परिणिता कडे पहिल्यांदा गेले, तेंव्हा उत्सुकता खूप होती, कारण मी परिणिताला new born baby पाहिलं होतं! त्यावेळी वाड्यात मामी तिला घेऊन वरच्या त्यांच्या खोलीत तिला तयार करायची ते सगळं मी बघायची, मजा यायची! मला चांगलंच आठवतंय त्या काळी मामी तिला nivea cream लावायची!. आणि मजा म्हणजे भानुप्रियाला पण मी nivea च वापरत होते त्यामुळे nivea बघितलं की आजही तीच आठवण होते, तेंव्हा पण हीच आठवण व्हायची! म्हणजे ही मामा_ मामी ची जोडी माझ्या आठवणीत कायम आहे असे म्हटले तरी चालेल! मामा बटाटेवड्यासाठी आठवणीत राहिला, आणि मामीचे माझे ट्युनिंग काही वेगळेच आणि मस्त होते. आणि आजही ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय घेतांना तेच जुने, पण थोडे काळाचे पडलेले अंतर विसरून जाण्याची क्षमता असलेले नाते मला उपयोगी ठरले हे नक्की! मला हा महत्वाचा निर्णय घेतांना, तिला contact करतांना एकदाही कोणताही संकोच वाटला नाही, किंवा , शंका, धाकधूक वाटली नाही. We started from where left off! ह्या उक्तीप्रमाणेच!
तर, परिणिताकडे गेलो,दारातच राज आमचे स्वागत करण्यासाठी उभे होते!त्यांना भेटून आनंद वाटला !अतिशय मनमिळाऊआणि शांत स्वभावाचे वाटले राज. त्यांना भेटून आनंद झाला.,राज नामांकित कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर काम करतात, खूप आंतरराष्ट्रीय फिरतीवर असतात. मग घरात येऊन परिणिता भेटली, गळाभेट घेतली,आणि न राहवल्यामुळे तिला ही आठवण सांगितली. १९८५ तो २०१७... एवढा कालावधी एका सेकंदात दूर झाला! विरघळून गेला!,मग तिच्या दोघी मुलींना भेटले... Reyva आणि Lara! मोठी रेवा हुशार, पण थोडी अबोल. पण नंतर बोलली माझ्याशी. धाकटी लारा खूपच वेगळी. गप्पिष्ट, गोड, लाघवी आणि अगदी बालसुलभ निरागसतेने भरलेली! पण एकदम चुणचुणीत बरं का... आधी परिणितानी मला तिचं संपूर्ण घर दाखवलं...खूप छान,सुंदर,अद्यावत , प्रशस्त घर, पुढे बगीचा! नंतर लारा आली आणि मला म्हणाली,"Come, I will show you my house " मग रेवाची रूम दाखवली,म्हणाली 'this is Reyva's room . She does all boring stuff '(????) त्याचं कारण रेवा वाचन वगैरे करते जे हिला अजिबात आवडत नाही! म्हणून तिची रूम बोरिंग!(हा..हा) मग पुढे गेली आणि म्हणाली,. 'This is my mom and dad's room. Thats also boring' आणि नाक मुरडलं. मला खूप हसायला आलं. मग स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेली, आणि म्हणते कशी.. 'See., this is MY room! Isn't it nice? मग मी पण तिला म्हणाले, 'Yes off course, Your room is the BEST!' त्यानंतर तिला विशेष आवडणारी अशी आजी आजोबांची बेसमेंटमधली रूम दाखवली.
त्यानंतर वरती तिची एक play area आहे तिथे आम्ही बसलो. तिनं सगळी खेळणी दाखवली, सर्व barbie dolls ची नावं सांगितली, मग आम्ही दोघी खूप खेळलो.
एकीकडे राज आमच्यासाठी चहा करीत होते, तर लारानी मला विचारलं, 'Shall I make something for you to eat ?' मला खूप आश्चर्य वाटलं.. खूप हसू पण आलं, आणि कौतुक पण वाटलं. तिनं तिच्या वडिलांच्या मदतीनं टोस्ट बनवला, त्यावर सॉस, बटर लावलं, आणि डिशमध्ये आणून टेबलवर मला आणून दिलं!
आणि हो, त्या दिवशी Mother's Day होता! आणि मी तिला मनापासून, आनंदाने 'थँक्स!' म्हटलं. आणि परिणिताला म्हणाले,'Lara has made this Mother 's day very special for me !'
त्यानंतर एकदोनदा परिणिताकडे गेले. लाराच्या play school मध्ये पण गेले होते, तिथे पण अनीशच्या शाळेत आली तशी मजा आली! खुप सारी मुलं मुली, खेळणी, सुसज्ज क्लासरूम, प्रशिक्षित, हसतमुख टीचर्स! मुलांचे बालपण सुखी आणि समृद्ध करण्यासाठी शाळेत हे सर्व असायलाच हवे,नाही का?
