिजिटल नोंद होते, बस! डिजिटल सेन्सर नसेल तर, आपल्या घरी नोटीस येते, आणि आपण जाऊन दंडाची रक्कम भरून यायचं, बसं ! मला शेवटच्या दिवशी मामा एरपोर्टला सोडायला आला, त्या दिवशीची गम्मत सांगते म्हणजे सोदाहरण पटेल मी काय सांगते ते.... मामानी चुकून U_Turn घेतला, आणि कुठून कुणास ठाऊक, पण फटक्यास पोलीस मामा समोर हजर ! त्याने शांतपणे गाडीच्या नम्बर प्लेटचा फोटो घेतला, मामाच्या लायसेन्सचा फोटो घेतला, आणि नम्रपणे जायला सांगितलं! हा दंड त्याच्या अकाउंट मधून आपोआप वसूल होणार! झालं की नाही काम सोपं? बाचाबाची नाही, ओरडा आरडा  नाही, पोलिसांना शिवीगाळ नाही, गाडी बाजूला घ्या... वगैरे करून वेळेचा अपव्यय नाही, कामाचा खोळंबा नाही, आपल्या जानपहेचानच्या पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी नाही, कूच काही नाही!(अरेरे...)

ट्रेनमध्ये, बसेस मध्ये कितीही गर्दी असली तरी एकमेकांना धक्का  देणे,असभ्य वर्तन करणे हे गैर मानलं जातं. महिलांना आपल्या आवडीनुसार  वेशभूषा,केशभूषा करण्याचे स्वातंत्र्य आहे. कुठेही एकट्याने हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य आहे... पोलीस यंत्रणा तत्पर आणि कुशल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी  व्यवस्थाच अशी चोख करून ठेवतात की कुणाला काही गैरप्रकार करण्याचा scope फारच कमी. सर्व नागरिकांना  पायाभूत गरजा पुरवणारे सरकार आहे.शिस्त, काटेकोरपणा, कष्ट करण्याची तयारी, सर्वांना समान न्याय ह्या गोष्टी जनमानसात रुजल्या की मग रोजच्या  जगण्यासाठीचा संघर्ष संपतो आणि जीवनमान उंचावणे ह्या ध्येयपूर्तीसाठी माणसं झटायला लागतात.,सरकारी यंत्रणा ही समाजासाठी आहे ह्याचे प्रत्यंतर सगळीकडे येते

मेलबर्न मध्ये संध्याकाळी एका कॉफी शॉप मध्ये थांबले, तेंव्हा मी सेल्फी घेत होते, तर त्या मालकांचा छोटा मुलगा पण आला, आणि त्याला सेल्फी घ्यायचा होता!
melbourne


Blue Mountains Rail ride



Sydney tour by Cruise
 Cruise नी sydney शहराची शोभा पहिली. तिकडे 'VIVID sydney' नावाने एक महिनाभर tourism ला बढावा देण्यासाठी उपक्रम राबवला गेला. संपूर्ण  sydney शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी laser show केले, लोकांना आकर्षित करून अनेक प्रकारे australia चे tourism वाढविण्याचे काम केले.मी  भरपूर फिरले.  प्रवासात  लोकांशी बोलले,त्यांचे विचार ऐकले,आपल्या देशाबद्दल काही सांगितले. ऑस्ट्रेलियाचेअंतरंगाचे जवळून दर्शन झाले. सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न बघितले, आणि साधारणपणे एक देश म्हणून  ऑस्ट्रेलियाचा अंदाज आला.अर्थात, देशाच्या सर्वांगीण विकासात जनतेचा हातभार आहे. सगळीकडे  सुबत्ता,वैभव, समृद्धी असली  तरी, सर्व देशांच्या असतात तशा ह्या देशाच्याही अनेक समस्या आहेत. रोजच्या बातम्या ऐकल्या, वर्तमानपत्र वाचले की समजते .... एवढा समृद्ध देश आहे तरी बेरोजगारी आहे, पैशांसाठी अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात. ह्याच पैशांच्या हव्यासापायी अनेक गुन्हे  घडतात,त्यामुळे  गुन्हेगारीची समस्या बिकट आहे.जितकी टेक्नॉलॉजी वाढते तितकेच गुन्हे वाढतात.अनेक scam, घोटाळे देखील घडतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेतच. जितकी समृद्धी तितकीच जीवनाची अनिश्चितता,आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेची काळजी, ह्यातून अनेक मानसिक समस्याही उद्भवतात. छोट्या कुटुंबात अनेक समस्या असतात. पण तरी  चांगल्याला चांगलं म्हणावंच लागेल. 

