आजच्या पोस्ट साठी टायटल आधी सुचलं आणि मग लिहायला आयडिया मिळाली! होत असं कधी कधी! एक इन्स्पिरेशन हवं असतं , बस.. ते मिळालं कि गाडी चालून पडते आपोआप! त्याचं झालं असं की आज भानुप्रिया आणि रविशंकर बंगलोरला परत जाणार होते, त्यामुळे आम्ही मंडळी पहाटेच घरी परत आलो आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलो! आज भानुप्रियाची पाठवणी करायची होती! मला ती जाहिरात आठवली,ज्यात ती मुलगी म्हणते की... सगाई ,मेहेंदी, हल्दी ,फेरे, रिसेप्शन और बिदाई!पांच फ़ंक्शन्स की तैयारी? मला हे आठवलं एकदम आणि मी हे टायटल घेतलं! हे माझं आजचं इन्स्पिरेशन! आहे कि नाही मी हुशार? हं... पण आता घरात मात्र डायलॉग साठी आणि इमोशनल व्हयला वेळच नव्हता! (सिनेमातल्या सारखा!)... येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा पोहे करायचे होते, दोघांचे औक्षण, स्वागत करायचे होते नुसती गडबड गडबड ! आई,प्रमोदिनी लागल्या त्याच तयारीला. घर आवरण्या पासून तयारी होती! अर्थात आम्ही हुशार ना? आम्ही हे बऱ्यापैकी करूनच निघालो होतो!असो
सगळी मंडळी आली आणि एकच गडबड उडाली! सगळी तयारी जय्यत असतांना देखील माझ्या हातांना हलका कंप.... खूप टेन्शन होतं. मग रविशंकर आणि भानुप्रियाला दूध पाण्याने पाय धुवून , ओवाळून, गंध, हळदी कुंकू लावलं,दोघां वरून भाकरतुकडा ओवाळून टाकला, आणि प्रेमाने सर्वांचं घरात स्वागत केलं!
पुन्हा तेच! गडबड गडबड! सर्वांचे चहापाणी झाले.सर्वांना पोहे दिले, खूप गप्पा मारल्या! सगळ्यांना पोहे फार आवडले, आमचा पाहुणचार गोड मानून घेतला! ह्या सर्वात तनयाचा फार मोठा सहभाग होता बरं का! एकदम जोश आणि उत्साहाने काम करीत होती! तसा तिने आणखीन एका गोष्टीत पुढाकार घेतला होता बरं का....लग्नात जिजाजींचे जुते चोरून त्याबदल्यात भरघोस रक्कम वसूल करून सर्व भावंडांनी घेतली होती!!
मग बाबांनी दोघांच्या कडून पुन्हा थोडे देवपूजन करून घेतले. ग्रहमखाच्या दिवशीची आणि आजची पूजेच्या समारोपाची जबाबदारी भानुच्या आजोबांनी घेतली होती, त्यातून ते मोकळे झाले ,कृतकृत्य झाले! आई,प्रमोदिनी, अश्विनी, प्राची, सचिन,नितीन,सर्वांच्या बहुमोल मदती मुळे एवढे मोठे कार्य पूर्णत्वास गेले! आणि मुलांनी ह्या कार्याला आनंदाची झालर लावली! ह्या सर्वांना जरी फुल ना फुलाची पाकळी भेट दिली असली, तरी ती आपली एक औपचारिकताच!!! असो.
एकमेकांचा निरोप घेत, रविशंकर आणि भानुप्रियाला भरघोस आशीर्वाद देऊन सर्व मंडळी पुन्हा हॉटेलकडे रवाना झाली! खूप जड वाटतं होतं ...
सामानाची व्यवस्था लावून सर्वजण गाडीत बसले, आणि वऱ्हाडाने मुंबई कडे प्रस्थान ठेवले! तिथून बंगलोरला! रेणू सचिन पुढे ऑस्ट्रलिया साठी रवाना होणार होते. मृणाल विक्रम सकाळीच दिल्ली साठी रवाना झाले होते. सर्वांना बाय बाय केला, आणि घरी आलो... मला काहीच सुचत नव्हतं , पण शरीर थकून गेलं होतं! विश्रांतीची नितांत आवश्यकता होती, म्हणून थोडी पडले,आणि चांगले पाच सहा तासां पर्यंत गाढ झोपले !एवढी झोपले कळलंच नाही!
बाप्पाच्या, कुलदेवतेच्या, सर्वदेवांच्या आणि आई वडिलांच्या कृपाशिर्वादाने लग्नकार्य सिध्द्वतापूर्ण, निर्विघ्नपणे पार पडले, आणि आम्ही दोघे कृतकृत्य झालो! भरून पावलो! देवांपाशी दिवा लावला,नमस्कार केला आणि हात जोडून त्याचे आभार मानले! शुभं भावतू!!!
Khup sundar ani manapasun lihila ahes tu, Aai!! Vachtanna dolyat pani ale... Tu dhanya ahes... tu majhya pathishi tham pane ubhi aste kayam...Tyamule mala kaslihi kalji vatat nahi!
ReplyDeleteहे फकत्त तूच करू शकतेस!!
ReplyDeleteहे फकत्त तूच करू शकतेस!!
ReplyDelete