HAPPY FRIENDSHIP DAY !!!
आज जागतिक मैत्री दिवस! आजच्या दिवशी सर्व मंडळी आपापल्या मित्र मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी सरसावले असतील. कुणी मोबाईल वरून,कुणी प्रत्यक्ष भेटून. कुणी सहलीला भेटतील, कुणी घरीच एन्जॉय करतील, माणसं तितक्या ओकेशन सेलिब्रेट करायच्या कल्पना! थोडक्यात काय तर कोणताही आनंद व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ना ? पण माझ्या मते मैत्री साठी हा डे कशाला हवा? मित्र तर आपले नेहमीच असतात, आपण नेहमीच एकमेकांशी संपर्कात असतो. मग रोजच मैत्रीचा दिवस आहे की! पण काय आहे ना, आजकाल हे फॅड ना डे सेलीब्रेट करायचं! तर असो.
पण मैत्री म्हटलं की लोकांच्या मनात येतात ते स्त्री आणि पुरुष असे मित्र मैत्रिणी किंवा आपल्या नातेवाईकांच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक! पण असं काही नसतं, असं आपलं मला वाटतं.मैत्री कुणाशीही जमू शकते.
मैत्री म्हणजे नक्की कोणत्या भावना असतात? किंवा कोणत्या भावना असल्या म्हणजे मैत्री आहे असे समजते? मैत्री मध्ये एकमेकांच्यात बाबतीत तुलना ,असूया, द्वेष, राग,लोभ, मोह, मत्सर थोडक्यात" षडरिपू "नसावेत. (काम, क्रोध,लोभ,,मद, मोह आणि मत्सर हे सहा नकारात्मक भाव आहेत,ज्यांच्या अयोग्य वापराने माणसाची अधोगती निश्चितअसते ).
हे भाव सकारात्मक पण आहेत बरं का बघा हं.. योग्य प्रमाणात राग यावा, योग्य प्रमाणात लोभ हवा पण दुसऱ्याच्या हक्काच्या वस्तूंवर नाही, थोडा मद म्हणजे अहंकार हवा,कारण त्याने आपण सुखावतो आणि पुढे प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. मोह तर प्रत्येकालाच असतो कशाचातरी , पण लोभ दुसऱ्याच्या अधिकारातल्या वस्तूंचा नसावा.. पण मत्सर मात्र कधीच करू नये
तर मग मैत्री मध्ये असावं काय? मैत्रीमध्ये असावा निखळ प्रेमाचा गंध! मैत्री म्हणजे विश्वास, आधार,मदतीसाठी सदैव असलेली तत्परता.
मैत्री मध्ये असावी निर्व्याज्य प्रेमाची देवाण घेवाण, असं प्रेम, जे काही मागत नाही पण देण्यास तत्पर असतं आणि जे काही मिळालं तर त्याचा प्रेमानं, विना तक्रार स्वीकार करणारं!
माझी तर अगदी लहान मुलांशी देखील मैत्री जुळते ! वयस्कर लोकांशी देखील मी बोलू शकते. teenagers आणि मोठी माणसं मला कुणीही चालतं बोलायला, मैत्री करायला.. मैत्री होण्या साठी किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी लागतो मनाचा सच्चेपणा, दिलखुलासपण. आपली पायरी न ओलांडता, आपली विषयांची मर्यादा न सोडता मोकळेपणाने एकमेकांशी अनेक विषयांवर, अनेक मुद्द्यांवर, बोलता यायला हवं . एकमेकांचा योग्य आदर ठेवून, एकमेकांच्या खाजगी आयुष्यात अती खोलात जाऊन चौकशी करण्याचे टाळून गप्पा मारता यायला हव्यात किंवा संवाद साधता यायला हवा.
मी माझ्या भाच्चे मंडळींशी पण एक मित्रा सारखी वागते. मैत्री होण्यासाठी त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोलते ते त्यांना भावतं. मग त्यासाठी आपल्याला पण त्यांच्या विश्वातील चालू घडामोडी, त्यांच्या विश्वातल्या नवीन गोष्टी,त्यांच्या वयाच्या समस्या, इतर अडीअडचणी ह्याबाबत आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. त्यांच्याशी सूत जमवता आलं पाहिजे. मग ते पण आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात विश्वासानं, आणि मैत्रीचं नातं जुळतं, थोडक्यात up to date रहावं लागतं . वयस्कर माणसांचं पण तसंच आहे त्यांच्या आवडीचा विषय घेतला कि ते खूप बोलतात. मग त्यांना आपण सारखं त्यांच्याशी बोलावं असं वाटतं आणि मैत्री होते.
आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तर माझे आई आणि वडील हे देखील मित्रां प्रमाणेच आहेत! एकमेकांना एकमेकांच्या मनातले पूर्णपणे समजते काही न सांगताच! किती तरी वेळा फोनवरच्या" हॅलो"तून देखील समोरच्याचा मूड, तिथली आजूबाजूची परिस्थिती, ओळखता येते. समोरची व्यक्ती आनंदात आहे, कि काही टेन्शन मध्ये आहे, का दुःखात आहेत की अतिशय सुखात आहे हे समजतं ! पण त्या साठी हवी तदात्म्यता एकमेकांशी! संवाद! हे म्हटलं तर सहज शक्य आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. पण अशक्य मात्र नाही बरं का!
जिथे विचारांची मोकळीक नाही,अहंकार आहे आणि तिथे मैत्री होऊ शकत नाही .. पण एकदा का सूर जुळले, मग ती मैत्रीची वीण एकदम घट्ट बसते,आयुष्यभरासाठी सुद्धा!

No comments:
Post a Comment