बंगलोरला ३ वर्ष मुक्क्काम होता. त्या दरम्यान भानुप्रियाची 8th, 9th, आणि 10 th ही महत्वाची वर्ष आर्मी स्कूल मधून क्लीअर झाली, आणि आम्ही सर्वांनीच एक महत्वाचा टप्पा पार पडल्याचा सुटकेचा श्वास घेतला. तिच्या शाळेची ही वर्ष पण फार छान गेली. हुशार विद्यार्थिनीन पैकी एक असल्याने शाळेत खूप मानायचे तिला.आणि हो, आजची आघाडीची नायिका अनुष्का शर्मा आहे ना, ती ह्याच शाळेतली आणि भानूची सिनिअर!
भानूच दहावीचं वर्ष होत तरी आम्ही दोघी संध्याकाळी, कधी सकाळी देखील फिरायला वगैरे जायचो. तर मला शेजारच्या ममीज (ज्या अती काळजी करायच्या अस मला वाटत ), विचारायच्या की तुला एक्झामच काहीच टेन्शन नाही का का काय? फिरायला जाता ते? मी सांगायची की अस काहीच नाही, आम्ही टाईम ठरवतो आणि त्या प्रमाणेच काम करतो.मी तिला पण कधीच जास्त टेन्शन घेऊ दिल नाही, कारण त्यान नुकसानच जास्त होत, अस माझं स्पष्ट मत आहे.
त्यामुळे भानुनी,घरी शाळेत, बाहेर सगळीकडे भरपूर धमाल केली आहे, आणि ह्याच आठवणी राहतात ना? ते दिवस तर परत येत नाहीत?मी हा महत्वाचा धडा तिला शिकवला आहे की काम, मनोरंजन, सगळ माफक प्रमाणात झालच पाहिजे आणि ज्या त्या वेळीच झाल पाहिजे. कारण ती वेळ कधीच परत येत नसते!
जसं, लखनौला असतांना तिनी NCC जॉईन केलं होत, पण तिला पुढे ही संधी मिळाली नाही. कत्थक शिकली, पण पुढे संधी नाही मिळाली. आज तिच्या संगीताच्या ४ परीक्षा झाल्या आहेत, पण पुढे शिकू शकत नाही कारण तसा वेळ देऊ शकत नाही.
आता पटल ना की मी सांगते ते किती योग्य आहे ते?
आता कार्नाटक चा मुक्काम हलवून जम्मू जवळच्या सांबाला पोस्टिंग आली. तर जम्मूच्या आठवणी नंतर. आधी कर्नाटकच्या काही मस्त रेसिपी_
१) दावणगिरी डोसा:४ वाट्या तांदूळ, आणि १ वाटी उडीद डाळ रात्री भिजवून सकाळी उपसून batter बनवून घ्यावे. डोसे करायच्या आधी १ वाटी चुरमुरे कोरडे भाजून भरड करून पिठात मिसळून, मीठ घालून डोसे करावेत. हे डोसे थोडे जाडसर असतात. सोबत दही आणि वरून लाल मिरची,कडीपत्ता फोडणी घात्लेली नारळाची चटणी सर्व्ह करावी .
२)मैसूर रसम : १ पाकळ्या वाटी तूरडाळ, ३ लाल मिरच्या, ४ ते ५ लसूण पाकळ्या, मिरे ६ दाणे, १ टीस्पून जिरे, हळद आणि कोथिंबीर घालून शिजवून नंतर गळून घ्यावे. डाळीत प्रमाणात पाणी घालून, चिंच,गुळ, मीठ घालूनउकलावे . तेल गरम करून मोहरी, हिंग, करिपत्ता फोडणी घालावी. कोथिंबीर घालून रसम सर्व्ह करावे.
पण तरी एक मात्र सांगावसं वाटत की इथे मिळणारी राइस प्लेट इतकी स्वादिष्ट असते की काय सांगू ? the proof of the pudding is in eating it ! पण ह्या राइस प्लेटच्या फोटोवरच समाधान मानावे लागेल!
इथली एक पद्धत बघितली, की कोणत्या धार्मिक कार्याचं जेवण असेल, तर ते ज्या केटरर कडून येते, त्या बरोबरच काही ब्राह्मण मुल_मुली देखील येतात. हीच मुल, आधी सोवळ्याचे कपडे घालतात , पंगत मांडतात, वाढतात, आणि सर्व काम संपवूनच परत जातात! इतकं इम्प्रेसिव वाटत ना हे सगळ,खरच !कायम कोरलं जात अस दृश्य मनात!