परिणिता पण नवनवीन पदार्थ बनवते,त्यामुळे तिच्याशी ह्याबाबत पण टिप्सची देवाणघेवाण झाली, मजा आली तिनं chicken pie बनवलं होतं ..अप्रतिम!. एका ट्रिप मध्ये परिणिता सोबत लंच साठी एका Pub मध्ये गेलो..मी,.मामा आणि परिणिता. मी पहिल्यांदाच pub मध्ये गेले होते, त्यामुळे खूप उत्सुकता होती. .पण खूप छान retro feel होता. जुन्या हॉललीवूडच्या सिनेमातला फील येत होता. एकदम मस्त! टेबलावर विराजमान झाल्यावर अवतीभवती नजर फिरवली...समोर मोठ्या स्क्रीनवर रेसेस चालू होत्या त्याचा लोकं आपल्या ड्रिंक्स आणि जेवणासोबत आनंद घेत होते. सुसज्ज bar, सुंदर,टापटीप महिला waitress बघून,,,मुझे तो बिन पियेही नशा चढ गया था! !मग एका उत्तम ड्रिंक सोबत saffron risotto , crispy squids असा चविष्ट पदार्थांचा समाचार घेऊन,आणखीन एक बहारदार आठवण घेऊन घरी परत आले! शेवटचे दोन दिवस परिणिता मामीकडे राहायला आली होती, तिथे पण गप्पा झाल्या.
ह्याच दिवशी मी नंतर Paddy's Market मध्ये गेले होते. सर्व चायनीज वस्तूंचे मार्केट. वस्तू...स्वस्त आणि मस्त! मोबाईल, accessories, shoes, कपडे, ड्रायफ्रूट्स, knick knacks, mementos, souveniers, सर्वकाही स्वस्त! तिथे passion fruit pulp घातलेला उसाचा रस प्यायले!
खूपच टेस्टी! उसाच्या रसात आलं लिंबू घालून आपण सगळीकडे पितोच... नाही म्हणायला पंजाब चंडीगढ मध्ये पुदिना आणि लिंबू घालून उसाचा रस प्यायले होते. पण तिथे इतकी variation होती, काय सांगू? सर्व बाजार ह्या मंडळींनी गजबजलेला आहे. सगळीकडे हे असतात, आणि त्यांच्याच वस्तू लोकांना आवडतात, परवडतात, आणि म्हणून त्यांची विक्री पण भरपूर होते... असो.
एकदा मॉल मध्ये फिरत होते, तेंव्हा तिथे राजमा सारख्या धान्याचं बनलेलं Miso soup 'विकायला होतं .. २ डॉलरला एक बाऊल. मी घेतलं, प्यायले, इतकं टेस्टी, वाह! त्यांनी त्याच दिवशी ते सूप introduce केलं होतं असं तिथल्या salesgirl नी सांगितले! तर सांगत काय होते, भरपूर शॉपिंग केली आणि खाऊन पिऊन घरी आले!
सिडनी फिश मार्केट मध्ये गेले होते.मोठी प्रशस्त एरिया आहे. तिथे छोट्या बोटींतून फिश येते आणि बाहेर पण जाते. तर हे डॉकयार्ड वेगळं. दुसरीकडे सिडनी मधेच होलसेलने फिश जाते ते वेगळे मार्केट तिथेच.
आणि आणखीन एक एरिया जिथे छोटी छोटी restaurants होती तिथे फक्त तयार सीफूडच्या डिशेस खायला लोकं येतात. तिथे पण ताजे फिश ठेवलेले होते.... my God ! इथेही अप्रतिम फिश, प्रॉन्स, squids, crab, lobster, scallops आणि अशा असंख्य व्हरायटी! अरे बापरे... काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं!
तिथे शक्य होतं तेवढं खाऊन, डोळ्यांचं, पोटाचं आणि मनाचं समाधान करून बाहेर पडले. सर्व आठवणींना मनात कैद केले आहे, पाहिजे तेंव्हा आठवून फ्रेश होता येईल!
तर, परिणिताकडे गेलो,दारातच राज आमचे स्वागत करण्यासाठी उभे होते!त्यांना भेटून आनंद वाटला !अतिशय मनमिळाऊआणि शांत स्वभावाचे वाटले राज. त्यांना भेटून आनंद झाला.,राज नामांकित कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर काम करतात, खूप आंतरराष्ट्रीय फिरतीवर असतात. मग घरात येऊन परिणिता भेटली, गळाभेट घेतली,आणि न राहवल्यामुळे तिला ही आठवण सांगितली. १९८५ तो २०१७... एवढा कालावधी एका सेकंदात दूर झाला! विरघळून गेला!,मग तिच्या दोघी मुलींना भेटले... Reyva आणि Lara! मोठी रेवा हुशार, पण थोडी अबोल. पण नंतर बोलली माझ्याशी. धाकटी लारा खूपच वेगळी. गप्पिष्ट, गोड, लाघवी आणि अगदी बालसुलभ निरागसतेने भरलेली! पण एकदम चुणचुणीत बरं का... आधी परिणितानी मला तिचं संपूर्ण घर दाखवलं...खूप छान,सुंदर,अद्यावत , प्रशस्त घर, पुढे बगीचा! नंतर लारा आली आणि मला म्हणाली,"Come, I will show you my house " मग रेवाची रूम दाखवली,म्हणाली 'this is Reyva's room . She does all boring stuff '(????) त्याचं कारण रेवा वाचन वगैरे करते जे हिला अजिबात आवडत नाही! म्हणून तिची रूम बोरिंग!(हा..हा) मग पुढे गेली आणि म्हणाली,. 'This is my mom and dad's room. Thats also boring' आणि नाक मुरडलं. मला खूप हसायला आलं. मग स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेली, आणि म्हणते कशी.. 'See., this is MY room! Isn't it nice? मग मी पण तिला म्हणाले, 'Yes off course, Your room is the BEST!' त्यानंतर तिला विशेष आवडणारी अशी आजी आजोबांची बेसमेंटमधली रूम दाखवली.
