'झुकुझुकू आगीनगाडी. धुरांच्या रेषा हवेत काढी....
पळती झाडे पाहूया..... मामाच्या गावाला जाऊया....!' तर झुकगाडीने नाही तर चक्क विमानाने मामाच्या गावाला आले! अगदी हीच कविता आठवली मला तिथे एअरपोर्टवर!
एअरपोर्टवर उतरल्यावर इमिग्रेशन साठी खूप चेकिंग वगैरे होते ह्याबाबत खुपसारे दडपण होते, पण सुदैवाने तीन फ्लाईट एकदम land झाल्यामुळे जवळपास १५०० लोक एकदम आल्यामुळे लवकर चेकिंग झाले, आणि जुजबी प्रश्न विचारून, पटकन क्लीअर केले. पण जेंव्हा इमिग्रेशन ऑफिसरकडे उभी होते, तेंव्हा माझ्या फॉर्ममध्ये मामाचा पूर्ण पत्ता नव्ह्ता, त्यामुळे त्यांनी विचारले, तेंव्हा मी सांगितले की पत्ता तर पूर्ण नाहीये, पण तो revesby ह्या suburb मध्ये राहतो एवढे माहित आहे. तर त्यांनी मला क्लीअर करून पुढे पाठवले. मग पुढे प्रश्न हा आला की माझा फोन चालत नव्हता. मग मामाशी आता बोलायचं कस? कारण तो बाहेर माझी वाट पाहत असणार. मग मी त्याच ऑफिसरना हा प्रश्न विचारला. त्यांनी मला बाहेर टेलिफोन kiosk वर तुम्हाला मदत मिळू शकेल असे सांगितले आणि मला एकदम हायसे झाले! मग समान घेऊन बाहेर लॉबी मध्ये आले, तर लगेच kiosk दिसला. तिथे ज्या महिला कर्मचारी होत्या, त्यांनी तत्काळ मला मदत केली, माझे फोन नंबर लावून , माझा मामीशी संपर्क करून दिला! मला ह्या कर्तव्यतत्परतेचे फार नवल वाटले, आणि आनंदही झाला, कारण परक्या देशात, अडनाड वेळी, इतक्या टेन्शन मध्ये असतांना तत्परतेने मदत मिळण किती आवश्यक असत हे तिथे त्या परिस्थितीत अडकलेला माणूसच सांगू शकतो! तर माझा मामीशी फोनवर लगेच संपर्क झाला, आणि तिने तसे मामाला एअर पोर्टवर फोन करून सांगितले.
आणि काही मिनिटातच मामा मला दिसला! जसा पूर्वी होता तसाच! फक्त थोडं वय दिसत होतं इतकच! त्याला काय आनंद झाला सांगू? मग काही वेळाने कॉफी पीत, थोड्या गप्पा मारल्या, जरा warmup झालो, थोडे tuning वर आलो, आणि मग त्याच्याबरोबर गाडीतून घरी गेले. आम्ही एक तासाच्या प्रवासानंतर जवळजवळ ९.०० वाजता घरी पोहोचलो. मामी दारातच भेटली! तिला पण काय आनंद! दोघींनी गळाभेट घेतली, आनंद व्यक्त करत दारातच उभ्या! मग भानावर आलो, आणि घरात आलो सगळे.

![]() |
| मामी आणि मी! |

No comments:
Post a Comment