Friday, 5 July 2013

SAMBATEEL BHATKANTEE

सांबाच युनिट पण छोटं होत. ही Ecological  TA  Battallion  होती, आणि ह्या युनिटचं  काम होत forest cover  वाढविण्यासाठी स्थानिक forest  dept  ला मदत करणे. म्हणजे ५ वर्षांपर्यंत ही युनिट वरती डोंगरांवर saplings लावणार, देखभाल करणार, आणि नंतर ते forest  dept  ला सुपूर्द करणार. त्यासाठी १ 'कंपनी' म्हणजे साधारण १५० माणस  जम्मू पासून पुढे डोंगराळ भागात   एका point वर location  करून तिथे रहातात.  तिथून रोज डोंगरांवर जायचं, plantationच  काम करायचं आणि परत यायचं.
युनितच डोंगरावरच location


तर ह्या location  वर जायचं म्हणजे आनंदाची पर्वणीच होती आम्हाला! २_३ ऑफिसर्स आणि family  राहतील असे ३_४ cottages  बनवली होती. तिथे २ दिवस अगदी आरामात रहायचो.  ब्रेकफास्ट करून वरती डोंगरांवर गाडीतून फिरायला जायचं, परत आलं  की जेवण, आणि गार्डन मध्ये  बसायचं, तिथेच रात्रीच जेवण आणि पुन्हा गुडूप!तिथे पुष्कळ ऑफिसर्स, गेस्ट्स  यायचे, त्यामुळे त्यांचा पाहूणचार करण्यात वेळ मजेत  जायचा. ह्या cottage च्या जवळूनच एक झरा वहात होता. मस्त थंड पाणी!आणि अगदी सिनेमात असतो तसा झरा होता! ते म्हणजे ultimate  होत! पिकनिकचा फ़ील यायचा.
location  वरचे cottage

हाच तो झरा!एकदम ultimate च !







     




















सांबा हून जम्मूला   बऱ्याच  वेळा जायचो. कधी पार्टी, तर कधी कार्यक्रम, कधी  खरेदी. पठाणकोटला पण जाऊन आलो. तिकडे  उन्हाळ्यात पहिल्यांदाच पुदिना घातलेला उसाचा रस प्यायलो! मस्त टेस्ट होती! एकदम वेगळ!  उन्हाळ्यात कैरीची चटणी, अनेक प्रकारची लोणची, आमपन्ना असं बरंच  काही!

  थंडीत भरपूर भाज्या मिळतात इकडे. मग मिक्स भाज्यांचं  लोणच, बिर्याणी, मेयोनीस  बरोबर उकडलेल्या भाज्या,  तवा  सब्जी ,भरवाँ  सब्ज़ी, नाहीतर, नुस्त भाजी बाजारातचक्कर टाकून डोळे भरून ताज्या भाज्या पाहणे, ह्यातलं  बरंचकाही करण्यासारख असत!

पाठनकोटला बघितलं , ड्रायफ्रुट्स ची दुकानं  च्या दुकानं! ओळीन! आणि आपण कितीही पिशवी भरभरून विकत घेतलं, तरी समुद्रातलं  ओंजळभर पाणी काढल्यासारखं वाटत! कपडे, गरम कपडे, स्वेटर्स, शाली भरपूर व्हरायटी! घ्याल  तेवढ थोडचं!

खायची पण चंगळ  असते इथे. पंजाब मध्ये छोले_पुरी, परांठे, राजमा चावल, कुलचे आणि हे सर्व एक्स्ट्रा 'मक्खन मारके 'सोबत मस्त तिखट लाट चुटूक लोणच, दही, लोणी, सलाड,आणि वरती मित्त्हास बोलण! 'आईये बहेनजी', 'आईये भाभीजी', सोबत मैत्रीदाखल हास्य! माणूस दुकानात शिरलाच पाहिजे! आपल्याकडे म्हणजे,गिऱ्हाईकावर असं  खेकसायचं की माणूस पळूनच गेला पाहिजे!(हा !हा !)

दुकानात सामान बघायला   म्हणून जरासं  थांबा, की तो दुकानदार लगेच  म्हणणार,'बहेनजी देख लिजिये. देखनेके  पैसे थोडेना  लगते हैं? पसंद आये तोही लेना.' अशी वर मखलाशी! बघायला  म्हणून गेलेला माणूस काहीतरी विकत घेऊनच जाणार!

आणि पंजाबच्या महिलांचा नखरा? पुन्हा तेच  वर्णन! लखनौसारखचं! नखशिखांत matching  केल्याशिवाय   घरातून बाहेर पडणे नाही!
 
सांबाच्या मुक्कामात  प्रमोदिनीकडे जालंधरला जावून   आले. तिथे दोन दिवस होते. सांबा पेक्षा जास्त दुकानं  आणि मोठी  बाजारपेठ बघून थोडं  बर वाटलं  होत! प्रमोदिनी पण सांबाला आली होती, भानुचा बर्थडे होता तेंव्हा.
How  do  I look? good ना?(इति तनू!)

मस्त मजेत बसलेत फोटो काढत!(प्रमोदिनीच्या घरी )

सांबाला आमच्या घरी आदित्य, ,तनया,प्रमोदिनी,भानू,आणि अर्थात टिमी!




अजून  काही पुढच्या लेखात! तोपर्यंत बाय!

No comments:

Post a Comment