त्यानंतर वरती तिची एक play area आहे तिथे आम्ही बसलो. तिनं सगळी खेळणी दाखवली, सर्व barbie dolls ची नावं सांगितली, मग आम्ही दोघी खूप खेळलो.
एकीकडे राज आमच्यासाठी चहा करीत होते, तर लारानी मला विचारलं, 'Shall I make something for you to eat ?' मला खूप आश्चर्य वाटलं.. खूप हसू पण आलं, आणि कौतुक पण वाटलं. तिनं तिच्या वडिलांच्या मदतीनं टोस्ट बनवला, त्यावर सॉस, बटर लावलं, आणि डिशमध्ये आणून टेबलवर मला आणून दिलं!
| Sweet little LARA! |
त्यानंतर एकदोनदा परिणिताकडे गेले. लाराच्या play school मध्ये पण गेले होते, तिथे पण अनीशच्या शाळेत आली तशी मजा आली! खुप सारी मुलं मुली, खेळणी, सुसज्ज क्लासरूम, प्रशिक्षित, हसतमुख टीचर्स! मुलांचे बालपण सुखी आणि समृद्ध करण्यासाठी शाळेत हे सर्व असायलाच हवे,नाही का?
परिणिता पण नवनवीन पदार्थ बनवते,त्यामुळे तिच्याशी ह्याबाबत पण टिप्सची देवाणघेवाण झाली, मजा आली तिनं chicken pie बनवलं होतं ..अप्रतिम!. एका ट्रिप मध्ये परिणिता सोबत लंच साठी एका Pub मध्ये गेलो..मी,.मामा आणि परिणिता. मी पहिल्यांदाच pub मध्ये गेले होते, त्यामुळे खूप उत्सुकता होती. .पण खूप छान retro feel होता. जुन्या हॉललीवूडच्या सिनेमातला फील येत होता. एकदम मस्त! टेबलावर विराजमान झाल्यावर अवतीभवती नजर फिरवली...समोर मोठ्या स्क्रीनवर रेसेस चालू होत्या त्याचा लोकं आपल्या ड्रिंक्स आणि जेवणासोबत आनंद घेत होते. सुसज्ज bar, सुंदर,टापटीप महिला waitress बघून,,,मुझे तो बिन पियेही नशा चढ गया था! !मग एका उत्तम ड्रिंक सोबत saffron risotto , crispy squids असा चविष्ट पदार्थांचा समाचार घेऊन,आणखीन एक बहारदार आठवण घेऊन घरी परत आले! शेवटचे दोन दिवस परिणिता मामीकडे राहायला आली होती, तिथे पण गप्पा झाल्या.
ह्याच दिवशी मी नंतर Paddy's Market मध्ये गेले होते. सर्व चायनीज वस्तूंचे मार्केट. वस्तू...स्वस्त आणि मस्त! मोबाईल, accessories, shoes, कपडे, ड्रायफ्रूट्स, knick knacks, mementos, souveniers, सर्वकाही स्वस्त! तिथे passion fruit pulp घातलेला उसाचा रस प्यायले!
![]() |
| sugarcane juice with passion fruit |
एकदा मॉल मध्ये फिरत होते, तेंव्हा तिथे राजमा सारख्या धान्याचं बनलेलं Miso soup 'विकायला होतं .. २ डॉलरला एक बाऊल. मी घेतलं, प्यायले, इतकं टेस्टी, वाह! त्यांनी त्याच दिवशी ते सूप introduce केलं होतं असं तिथल्या salesgirl नी सांगितले! तर सांगत काय होते, भरपूर शॉपिंग केली आणि खाऊन पिऊन घरी आले!
सिडनी फिश मार्केट मध्ये गेले होते.मोठी प्रशस्त एरिया आहे. तिथे छोट्या बोटींतून फिश येते आणि बाहेर पण जाते. तर हे डॉकयार्ड वेगळं. दुसरीकडे सिडनी मधेच होलसेलने फिश जाते ते वेगळे मार्केट तिथेच.
आणि आणखीन एक एरिया जिथे छोटी छोटी restaurants होती तिथे फक्त तयार सीफूडच्या डिशेस खायला लोकं येतात. तिथे पण ताजे फिश ठेवलेले होते.... my God ! इथेही अप्रतिम फिश, प्रॉन्स, squids, crab, lobster, scallops आणि अशा असंख्य व्हरायटी! अरे बापरे... काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं!
![]() |
| scallops |

No comments:
Post a Comment