आता भेट जम्मूला!
| बंगलोरची आर्मी पब्लिक स्कूल |
| शाळेतली मजा,मस्ती , आणि धमाल! |
भानूच दहावीचं वर्ष होत तरी आम्ही दोघी संध्याकाळी, कधी सकाळी देखील फिरायला वगैरे जायचो. तर मला शेजारच्या ममीज (ज्या अती काळजी करायच्या अस मला वाटत ), विचारायच्या की तुला एक्झामच काहीच टेन्शन नाही का का काय? फिरायला जाता ते? मी सांगायची की अस काहीच नाही, आम्ही टाईम ठरवतो आणि त्या प्रमाणेच काम करतो.मी तिला पण कधीच जास्त टेन्शन घेऊ दिल नाही, कारण त्यान नुकसानच जास्त होत, अस माझं स्पष्ट मत आहे.
| असे दिवस पाखरा सारखे भुर्रर उडून जातात! |
| बर्थडे साठी केक आणलाय, तयारी झालेली आहे फक्त मैत्रींणीनची वात पाहते आहे! |
त्यामुळे भानुनी,घरी शाळेत, बाहेर सगळीकडे भरपूर धमाल केली आहे, आणि ह्याच आठवणी राहतात ना? ते दिवस तर परत येत नाहीत?मी हा महत्वाचा धडा तिला शिकवला आहे की काम, मनोरंजन, सगळ माफक प्रमाणात झालच पाहिजे आणि ज्या त्या वेळीच झाल पाहिजे. कारण ती वेळ कधीच परत येत नसते!
जसं, लखनौला असतांना तिनी NCC जॉईन केलं होत, पण तिला पुढे ही संधी मिळाली नाही. कत्थक शिकली, पण पुढे संधी नाही मिळाली. आज तिच्या संगीताच्या ४ परीक्षा झाल्या आहेत, पण पुढे शिकू शकत नाही कारण तसा वेळ देऊ शकत नाही.
| NCC चा रुबाब ! |
आता कार्नाटक चा मुक्काम हलवून जम्मू जवळच्या सांबाला पोस्टिंग आली. तर जम्मूच्या आठवणी नंतर. आधी कर्नाटकच्या काही मस्त रेसिपी_
१) दावणगिरी डोसा:४ वाट्या तांदूळ, आणि १ वाटी उडीद डाळ रात्री भिजवून सकाळी उपसून batter बनवून घ्यावे. डोसे करायच्या आधी १ वाटी चुरमुरे कोरडे भाजून भरड करून पिठात मिसळून, मीठ घालून डोसे करावेत. हे डोसे थोडे जाडसर असतात. सोबत दही आणि वरून लाल मिरची,कडीपत्ता फोडणी घात्लेली नारळाची चटणी सर्व्ह करावी .
२)मैसूर रसम : १ पाकळ्या वाटी तूरडाळ, ३ लाल मिरच्या, ४ ते ५ लसूण पाकळ्या, मिरे ६ दाणे, १ टीस्पून जिरे, हळद आणि कोथिंबीर घालून शिजवून नंतर गळून घ्यावे. डाळीत प्रमाणात पाणी घालून, चिंच,गुळ, मीठ घालूनउकलावे . तेल गरम करून मोहरी, हिंग, करिपत्ता फोडणी घालावी. कोथिंबीर घालून रसम सर्व्ह करावे.
पण तरी एक मात्र सांगावसं वाटत की इथे मिळणारी राइस प्लेट इतकी स्वादिष्ट असते की काय सांगू ? the proof of the pudding is in eating it ! पण ह्या राइस प्लेटच्या फोटोवरच समाधान मानावे लागेल!
इथली एक पद्धत बघितली, की कोणत्या धार्मिक कार्याचं जेवण असेल, तर ते ज्या केटरर कडून येते, त्या बरोबरच काही ब्राह्मण मुल_मुली देखील येतात. हीच मुल, आधी सोवळ्याचे कपडे घालतात , पंगत मांडतात, वाढतात, आणि सर्व काम संपवूनच परत जातात! इतकं इम्प्रेसिव वाटत ना हे सगळ,खरच !कायम कोरलं जात अस दृश्य मनात!
आता भेट जम्मूला!
No comments:
Post a Comment