Tuesday, 9 July 2013

BADALTYA NASHIKCHE VEDH


आम्ही ज्या एरियात राहतो, तिथे आमच्या कोलोनीत पोलिस  कर्मचारी राहतात, आणि आजुबाजूच्या दोन कोलोनीत  HAL  चे कर्मचारी राहतात. बहुतेक लोकांची शेती व्यवसायाची पार्श्वभूमी आहे. घरात सुबत्ता, गाडी वगैरे सगळ आहे पण राहणीमान गावाकडच्या पेक्षा थोडं  सुधारीत आहे., पण तरी शहरी वातावरणाची फारशी गोडी न लागलेली ही मन्डळी  आहेत. पण नवीन पिढी भरभर सुधारते आहे. आम्ही मन्डळी  इथल्या वातावरणात जरा out  of  place  च वाटतो, अजूनही वाटतो! तरी आम्ही त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयास केलेला आहे, आणि आजही करतो आहोत.


पण पुण्या_मुंबईच्या लोकांची सवय झालेले आम्ही- आम्हाला म्हणजे मस्त गप्पा गोष्टी,नाटक , सिनेमा, जरा छान  एन्जॉय  करावं, छान  जगण्याचा प्रयत्न असावा असे विचार! पण इथे तसं  काहीच नाही!
पुण्यात खरेदी आणि भटकंती!

shopping  के बाद? अर्थात eating !


























पण आता ज्या या नवीन वसाहती व्हायला लागल्या आहेत, तिथे अद्ययावत सुख सोयींनी   युक्त  नवीन बांधकाम झालेली आहेत आणि झपाट्याने वाढत आहेत. आत्ता कुठे नाशिककरांना high _end  life   ची ओळख व्हायला लागली आहे. ह्या बरोबरच multiplexes,multi _cuisine restaurants, हॉटेल्स, malls वगैरे हळू हळू प्रस्थापित होत आहेत.

आता नाशिक बदलते आहे! जुन्या आणि नव्या नाशिक शहराचे हे बदलते अंतरंग ! काही नमुने जुन्या आणि नव्या नाशिकचे!
जुना गोदा घाट _नशिक  




मेनरोड नाशिक _जुन्या नाशिक मधील मुख्य बाजारपेठ .





mall   संस्कृतीशी जुळवून घेतंय नवीन नाशिक!
तर हे आमचे नाशिक!

No comments:

Post a Comment