ऑस्ट्रेलिया पाहण्यासाठी रोज लाखो पर्यटक येतात, आणि अशा सुंदर देशातील वैभव पाहतात, आनंद घेतात आणि छान आठवणींचा खजिना घेऊन परत जातात! मी पण अशीच एक पर्यटक! पण, मुक्काम संपत आला तसे परतीचे वेध लागले, घर दिसायला लागलं....

13) खाणे म्हणजे काय?

चैताली old age care मध्ये कामाला जाते.तिला फक्त तीन दिवस काम असते. कारण मग अनीशकडे पण बघावं लागतं. त्यामुळे त्या दोघांचे घरातले काम वाटलेले असते. .



तर, अनिरुद्ध कडे  अनिश सोबत मजा केली! अनिश खूप हुशार आणि गोड मुलगा आहे.
 तिथे त्याच्या   शाळेत पण जाऊन आले. खूप सारी खेळणी, खूप सारे creative काम करून घेण्याचे कसब त्यांच्या टीचर्स मध्ये दिसले. त्याने काढलेली चित्र  पहिली,तो काही काही प्रोजेक्ट्स बनवतो ते पहिले, आणि थक्क झाले! पण अनिरुद्ध त्याला खूप प्रोत्साहन देतो, त्याच्या बरोबर वेळ घालवतो. त्याला सकाळी टिफिनमध्ये छान छान पदार्थ देतो! खूप कष्ट घेतो त्याच्यासाठी. अनिश माझ्या सोबत माझ्या खोलीत झोपला पहिल्यांदा, त्या दिवशी त्याने किती मस्ती केली! कॉटवर उड्या मारल्या, हसत होता, खरचं खूप आनंद झाला त्याला.एकाच ब्लॅंकेट मध्ये झोपलो!त्याचंच त्याला फार नवल! मी त्याचे खेळ  बघितले, त्याच्या बरोबर खेळले त्यामुळे त्याला मी त्याची फ्रेंड वाटली असावी! एक comfort  level  आली होती माझ्या सोबत!
आणि माझं मुलांसोबत चांगलं जमतं हे मला चांगलंच ठाऊक आहे ना! झोपतांना किंवा इतर वेळी पण तो  खूप काही काही प्रश्न विचारायचा. तू इंडिया हुन आलीस का?, परत कधी जाणार आहेस?, मग पुन्हा इकडे कधी येणार आहेस? आणि निघाले की फार वाईट वाटायचे त्याला, इवलुसा चेहरा व्हायचा त्याचा... पण पुन्हा सोमवारी  आले,की पुन्हा मजेत असायचा. रात्री मला विचारलं की तुझ्या रूममध्ये  झोपू? मग त्याला गोष्टी वगैरे सांगितल्या. एकदा निरागसपणे मला विचारलं, "are there ghosts and  witches here ? मी म्हटले, no not at all. पुन्हा पुन्हा विचारलं,मी पुन्हा पुन्हा त्याला तेच समजून सांगितलं. मग त्याचे काय समाधान झाले कुणास ठाऊक, पण पुन्हा नाही विचारले. त्याला त्या दिवशी खूप  सांगितले,की असे काही नसते, आणि तू एकदम  strong आहेस. झोपतांना  त्याला थोपटत होते, तर त्याला फार मजा वाटली!  

 तर, अनिश सकाळी ८ वाजता शाळेत जातो. एका शनिवारी त्याच्या शाळेत सर्वांनी नाईट ड्रेस घालून जायचं होतं! मला फार मजा वाटली, कारण आपल्याकडे असे काहीच दिसत नाही.
  त्याला शाळेत  सोडून पुढे  मॉलमध्ये जायचं, सामान आणायचं, आणि घरी येऊन पदार्थ बनवायचे. चैताली प्युअर व्हेजिटेरिअन आहे, त्यामुळे  नॉन व्हेज पदार्थ बनून आम्ही तिघे खायचो. चैतालीची कामावर जायची वेळ सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत होती. त्यामुळे ती रात्री घरी येईपर्यंत, आमचे किचन स्वच्छ झालेले असायचे! ३००  वाजता अनिश घरी आला कि पुन्हा काहीतरी  बनायचे, मी तिकडे कांगारू मीट खाल्ले, पहिल्यांदा! खूप टेस्टी लागले! एकतर, मी ऑस्ट्रेलियाला जातांना २ पॉईंट अजेन्डा घेऊन गेले होते...चांगले चुंगले खाणेपिणे, आणि फिरणे, देश पाहणे! त्यामुळे  beef  आणि bacon सोडून सर्वकाही खाल्ले! भरपूर पायी फिरायचं, आणि भरपूर खायचं! जे जे दिसेल ते बघायचं!

