नाशिकमध्ये सेटल व्हायला थोडा वेळ लागला कारण घरात फर्निचर नव्हत, काही सोयी केलेल्या नव्हत्या. त्यामुळे बरचसं काम होत. त्या निमित्ताने जाणे होत होते, खरेदी होत होती! सामानाच्या जवळ जवळ ३५ लहान मोठ्या ट्रंका होत्या, त्यातून समान काढून लावणे म्हणजे एक दिव्यच होते! म्हणजे छोट्या क्वार्टरमध्ये जितका प्रश्न नाही पडला,तेवढा प्रश्न इथे पडला होता,सामान ठेवायचं कुठे आणि कसं? पण शेवटी छानपैकी घर लावलं त्यात जवळ जवळ १ महिना गेला, आणि मनासारखं घर लागलं !मग हळू हळू नाशिकचा परीचय करून घ्याला सुरुवात केली. तसं मी लग्न झालं तेंव्हा १ वर्षभर नाशिकमधेच राहिले होते,त्या मुळे मला नाशिक शहर बऱ्यापैकी माहित होत,आणि त्यामुळेच तर माझी घराची खरेदी सुद्धा सुकर आणि सोप्पी झाली होती.
नाशिक शहर तसं पुष्कळसं पारंपारिक आणि जुन्या विचारांचा पगडा असलेले शहर आहे. राहणीमानही तसेच पारंपारिक. सणवार, उत्सव, अगदी काटेकोरपणे पाळले जाणार, सोवळे ओवळे भरपूर. त्र्यम्बकेश्वर जवळ असल्यामुळे भारत भरातून लोकं धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी इकडे येतात, तीर्थक्षेत्र असल्यामुळे सतत गर्दी असते. भरपूर मंदिर, धर्मशाळा, हॉटेल, ह्यामुळे शहर भागात नेहमीच वर्दळ असते.
 |
| सूर्यनारायण मंदिर |
काळाराम मंदिर,गोरेराम मंदिर,सुर्यनारायण मंदिर,एकमुखी दत्त मंदिर, अशी अनेकानेक मंदिर, गोदाघाट,त्रयम्बकेश्वर सारखे ज्योतिर्लिंगाचे पवित्र स्थान, पांडवलेणी ह्यामुळे धार्मिक वारसा लाभलेलं!
 |
| त्र्यंबकेश्वर मंदिर |
ह्याबरोबरच सांस्कृतिक वारसा सांगणार हे शहर _ शिरवाडकर 'कुसुमाग्रज', दादासाहेब फाळके, अशा दिग्जांनीनाशिकला वैभव प्राप्त करून दिले आहे! नवीन flyover ने नाशिकचच नाही तर देशाचे वैभव वाढवले आहे.
 |
| longest elevated corridor in maharashtra |
 |
| दादासाहेब फाळके स्मारक |
आमच्या कोलोनीच्या गमती जमती पुढच्या वेळी!
No comments:
Post a Comment