नीला मावशी आणि मोहनकाकांना भेटून फार आनंद झाला, कारण नीलामावशीला पण मी पूर्वी भेटले होते, पण विस्मरण झाले हते इतकेच. पण भेट झाली,आणि आधी म्हटलं तसं काही वर्षांचे अंतर काही क्षणात मिटले!
![]() |
| नीला मावशी आणि मोहन काका |
![]() |
| वैजू आणि नीला मावशी |
नीला मावशीच्या सासूबाईंना ज्या old age care homeमध्ये ठेवले होते, तिकडे जाण्याचा योग आला. इथे ह्या सर्व वयस्क मंडळींची उत्तम काळजी घेतली जाते. त्याचं जेवण खाण, स्वच्छता, औषधोपचार सर्वकाही उत्तम रीतीने केलं जातं . तिथे recreation रूम पण आहे. तिथे अनेक वृद्ध महिला सदस्य खेळत बसल्या होत्या. पत्ते, chess , carrom, ह्यासारखे अनेक खेळ तिथे होते. वाचण्यासाठी मासिके, वर्तमानपत्रे वगैरे पण होते. कुणी स्वयंसेवक वाचन पण करून देत होते
![]() |
हर्षला आणि राहुल हे दोघे सुद्धा मस्त! हर्षला कथ्थक शिकवते. तिच्या क्लासमध्ये पण मी एक दिवस गेले होते..
मजा आली! तिच्याकडे पण डिनरला गेले होते. छान मेनू आणि रुचकर जेवण! मजा आली!सुनील आणि आरतीची पण ओळख झाली. एकदा त्या दोघांसोबत बाहेर जाण्याचा योग्य आला. तेंव्हा त्यांनी मला एका सुप्रसिद्ध फूड जॉईंट वर चिकन रोल खाण्यासाठी नेले! खूपच टेस्टी होता. खाऊन झाल्यावर मी पुढे गेले, पण त्यांच्या सोबत घालवलेला वेळ एकदम मजेत गेला! त्यांची मुलगी करिष्मा मी आले त्याच दिवशी भेटली होती, आणि तिने माझे सामान उचलायला मदत केली होती! It was a very sweet gesture !.नंतर एकदोनदा कार्यक्रमात पण भेटलो.
हां.. सिडनी मध्ये सावरकर जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, आणि त्या कार्यक्रमाला मला हजेरी लावण्याचा योग्य आला. बरेच दिवसांनी सावरकरांवर काही ऐकायला मिळणार होतं. तिथेच कार्यक्रमात मला नाशिकच्या एक गायिका गीता भेटल्या. छान वाटलं त्यांना भेटून.
![]() |
| सावरकर जयंती निमित्त कार्यक्रम |
![]() |
| शरद पोंक्षें सोबत ! |
मी ऑस्ट्रेलियाहून निघाल्यानंतर मामीचा पण एक कार्यक्रम झाला... कालिदास जयंती.हा कार्यक्रम मला बघता आला नाही, पण ह्या कार्यक्रमाची सर्व तयारी, नियोजन वगैरे मामीच्या घरीच होतं, त्यामुळे मला पण सर्व बघता आलं. ह्या कार्यक्रमाची पूर्वपिठीका अशी आहे की,२५ वर्षांपूर्वी मामीकडे सर्व साहित्यप्रेमी मंडळी जमायची, आणिआपले स्वरचित साहित्य वाचून दाखवायचे, जसे कथा कथन, नाटक, स्वगत, कविता वगैरे. मग चर्चा व्हायच्या, आणि आणखीन काही नवीन, उत्तम करण्याची ऊर्जा त्यातून मिळत गेली. आणि तो पहिला सादरीकरणाचा दिवस हा कालिदास जयंती असा उल्लेख कॅलेन्डरमध्ये आढळला, म्हणून तेंव्हा पासून त्याच दिवशी 'कालिदास जयंती' ह्या नावाने कार्यक्रम होऊ लागला. मग तो घरातून निघून रंगमंचावर आला, आणि बघता बघता २५ वर्ष पूर्ण झाली! ह्या वर्षी कार्यक्रमात गेल्या २५ वर्षातले उत्तम उत्तम सादर झालेले कार्यक्रम पुन्हा होणार होते, शिवाय अनेक मान्यवरांचे सत्कारही होणार होते. पण मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, कारण तोवर मी इंडियाला परत आले होते. पण कार्यक्रम सुंदर झाला असे मला कळले... का नाही होणार सुंदर? ज्या कार्यक्रमाला मामी आणि तिच्या सारख्या अनेक हरहुन्नरी मंडळींचे योगदान मिळाले आहे, हळू हळू छोट्याशा रोपट्याचे संवर्धन, जोपासना करून नावारूपाला आणले आहे तो कार्यक्रम यशस्वी होणारच!
मामीनी दोन पुस्तकं पण लिहिली आहेत. मी वाचली आहेत. छान लिहिते मामी .एकूणच, साहित्यप्रेमी आहेत दोघे मामा आणि मामी. नुसते साहित्य प्रेमी नाहीत, तर माणसांची आवड असणारे, माणसात रमणारे आहेत.







How to get the $10 no deposit bonus from 888 casino
ReplyDeleteGet the $10 이천 출장마사지 no deposit bonus from 공주 출장안마 888 casino. This 사이트 추천 offer can be used in 안양 출장안마 conjunction with the promo code HABAND20 on 동두천 출장안마 eligible