Sunday, 22 October 2017

15) आठवणींचीआणिआशीर्वादांची शिदोरी घेऊन भारतात परत!

हा माझा ऑस्ट्रेलियाचा प्रवास वैजू मामी आणि श्रीकांत मामाच्या मदतीमुळेच शक्य झाला. पण घडलं सगळं अगदी सहजच! मी विचार केला काय,मामा _ मामीला फोने केला काय, आणि पुढची सर्व तयारी झाली काय, आणि मी माझ्या पहिल्या परदेशवारीला गेले काय! आणि हे सर्व मी अथ पासून इति पर्यंत  खूप खूप एन्जॉय केलं! इकडे  रमून गेले, पण घरी परत जायचंच होतं ना? अचानक घडून आलेली ही ट्रिप माझ्या चिरस्मरणात राहील. जीवनात नवचैतन्याची एक मोठी झुळूक घेऊन आली ही ट्रिप!

मामाकडे राहिले आणि खूप एन्जॉय केले! मामीच्या हातचे स्वादिष्ट जेवण, मिल्क पावडरचे पेढे लाजवाब! मामाच्या हातची भजी, कॉर्न मसाला आणि बरेच काही! मामाचं घर खूप सुंदर आहे! त्या दोघां  सारखच... छान, टापटीप, अगत्यशील,! थोडक्यात, A very warm, cosy and welcoming HOME!
 घरात पु.ल. देशपांडेंच्या छायाचित्रांचे एक सुंदर collage आहे भिंतीवर!
पुढे आणि पाठीमागे सुंदर बगीचा आहे. drawing room मध्ये एक पुस्तकांनी भरलेले bookshelf आहे. मी पण येतांना मामीकडून काही पुस्तकांची नावं लिहून घेतली आहेत. आता ती पुस्तकं आणून वाचण्याचा मानस आहे.

























रोज सकाळी मामीला सोडायला स्टेशनवर  जायचे,येतांना ताजे वर्तमानपत्र घ्यायचे, मॉल मधून ब्रेड, पेस्ट्री  वगैरे काही आवडीचे खाण्याचे पदार्थ  घ्यायचे, घरी यायचे. संध्याकाळी मामीच्या कामावरून परत यायच्या वेळेत मी पण फिरून यायचे आणि दोघींना स्टेशनवर घ्यायला मामा यायचा.

शनिवारी रात्री मामी आणि मी एखादा पिक्चर बघायचो टीव्ही वर. आणि गप्पा तर अखंड चालूच असायच्या..तिथे राहिल्यावर कळलं की सगळी कामं स्वतः करावी लागतात...dish washer, washing machine,vaccum cleaner सर्वकाही आहे सगळ्यांकडे,  पण स्वतः सर्व काम करावं लागतं... आपल्याकडे आपल्याला मावशीबाई, इस्त्रीवाला, धोबी, शिंपी, इतर कामासाठी कुणी गडी वगैर असल्या  बारा बलुतेदारांची सवय झालेली!(हशा)

म्हणजे थोडक्यात, highend lifestyle असली तरी कष्ट करायची तयारी हवी, आणि आत्मनिर्भर असायला हवं, तरच इथे निभाव लागेल.

शेवटचे दोन तीन दिवस परिणिता इकडे राहायला आली होती, तेंव्हा पण खूप गप्पा मारल्या, एन्जॉय केलं!
परिणिताआणि मी!
सगळ्यांसोबत माझा वेळ एकदम मजेत गेला! थोड्या पुसट झालेल्या आठवणी ताज्या झाल्या! ह्या छोट्याशा मुक्कामात मला विविध अनुभवांची शिदोरी मिळाली ती ह्या दोघांमुळे! सर्वांचा निरोप घेतांना डोळे पाणावले होते...   १७ जूनला मी sydneyहून परतीचा प्रवास सुरु केला! आठवणींची शिदोरी आणि मामा मामीचे, सर्वांचे आशिर्वाद घेऊन घरी परत आले!



No comments:

Post a Comment