अनिरुद्ध बरोबर फिशमार्केटला गेले होते, आणि तिथल्या फिशची व्हरायटी आणि फिशची आवक बघून हैराण झाले!
  एका sushi  shop मध्ये गेलो होतो.  एका revolving round table वर अनेक प्रकारचे सॉसेस छोट्या छोट्या बाऊलमध्ये ठेवलेले असतात. आपण आपल्या आवडीचे sushi  प्लेटमध्ये घेऊन बसायचं, मग जो सॉस आवडेल तो घ्यायचा, त्याचा आस्वाद घ्यायचा! खूपच छान अरेंजमेंट!
मी इतकी खुश झाले ते पाहून, नाहीतर  आपल्याकडे म्हणजे?... लिंबू कांदा extra ५ रुपये, extra सांबर १० रुपये, वगैरे, वगैरे...  वगैरे... खायचे सोडून माणूस वैतागून निघून जाईल असे वागायचे... पण इकडे माणूस  यावा,आणि त्याने ठरवल्यापेक्षा जास्त खाऊन  जावे, अशी धारणा! त्यातूनच हे पाहुणचाराचे चित्र उभे  राहते,आणि मन खुश होऊन जाते!

तर,अनिरुध्दकडेअसतांनाआम्ही बरेच पदार्थ बनवले, ,मजाआली! scones बनवले. कांगारू BBQ बनवले,
scones


 BBQ kangaroo meat


fish



i made these scones!
Black  rice with  gaucamole, chicken and salad! फिशचे अनेक  प्रकार,mussels oysters, lobsters,squids, खेकडे, असे अनेक प्रकार खाऊन झाले. मी TLC channel वर पाहिलेले अनेक पदार्थ मूर्तरूप घेतांना बघण्याचा आनंद काय वर्णावा? तो माझा मलाच माहित! mascarpone  cheese , goat cheese , blue cheese असे अनेक प्रकार चीझचे पहिले, चाखले !gnochi (नोकी) बनवली. smoked salmon, shrimps आणि octopus देखील खाल्ले! अख्खा crab मिठाच्या पाण्यात नुसता boil करून, त्याला तोडून तोडून आतलं मऊमऊ मीट  खाल्ले, वाह!
Sugar snaps मसाला!

Tera Mi Su!

Rice paper rolls

Waffles with maple syrup and LOTSof CREAM!

BBQ prawns and kangaroo meat  white wine!
knochi (नोकी)
एकदा mall मध्ये गेले होते, तेंव्हा हे waffles खाल्ले.वाह! काय चविष्ट होते! शिवाय भरपूर क्रीम आणि maple syrup. . पुन्हा कधी असे waffles खायला मिळतील?????
wine and cheese

Crabs, Shrimps, Ooctopus, squids


मजाच होती सगळी!सोबत थोडी वाईन ! मग काय विचारता महाराज? अजून आठवलं तरी तोंडाला पाणी सुटतं ! पण इथे आपल्याकडे नाशिकमध्ये काहीच मिळत नाही, त्यामुळे नुसत्या आठवणीवर राहायचं, झालं.. All these dishes would have cost me a BOMB if I was to eat these in a   restaurant! 

It Was a delightful and wonderful CulinaryExperience!! ह्यासाठी मी अनिरुध्दची नेहमीच आभारी राहीन हे नक्की! 

12) मेलबर्नला निरोप!



संध्याकाळी फ्लाईट होती. त्यामुळे, सर्व मंडळींचा निरोप घेऊन निघाले. मोक्ठ्या माणसांचा निरोप घेणे सोपे असते, पण लहान मुलांचा, petsचा निरोप घेणे फार अवघड असते. पण, निरोप घ्यावाच लागतो. तर रेणू, सचिन, सारा, आणि आरव सोबतच buddy, ballu सर्वांना बाय करून निघाले. सचिननी एअरपोर्ट वर सोडले. 



माझी फ्लाईट announce झाली, आणि मी भराभर पुढे जाऊन उभी राहिले. तर, तिथल्या staffनी थांबायचा इशारा केला. मग थोड्या वेळाने लोकांना सोडायला सुरुवात केली. तर आश्चर्य म्हणजे माझा पहिला नंबर होता. मी पुढे निघाले आणि मग माझ्या ही गोष्ट लक्षात आली! मी aircraf tमध्ये शिरले, तर सागळा staff पहिल्या passenger ला welcome करीत होता! मला खूप आनंद झाला! मी aircraft मध्ये पहिली passenger म्हणून कधीच चढले नव्हते, त्यामुळे मी खूप खुश झाले! लगेच, airhostess कडून एक फोटो काढून घेतला!
First passenger of my flight!

अशा रितीने मेलबर्नचा मुक्काम आटोपून पुन्हा sydneyला परत! पुन्हा नवीन प्रवास, नवीन आठवणी!